Bitter Gourd Benefits: जर तुम्ही शुगर आणि बद्धकोष्ठतेने त्रस्त असाल तर कारल्याच्या बिया तुम्हाला या समस्येपासून मुक्त होण्यास मदत करतील. त्यात पोटॅशियम, लोह, जीवनसत्त्वे आणि इतर पोषक घटक असतात. याच्या सेवनाने आजारही दूर राहतात. अनेकांना कारले खायला आवडत नाही. ते चविला कडू असल्याने लहान मुलं असो वा तरूण कारले खाताना नाक वर करतात. पण तुम्हाला माहित आहे का कारल्याचे अनेक फायदे आहेत जे अनेक आजारांवर रामबाण उपाय म्हणून काम करतात. म्हणून आज आपण कारल्याच्या बियांचे फायदे जाणून घेणार आहोत. (5 Benefits of Bitter Gourd Seeds From Skin to Digestion)
कारली ही वेलीवर लागणारी फळभाजी आहे, ज्याला कडू भाजी असेही म्हणतात. याच्या बिया अन्नापेक्षा औषधी गुणांसाठी जास्त वापरतात. त्यात ल्युटीन, कॅरोटीन, बीटाकॅरोटीन, व्हिटॅमिन ए, बी आणि सी, मॅग्नेशियम यांसारखे फ्लेव्होनॉइड्स देखील असतात.
मुरुमांपाासून आराम मिळतो- कारल्यातील पोषक घटक चेहऱ्यावरील मुरुम दूर करण्यासाठी प्रभावी आहेत. यासोबतच ते डाग आणि त्वचेचे इन्फेक्शनही दूर करते. यामध्ये असलेले व्हिटॅमिन सी, मॅग्नेशियम आणि इतर पोषक घटक त्वचेवरील मुरुम दूर करतात आणि चेहरा चमकदार बनवतात.
बिया रक्तातील शुगर नियंत्रित करतात- कारल्याच्या बिया आपल्या शरीरासाठी उत्तम असतात. कारल्याच्या बियांमध्ये असलेले इन्सुलिन गुणधर्म रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवतात. चुकून शरिरातील शुगरचे प्रमाण वाढले तर कारले शुगर लेवल कंट्रोल करते. यासोबतच कारल्याच्या बिया बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून आराम देतात.
पोटात जंत झाल्यास – ज्याच्या पोटात जंत किंवा इन्फेक्शन झाले असेल त्यांनी करल्याच्या बियांचे नियमित सेवन केल्यास ही समस्या दूर होऊ शकते. कारल्याच्या बियांची पावडर करून ठेवा. आणि दिवसातून एकदा रिकाम्या पोटी हलक्या कोमट पाण्यासोबत घ्या. यामुळे पोटातील जंत आणि पोटाचे इतर आजार देखील कमी होती.
रोगप्रतिकारशक्ती वाढवा– बियांमधील व्हिटॅमिन सी, लोह आणि इतर पोषक घटक रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात. याचे नियमित सेवन केल्यास रोगप्रतिकारक शक्ती वाढते. कारल्याच्या बियांची पावडर बनवून ठेवा आणि रोज सकाळी एक चमचा कोमट पाण्यासोबत घ्या.
मूळव्याधच्या समस्येपासून आराम– मूळव्याधमध्ये मलप्रवाहात रक्त येते. अशा समस्येमध्ये कारल्याच्या बिया फायदेशीर ठरतात. कारल्याच्या बियांचा रस चमच्याने काढून मधासह सकाळी व संध्याकाळी घ्या. यामुळे तुम्हाला आराम मिळेल. शुगर असेलल्या आणि मूळव्याधचा त्रास असलेल्या पेशंटनी कारल्याची भाजी खाल्ल्यास फायदेशीर ठरू शकते.