Mouni Roy Earrings Collection : मौनी रॉयने छोट्या पडद्यापासून ते मोठ्या पडद्यापर्यंत आपल्या सौंदर्याने चाहत्यांना भुरळ घातली आहे. त्याच वेळी, तिचा फॅशन सेन्स इतका अप्रतिम आहे की ती बीटाउनच्या मोठ्या अभिनेत्रींनाही टक्कर देते. मग तो एखाद्या इव्हेंटमधला तिचा लूक असो किंवा कॅज्युअल आऊटिंग. प्रत्येक वेळी ती तिच्या फॅशनमुळे चर्चेत असते. (Mouni Roy Evergreen Earrings Collection can be copied for every program)
https://www.instagram.com/p/CuB9hy8tNh4/?utm_source=ig_web_copy_link&igshid=MzRlODBiNWFlZA==
त्याचबरोबर मौनीने तिच्या लूकचे फोटोही इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. ज्यामध्ये तिच्या हॉलिडेपासून ते मस्ती करण्यापर्यंतच्या फोटोंचा समावेश आहे. मौनीच्या या फोटोंमध्ये सर्वांच्या नजरा तिच्या ड्रेसिंग सेन्सवर तसेच अॅक्सेसरीजवर असतात. मग तो एथनिक लूक असो किंवा वेस्टर्न लूक, प्रत्येक वेळी तिची निवड हटके असते. आज आपण मौनीच्या कानातल्यांबद्दल जाणून घेणार आहोत. सर्वांच्या नजरा तिच्या इयररिंग्सवर खिळल्या आहेत. म्हणून परफेक्ट लूकसाठी मौनीच्या इयररिंग्स कलेक्शनवर एक नजर टाकूया.
https://www.instagram.com/p/CdSPl_hqX8J/?utm_source=ig_web_copy_link&igshid=MzRlODBiNWFlZA==
मौनी रॉयला टेंपल सोन्याच्या दागिन्यांची आवड आहे. त्यामुळेच तिने तिच्या लग्नासाठी तसेच फोटोशूटसाठी टेंपल ज्वेलरीचे डिझाइन निवडले होते. मौनीने तिच्या लग्नात सोन्याचे दागिने निवडले होते. ज्यामध्ये मंदिराची रचना करण्यात आली होती. त्याचवेळी या फोटोशूटसाठीही तिने टेंपल डिझाईनचे कानातले देखील घातले होते.
मौनी तिचा साधा लूक अतिशय स्मार्टपणे स्टायलिश बनवते. मौनीने लाल रंगाच्या साध्या कुर्त्यासोबत चोकर नेकपीस निवडला आहे. त्याच वेळी, आउटफिटनुसार,हटके लूक ठेवण्यासाठी गोल आकाराचे कानातले निवडले गेले आहेत जे एकूणच तिचा लूक परिपूर्ण करत आहे.
फॅशन सेन्सच्या बाबतीत मौनी रॉय खूप पुढे आहे. ती प्रत्येक आऊटिंगला स्टायलिश बनवते. मौनीने काळ्या रंगाच्या कुर्त्यासोबत काळ्या रंगाचे चंकी कानातले निवडले आहेत. जे स्टायलिश लूक देण्यासोबतच खूप सुंदर दिसत आहे. मौनीचे हे लूक्स पाहून सहज तु्म्हाला कॉपी करता येईल.
साडीतील स्टायलिश आणि मॉडर्न लूकसाठी तिची कानातल्याची निवडही खूप सिलेक्टिव आहे. जिथे ती लाल रंगाच्या रफल साडीत पार्टीसाठी तयार दिसत आहे. त्याच वेळी, टीअर ड्रॉप इअररिंग्स तिने या साडीवर कॅरी केले आहेत जे तिला परफेक्ट पार्टी लूक देत आहे ज्यात मोनी खूप सुंदरही दिसत आहे.
मौनीने चिकनकारी कुर्त्यासोबत सिल्व्हर ऑक्सिडाइज्ड डँगलर्स घातले आहे. त्याचबरोबर अशा जड कानातल्यांना आधार देण्यासाठी तिने केसांच्या मागे सपोर्टर लावला आहे. मौनीचा हा लूक कोणत्याही फेस्टिव्ह सीझनसाठी परफेक्ट दिसतो. तुम्हालाही हा लूक कॉपी करायचा असेल तर तुम्ही सहज करू शकता. या प्रकारचे कानातले तुम्हाला मार्केटमध्ये सहज मिळून जातील.
कानातल्यामध्ये येणारा झुमका हा प्रकार एव्हरग्रीन आहे. जो तुम्हाला नेहमीच क्लासी लूक देवू शकतो. मौनीचे झुमका प्रेम तुम्ही नागिन या सिरियलमध्ये बघितले असले परंतु रियर लाईफमध्ये देखील मौनी झुमका प्रेमी आहे. उत्कृष्ट आकर्षणामुळे झुमका हा प्रकार खूप लोकप्रिय झाला आहे. लाबं कुर्ती असो वा साडी किंवा लेहेंगा असो कोणत्याही आऊटफिटवर तुम्ही झुमका ट्राय करू शकता.
https://www.instagram.com/p/CkaqPR0p2dT/?utm_source=ig_web_copy_link&igshid=MzRlODBiNWFlZA==
झुमके, साधे किंवा भरतकाम केलेले वापरून पाहण्यासाठी साड्या हा नेहमीच चांगला पर्याय असतो. जुने आकर्षण नेहमीच चांगल्या वाईब्स देवून जातात. नागिन फेम अभिनेत्रीने पांढर्या एम्ब्रॉयडरी साडीवर गोल्ड झुमके घालू जी पोज दिली ती बघून अनेक मुलींनी तिचा हा लूक कॉपी केला आहे.
https://www.instagram.com/p/Cqr7jk1pxRG/?utm_source=ig_web_copy_link&igshid=MzRlODBiNWFlZA==
केवळ मौनी रॉयच नाही तर करीना कपूर खान , करिश्मा कपूर, कंगना रणौत यासारख्या अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी झुमका प्रेमी आहेत आणि त्यांचे इन्स्टाग्राम हँडल याचा पुरावा आहे. झुमका कानातले घालून स्टाईल स्टेटमेंट क्रियेट करणे खूप सोपे आहे. अलिकडे सिल्वर झुमक्यांची खुप क्रेझ वाढली आहे. तुम्ही देखील हे झुमके ट्राय करून न्यू स्टाईल प्लॉट करा.