मुंबईकरांनो! ज्याची तुम्ही दिर्घकाळ आणि आतुरतेने वाट पाहत होता तो मान्सून सिझन अखेर आला आहे. शिवाय मुंबई, पुण्याच्या गर्दीतून बाहेर पडण्यासाठी तुम्ही संधी शोधत असाल तर विकेंडही आला आहे. त्यामुळे आपल्या आतल्या प्रवाशाला जागृत करण्याची वेळ आली आहे. पावसाळा सेलिब्रेट करण्यासाठी आणि स्वत:ला फ्रेश करण्यासाठी तुम्ही मुंबईतील पावसाळी विकेंड डेस्टिनेशला भेट देऊ शकता. (Best 5 Places To Visit near Mumbai During Monsoon)
सोबतच शहरातील गर्दीतून बाहेर पडून निसर्गाच्या सानिध्यात जाण्यासाठीही भरपूर पर्याय आहेत, जिथे तुम्हाला फ्रेश वातावरण मिळू शकते. पावसाळ्यात मुंबई-पुण्याजवळ भेट देण्यासाठी सर्वोत्तम ठिकाणांची यादी आम्ही तुमच्यासाठी काळजीपूर्वक तयार केली आहे. तुम्हाला आराम करायचा असेल किंवा काही साहसी खेळांमध्ये सहभागी व्हायचे असेल, पावसाळी ठिकाणं एन्जॉय करायची असेल तर ही यादी तुम्ही फॉलो करु शकता.
इगतपुरी (Igatpuri) :
धुके पांघरलेल्या टेकड्या आणि शांत, अल्हाददायक वातावरण यामुळे इगतपुरी हे पावसाळ्यात भेट देण्यासाठीचे सर्वोत्तम ठिकाण बनले आहे. हे ठिकाण तुम्हाला परफेक्ट मान्सून व्हाईब्स देईल. विलोभनीय परिसर आणि हवामान तुम्हाला हे ठिकाण एक्सप्लोर करायला भाग पाडेल. पावसाळी रोमँटिक गाण्यांचा आनंद घेत तुम्ही हे ठिकाण एक्सप्लोर करू शकता. गरम वडा पाव आणि चहाचा आनंद तुम्हाला येथे घ्यायला मिळेल. (Top sightseeing places in Igatpuri)
जितके तुम्ही इगतपुरीच्या शोधात जाल तितके तुम्ही तिथल्या सौंदर्याच्या प्रेमात पडाल. या मोसमात रोमॅंटिक अनुभव देणारे हे महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय ठिकाणांपैकी एक आहे. निसर्गाचा, सौंदर्याचा किंवा ट्रेकिंगचा आनंद घेण्याव्यतिरिक्त, तुम्ही विपश्यना केंद्रात ध्यानाचा सराव करून स्वत:ला एक वेलनेस रिट्रीट देऊ शकता. (Igatpuri is a town and hill station in the Western Ghat mountains of Maharashtra)
इगतपुरीमध्ये काय पहायचे? त्रिंगलवाडी किल्ला, विहिगाव धबधबा, भावली धरण, विपश्यना केंद्र, कळसूबाई शिखर, घाटदेवी मंदिर, सांधन दरी, कसारा किल्ला,
इगतपुरीला कसे जायचे? (How to reach Igatpuri?)
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेस, कॅब, खाजगी टूर बसेस, सेल्फ-ड्राइव्ह आणि बाईकवरुनही तुम्ही इगतपुरीला पोहचू शकता.
माथेरान (Matheran) :
मुंबईतील टॉप-रेट केलेल्या मान्सून विकेंड गेटवेपैकी विहंगम दृश्यांचा साक्षीदार होण्यासाठी तुम्ही माथेरानला भेट द्या. हे महाराष्ट्रातील आकर्षक हिल स्टेशन्सपैकी एक आहे. इथे तुम्ही सूर्योदय आणि सूर्यास्ताचा आनंद घेऊ शकता. ज्या क्षणी तुम्ही माथेरानमध्ये पाऊल ठेवता, त्या क्षणी तुमच्यातील फोटोग्राफर जिवंत होतो. या ठिकाणाची प्रत्येक बाजू आकर्षक आहे की तुम्हाला अधिक एक्सप्लोर करायला आणि कॅप्चर करायला आवडेल. माथेरानला जाणारा मार्ग तुम्हाला रोमॅंटिक फिल देईल. तुम्हाला घोडेस्वारीने किंवा टॉय ट्रेनने देखील येथील मजा अनुभवता येईल. मान्सूनचा पाऊस निसर्ग सौंदर्यात भर घालतो. (Matheran is a hill station, near Mumbai)
माथेरानमध्ये काय पहायचे? लुईसा पॉईंट, शार्लोट लेक, मंकी पॉईंट, पॅनोरमा पॉईंट, वन ट्री हिल पॉईंट, इको पॉईंट, अंबरनाथ मंदिर, पोर्क्युपिन पॉईंट, अलेक्झांडर पॉईंट, पिशारनाथ महादेव मंदिर (Top attractions places to visit in Matheran)
माथेरानला कसे जायचे? (How to reach Matheran?)
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेस, कॅब, खाजगी टूर बसेस, सेल्फ-ड्राइव्ह आणि बाईकवरुनही तुम्ही माथेरानला पोहचू शकता. याशिवाय लोकलने तुम्ही नेरळला जाऊन तिथून टॉय ट्रेनने माथेरानला जाऊ शकता.
कर्नाळा (Karnala) :
कर्नाळ्याला भेट देऊन हिरवेगार दृश्य, ओसंडून वाहणारे धबधबे आणि भव्य पर्वतरांगा पाहून डोळ्याचे पारणे फिटेल. मुंबईपासून 100 किलोमीटरच्या अंतरात भेट देण्यासाठी सर्वोत्तम पावसाळी डेस्टिनेशन शोधत असाल तर कर्नाळा हीच तुमची पहिली निवड असेल. निसर्ग प्रेमींसाठी हे एक नंदनवन आहे, कारण आपण प्रत्येक कोपऱ्यात पर्यावरणाचे शाश्वत सौंदर्य अनुभवू शकता. या विकेंडला कर्नाळा सहलीवर जा आणि कर्नाळा किल्ला पाहून निसर्ग सौदर्याचा आनंद अनुभवा.
जुन्या काळातील हा किल्ला वनस्पती आणि हिरव्या शेवाळांनी ताब्यात घेतला आहे. आल्हाददायक हवामानासह किल्ल्यावरचा ट्रेक तुमचा उत्साह पुढच्या स्तरावर घेऊन जाईल. कर्नाळा किल्ला ट्रेकर्सच्या दृष्टीने सोपा समजला जातो. इथून मुंबईची किनारपट्टी आणि सह्याद्री पर्वतरांगा तुम्हाला एक अतुलनीय अनुभव देतात. तुम्ही येथे घालवलेला प्रत्येक सेकंद तुम्हाला विलक्षण अनुभव देतो. याशिवाय, तुम्ही कर्नाळा पक्षी अभयारण्याला भेट देऊ शकता जे 150 हून अधिक पक्षी प्रजातींचे घर आहे आणि पक्षीनिरीक्षकांसाठी स्वर्गापेक्षा कमी नाही. (Top attractions places to visit in Karnala)
कर्नाळ्याला काय पहायचे? (Places to Visit in Karnala)
उसरण धबधबा, कर्नाळा किल्ला, कर्नाळा पक्षी अभयारण्य, जशन फार्म, शिव मंदिर
येथे कसे जायचे (How to reach Karnala?)
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेस, कॅब, खाजगी टूर बसेस, सेल्फ-ड्राइव्ह आणि बाईकवरुनही तुम्ही कर्नाळ्याला पोहचू शकता.
कोलाड (Kolad) :
मुंबईजवळ रायगड जिल्ह्यात वसलेले, कोलाड हे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये भेट देण्यासाठी मुंबईकरांचे फेमस टुरिस्ट अॅट्रेक्शन आहे. कोलाड हिवाळ्यात आणि उन्हाळ्यातही फिरण्यासाठी पर्यटक येत असतात. मात्र पावसाळ्यांच्या दिवसांमध्ये इथले सौंदर्य खुलते. इथला निसर्ग आणि धबधबे अत्यंत सुंदर आणि मनमोहक आहेत. विविध वनस्पती आणि प्राण्यांसह नैसर्गिक विविधतेचे समृद्ध ठिकाण आहे. कोलाडमध्ये तुम्ही पिकनिक, किल्ले ट्रेकिंग, कॅम्पिंग, रिव्हर राफ्टिंग, अशा अनेक मजेदार अॅक्टिव्हिटीजचा आनंद घेऊ शकता. (Top attractions places to visit in Kolad)
कोलाडमध्ये काय पहायचे? (Places to Visit in Kolad)
ताम्हिणी घाट धबधबा, कुडा मांदाड लेणी, गायमुख, देवकुंड धबधबा, भीरा धरण, घोसला किल्ला, सुतारवाडी तलाव, तळा किल्ला, प्लस व्हॅली
कोलाडला कसे जायचे (How to reach Kolad?)
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेस, कॅब, खाजगी टूर बसेस, सेल्फ-ड्राइव्ह आणि बाईकवरुनही तुम्ही कर्नाळ्याला पोहचू शकता.
माळशेज घाट : (Malshej Ghat)
पावसाळ्यात मुंबईजवळ भेट देण्याच्या प्रसिद्ध ठिकाणांच्या यादीत माळशेज घाटाचा पहिला क्रमांक लागतो. डोळ्यात भरणारे धबधबे, भव्य किल्ले आणि हिरवेगार निसर्ग सौंदर्य. अशा सर्व गोष्टी एकाच ठिकाणी पाहायला मिळण्याचे ठिकाण म्हणजे माळशेज घाट. मुंबईतील धकाधकीच्या जीवनापासून अवघ्या दोन तासांच्या अंतरावर माळशेज घाट अनुभवता येतो. पर्यटक, निसर्गप्रेमी, पर्वतारोह्यांसाठी माळशेज घाटात अद्भुत नजारा पाहायला मिळतो. (Top attractions places to visit in Kolad)
माळशेज घाटात काय पाहायचे? (Places to Visit in Malshej Ghat) :
माळशेज धबधबा, पिंपळगाव जोगा धरण, हरिश्चंद्रगड आणि अजोबा हिल किल्ला.
माळशेज घाटात कसे जायचे (How to reach Malshej Ghat?)
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेस, कॅब, खाजगी टूर बसेस, सेल्फ-ड्राइव्ह आणि बाईकवरुनही तुम्ही कर्नाळ्याला पोहचू शकता.