Hoodie Style Tips : हिवाळा असो वा पावसाळा मुलांना हूडी घालाला खूप आवडते. कोणत्याही सिझनमध्ये सर्वात स्टायलिश कसे दिसता येईल याचा पुरुष नेहमी विचार करतात. त्यांच्या लूकबद्दल ते नेहमी अलर्ट असतात. पण कधी कधी मुलांना असे वाटते की या ऋतूत हुडी घातली तर त्यांचा लूक खराब होईल. पण जर तुम्हाला हुडी घालूनही परफेक्ट दिसायचे असेल, तर आम्ही तुम्हाला काही स्टायलिश टिप्स सांगणार आहोत. या आधुनिक पद्धतींमुळे तुमची फॅशन स्टाईल वाढेल आणि तुमच्या लूकही परफेक्ट दिसेल. (Style hoodie like this to look modern and western)
लेयर्ड लूक (Layered Look)
हुडी घालताना नेहमी जास्त विचार केला जात नाही. सिंगल हुडी वेअर करून अनेकदा मुलं बाहेर पडतात.
पण लेअरिंगमध्ये हुडी घालून तुम्ही आधुनिक लूक मिळवू शकता. हा लूक मिळवण्यासाठी झिप हुडीही तु्म्ही घेवू शकता.. या झिप हुडीवर ओव्हरकोट घाला आणि खाली क्रू नेक टी-शर्ट घाला. तुमचा लूक बघून कोणतीही मुलगी तुमच्याकडे आकर्षित होईल.
एथलेजर लूक (Athleisure Look)
आजकाल क्रीडापटू हा ट्रेंड मोठ्या प्रमाणात फॉलो करतात. या प्रकारची स्टाईल जिम वेअर आणि कॅज्युअल वेअर दोन्हीचा लूक देते. हा लूक तुम्ही हुडीसोबतही सहज कॅरी करू शकता. यासाठी तुम्ही ब्लॅक हुडी घ्या. फिट केलेल्या ब्लॅक जॉगर्सच्या जोडीसह ही हुडी कॅरी करा. त्यासोबत लेदर लूकची चप्पलही ट्राय करून पहा.
लेदर जॅकेट लूक (Leather Jacket Look)
लेदर जॅकेट आणि हुडीचे कोणतेही कॉंम्बिनेशन पहिल्या झलकमध्ये दिसत नाही. पण तो एक चांगला कॉम्बो आहे ज्याद्वारे तुम्ही उत्तम लूक मिळवू शकता. या लुकसाठी काळ्या किंवा इंडिगो रंगाच्या जीन्ससोबत ब्लॅक लेदर जॅकेट घाला. आणि या जॅकेटबरोबर मल्टिकलर रंगांच्या हुडीज ट्राय करा. क्लासी लूक देणारा शूज यावर कॅरी करा.
सूट लुक (Suit Look)
या स्पोर्ट्स कम सूट लुकसाठी तुम्हाला हलक्या मटेरियलच्या राखाडी रंगाच्या हुडीची आवश्यकता असेल. ही हुडी तुम्ही चारकोल ग्रे सूटसोबत पेअर करा यामुळे डार्क आणि फेंट कॉम्बिनेशन आणखी चांगल दिसेल. आता पांढरे स्नीकर्स या लूकला परफेक्ट टच देतील. ऑफिस गोइंग शूज घालण्याऐवजी स्नीकर्स घातले तर तुमचा लूक परफेक्ट कॉम्बिनेशन सूट होईल.
बेसिक मॉडर्न लुक (Basic modern look)
मूलभूत आधुनिक स्वरूप प्राप्त करण्यासाठी, आपल्याला न्यूट्रल कलर हुडीची आवश्यकता असेल. यामध्ये तुम्ही ट्राउझर्स आणि स्पोर्ट्स स्नीकर्स घ्या आणि परफेक्ट कॅज्युअल लूक तयार करा. हा लूक रिक्रियेट करणे आणि कॉपी करणे सर्वात सोपा आहे. जर तुम्ही हुडीसोबत आणखी नवीन प्रयोग केले असेल तर आम्हाला कमेंटमध्ये सांगू शकता आणि आमच्या आयडिया फॉलो करून नवीन लूक देखील क्रियेट करू शकता.