Romantic Nicknames : प्रत्येक अनमोल नातं जपण्यासाठी त्यात काही मसाला घालावा लागतो. मग तो विश्वासाचा असो वा चांगल्या स्वभावाचा असो किंवा जोडीदारावरच्या प्रेमाचा असो. जेव्हा पत्नीवर प्रेम व्यक्त करण्याचा विचार येतो, तेव्हा पुरूष अनेक प्रकारे प्रयत्न करतात आणि काहीतरी नवीन प्रयोग देखील करतात. यासाठी तुम्ही तुमच्या पत्नीसाठी चांगले टोपणनाव निवडू शकता. जेव्हा तुम्ही तुमच्या पत्नीला एखाद्या रोमॅंटिक टोपणनावाने हाक माराल तेव्हा तिच्या चेहऱ्यावर स्मित आणि प्रेम नक्कीच तुम्हाला दिसेल. आता बायकोला किंवा पार्टनरला तुम्ही बाबू शोना म्हणत असाल तर हे कॉमन झाले. याव्यतिरिक्त आम्ही तुम्हाला काही नाव सजेस्ट करणार आहोत जे तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तिप्रती प्रेम व्यक्त करण्यासाठी वापरू शकता. (Romantic Nicknames for Wife or girlfriend)
पत्नीसाठी निकनेम कसे निवडावे (Cute Nicknames for Wife)
- पत्नीच्या सौंदर्याशी संबंधित टोपणनाव ठेवता येईल.
- तुम्ही तुमच्या पत्नीच्या गोंडस सवयींशी संबंधित नाव निवडू शकता.
- पत्नीच्या व्यक्तिमत्त्वाशी संबंधित एखादे चांगले नाव तुम्ही निवडू शकता.
- पत्नीच्या कोणत्याही प्रतिभेशी संबंधित नाव देखील ठेवता येते.
- तुम्ही पत्नीच्या विशिष्ट वर्तनाशी निगडीत नाव निवडू शकता.
- तुम्ही त्यांच्या समजुतीनुसार त्यांची नावे देऊ शकता.
- लोकांबद्दलच्या त्यांच्या वृत्तीनुसार नाव देखील निवडले जाऊ शकते.
Romantic Nicknames for Wife
एंजेल आइज – जर तुम्हाला तुमच्या पत्नीचे डोळे खूप सुंदर वाटत असतील तर तुम्ही तिला एंजल आइज या नावाने हाक मारू शकता.
एंजेल – एंजेल म्हणजे देवदूत. तुम्ही तुमच्या पत्नीला कॉल करण्यासाठी एंजेल हा शब्द देखील वापरू शकता.
बेबी- बेबी म्हणजे मूल. आपल्या बायकोला बाळ म्हणणे गोंडस असू शकते.
बुलबुल – बुलबुल हे एका पक्ष्याचे नाव आहे आणि अनेक लोकांचे नाव देखील आहे. तुम्ही प्रेमाने बायकोला बुलबुल देखील म्हणू शकता.
फुलपाखरू – फुलपाखरे खूप सुंदर असतात आणि अनेक प्रकारच्या रंगांनी रंगलेली असतात. म्हणून तुम्ही तुमच्या सुंदर पत्नीलाही फुलपाखरू म्हणू शकता.
बटरस्कॉच – जर तुमच्या पत्नीची आवडती आइस्क्रिम बटरस्कॉच असेल तर तुम्ही तिला या नावानेही हाक मारू शकता.
चुई-मुई – जर तुम्ही ‘चुईमुई’ सारख्या नाजूक आणि कोमल हृदयाच्या तुमच्या पत्नीसाठी गोंडस टोपणनाव शोधत असाल तर हे एक चांगले असू शकते.
परी – सुंदर परीसारख्या पत्नीसाठी हे एक उत्तम टोपणनाव असू शकते.
गिगल – याचा अर्थ हसणे असा होतो म्हणून वेळोवेळी हसणाऱ्या गोंडस पत्नीसाठी हे नाव परफेक्ट असू शकते.
आयसी – तुम्ही तुमच्या शांत स्वभावाच्या पत्नीसाठी हे नाव निवडू शकता.
अँग्री बर्ड – हे एक कार्टून पात्र आहे, ज्याला खूप राग येतो. जर तुमच्या पत्नीलाही पटकन राग येत असेल तर तुम्ही तिला अँग्री बर्ड म्हणू शकता.
या रोमॅंटिक नावाने हाक मारू शकता
बनी – बानी म्हणजे ससा. हे नाव सशासारखे गोंडस दात असलेल्या गोंडस पत्नीसाठी आहे.
डॉल – गोंडस बाहुलीसारख्या पत्नीला तुम्ही डॉल नावाने हाक मारू शकता.
बार्बी – हे नाव बार्बी डॉलसारख्या गोंडसआणि थोड्या गोलू मोलू असलेल्या पत्नीसाठी जास्त परफेक्ट आहे.
मिनी – मिकी आणि मिनी माऊसच्या कार्टून पात्रांवर आधारित, आपण आपल्या पत्नीला मिनी हे एक गोंडस नाव देऊ शकता.
स्लीपिंग ब्युटी – जर तुमची पत्नी खूप झोपाळू असेल तर तुम्ही तिला प्रेमाने स्लीपिंग ब्युटी म्हणू शकता.
चष्मिश – हे नाव चष्मा घालणाऱ्या मुलींवर जास्त सुट करते.
क्यूटी – तुम्ही तुमच्या पत्नीला क्यूटी या रोमॅंटिक नावाने हाक मारू शकता.
कर्ली ब्यूटी – जर तुमच्या पत्नीचे केस खूप कर्ल आणि आकर्षक असेल तर तुम्ही त्यांना कर्ली ब्यूटी म्हणू शकता.
हनी पाई – पाई म्हणजे गोड मध. तुम्ही तुमच्या लाडक्या पत्नीला या नावाने हाक मारू शकता.
माय क्वीन – हे देखील पत्नीसाठी एक रोमँटिक नाव आहे, जे कोणत्याही स्त्रीला तिच्या पतीकडून ऐकायला आवडेल.
किटेन – मांजरीच्या पिल्लाला किटेन म्हणतात. त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या निरागस आणि खेळकर पत्नीला या नावाने हाक मारू शकता.
रोज – तुम्ही तुमच्या प्रिय पत्नीला रोज म्हणू शकता. हे नाव तुमच्या नात्यात गुलाबाचं सौंदर्य भरून काढण्यासाठी काम करेल.
जानम – जानम हा शब्द जान या शब्दापासून आला आहे, म्हणून तुम्ही तुमच्या प्रिय पत्नीला रोमँटिक पद्धतीने जानम म्हणू शकता.
स्वीट हार्ट – स्वीट हार्ट या रोमँटिक नावानेही तुम्ही बायकोला हाक मारू शकता.
माय लव्ह – लव्ह म्हणजे प्रेम, म्हणून आपल्या प्रिय पत्नीला माय लव्ह म्हणणे खूप रोमँटिक साउंड करेल.
डियर – हे नाव अगदी सामान्य आहे, परंतु तरीही खूप रोमँटिक आहे.
फनी पत्नीसाठी फनी निकनेम (Funny Nicknames for Wife)
गुगली – प्रत्येक विषयावर गुगलवर सर्च करणार्या पत्नीसाठी हे एक मजेदार नाव आहे.
किडो – जर तुमची पत्नी खोडकर असेल आणि तिचा स्वभाव बालिश असेल तर हे टोपणनाव योग्य असेल.
पहेली – जी थेट न बोलता नेहमी तुम्हाला कोड्यात टाकत असेल तर ती पहेली.
भुक्कड – जास्त खाणारी बायको किंवा फक्त खाण्याचा विचार करणारी.
भटकी – प्रवासाची आवड असलेली पत्नी.
झल्ली – तुम्ही तुमच्या प्रिय पत्नीला झल्ली देखील म्हणू शकता जी नेहमी काहीतरी अपमानजनक कृत्ये करते.
चटोरी – मसालेदार जेवणाची आवड असलेल्या पत्नीला चटोरी असे म्हणतात.
मूडी – क्षणार्धात मूड बदलणाऱ्या पत्नीला मूडी म्हणता येईल.
लेडी डॉन – लेडी डॉन हे नाव सर्वांच्याच मनात असलेल्या पत्नीसाठी फनी नेम असेल.
टेंशन शॉप – प्रत्येक छोट्या गोष्टीवर टेन्शन घेणाऱ्या बायकोसाठी हे नाव अतिशय योग्य आहे .
नौटंकी- छोट्या छोट्या गोष्टींवर नाटकं करणाऱ्या फिल्मी बायकोसाठी.
क्राइम पार्टनर – जी पत्नी आपल्या पतीला त्याच्या प्रत्येक गोष्टीत साथ देते.
पार्टी अॅनिमल – ज्या पत्नीला पार्टी करायला आवडते त्यांच्यासाठी.
विकिपीडिया – हे नाव पत्नीसाठी खूप मजेदार आहे. जर तुमच्या पत्नीने घरातील असो वा बाहेरची प्रत्येक गोष्टीची संपूर्ण माहिती असेल तर तुम्ही तिला प्रेमाने मास विकिपीडिया म्हणू शकता.
न्यूजरूम – प्रत्येक गोष्टीची खबर ठेवणाऱ्या आणि तुम्हाला बातमी देणार्या पत्नीसाठी हे नाव खूप मजेदार असेल .