Cocktail Party Fashion Tips : लोकांचे वॉर्डरोब वेगवेगळ्या प्रकारच्या कपड्यांनी भरलेले असले, तरी जेव्हा पार्टीला जाण्याचा विचार येतो तेव्हा प्रत्येकाला आपले कपाट रिकामेच दिसते. माझ्याकडे घालायला कपडे नाही असा स्वर असतो. त्यात कॉकटेल पार्टीला जाण्याचा मुद्दा असेल तर कोणता ड्रेस घालायचा याचा विचारही करणं कठीण होऊन बसतं त्यामुळे कॉकटेल पार्टीसाठी कोणता लूक परफेक्ट दिसतो आज आपण जाणून घेवूया. (which look looks perfect for a cocktail party)
कॉकटेल पार्टीला जाण्यासाठी, लोकांना ड्रेस निवडण्यासाठी खूप कटकट करावी लागतो. अशा वेळी अनेक लोक चुकीचा ड्रेस निवडतात आणि काहीतरी घालून निघून जातात. आता कॉकटेल पार्टीसाठी सर्वोत्तम ड्रेस कोणता आणि कसा निवडायचा याबद्दल आपण जाणून घेवूया. या सिंपल टिप्स फॉलो करू तुम्ही पार्टीमध्ये सहज किलर लूक मिळवू शकता.
ड्रेसच्या फॅब्रिककडे लक्ष द्या
कॉकटेल पार्टी ही सामान्य पार्टीपेक्षा थोडी वेगळी असते, त्यामुळे या पार्टीसाठी काही खास फॅब्रिकचे ड्रेस कॅरी करणे हा एक चांगला पर्याय असू शकतो. तुम्हाला हवे असल्यास वेलवेट आणि सिल्क फॅब्रिकचे ड्रेस घालू शकता. यामुळे तुमचा लूक खूपच किलर दिसू शकतो. एवढेच नाही तर तुमचा ड्रेसिंग सेन्सही इतरांपेक्षा वेगळा दिसेल.
तुम्ही कॅज्युअल ड्रेस वापरून पाहू शकता
कॉकटेल पार्टीसाठी फक्त फॉर्मल कपडे घालून जाणे आवश्यक नाही. कॉकटेल पार्टीच्या थीम सामान्य पार्ट्यांपेक्षा वेगळ्या असतात. तुम्हाला हवे असल्यास वेगळ्या स्टाईलमध्ये कॅज्युअल ड्रेस घालूनही तुम्ही पार्टीमध्ये कूल लुक मिळवू शकता. कॅज्युअल शर्टसोबत कोट किंवा डेनिम जीन्स कॅरी करणे तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकते.
रंगावर लक्ष केंद्रित करा
सर्वोत्तम ड्रेस सिलेक्शनसाठी रंगावर लक्ष केंद्रित करणे देखील आवश्यक आहे. कॉकटेल पार्टीसाठी ड्रेस कोड सेट केला असतो. पण तुम्ही ड्रेसबाबत जास्तच कनफ्युज होत असाल तर डार्क रंगाचा ड्रेस कॅरी करू शकता. यासाठी तुम्ही लाईट ब्ल्यू रंग किंवा पांढरा टी-शर्ट सिलेक्स करू शकता. यामुळे तुम्हाला खूप रॉयल लूक मिळू शकतो.
क्लीनिंग आणि क्रीज चेक
कॉकटेल पार्टीसाठी ड्रेसचा रंग आणि फॅब्रिक निवडताना ड्रेसच्या क्लीनिंग आणि क्रीज चेककडे लक्ष देणे देखील महत्त्वाचे आहे. अशा वेळी पार्टीसाठी ड्रेस कॅरी करण्यापूर्वी दोन्ही गोष्टी व्यवस्थित चेकआऊट करा यामुळे तुमच्या लूकमध्ये आणखी भर पडेल आणि तुम्ही आकर्षक दिसाल.