पुणेकरांना पाऊस म्हंटलं की पहिल्यांदा आठवतो तो सिंहगड आणि दुसऱ्या नंबरवर येतो ताम्हिणी घाट. सिंहगडावरील हिरवळ, दाट धुके आणि चिंब भिजवणारा पाऊस. ताम्हिणी घाटातील धबधबे, खोल दरीतून स्वर्गीय अनुभव देणारे दाट धुके असं सगळं अल्हाददायक वातावरण. पण आज आम्ही तुम्हाला सिंहगड आणि ताम्हिणी घाटाव्यतिरीक्तही पुण्याच्या आजुबाजूला पावसाळ्यातील विकेंडला कुठे भेट द्यायची ती ठिकाणं सांगणार आहोत. ही ठिकाणं तुम्हाला गर्द हिरवळ, विलक्षण सौंदर्य, आल्हाददायक हवामान, निसर्गाचे चमत्कार आणि इतर अनेक घटकांशी कनेक्ट करतील. (5 Best Places to Visit in Monsoon Weekend Around Pune)
खंडाळा (Khandala) :
पावसाळ्यात खंडाळ्याची सहल करून तुम्ही निसर्गाच्या कुशीत विकेंडचा आनंद घेवू शकाल. खंडाळ्याला भेट दिल्यास मान्सूनच्या जादूचा साक्षीदार असणारा तलाव, पावसाच्या सरींनी खुललेली हिरवळ असे सगळे नैसर्गिक सौंदर्य पाहता येईल. खंडाळ्यात विशेषत: पावसाळ्यात आजुबाजूचा परिसर खूप सुंदर दिसतो. पावसाळ्यात हे सर्वात प्रसिद्ध विकेंड गेटवेपैकी एक आहे. खंडाळ्यात पाय ठेवला की, सर्वत्र विखुरलेल्या सौंदर्याचे साक्षीदार होऊन तुम्ही थक्क व्हाल. (Khandala is a hill station in the Western Ghat mountains of Maharashtra)
खंडाळ्यात काय पहायचे? शूटिंग पॉइंट, शिंगरीबा मंदिर, ड्यूक नोज, राजमाची किल्ला, श्रीवर्धन किल्ला, लोहगड किल्ला, तुंग किल्ला आणि तिकोना किल्ला (Best Places to Visit in Khandala)
खंडाळ्याला कसे जायचे? (How to reach Khandala?)
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेस, रेल्वे, कॅब, खाजगी टूर बसेस, सेल्फ-ड्राइव्ह आणि बाईकवरुनही तुम्ही खंडाळ्याला पोहचू शकता.
कोलाड :
रायगड जिल्ह्यात वसलेले, कोलाड हे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये भेट देण्यासाठी फेमस टुरिस्ट अॅट्रेक्शन आहे. कोलाडला हिवाळ्यात आणि उन्हाळ्यातही फिरण्यासाठी पर्यटक येत असतात. मात्र पावसाळ्यांच्या दिवसांमध्ये इथले सौंदर्य खुलते. इथला निसर्ग आणि धबधबे अत्यंत सुंदर आणि मनमोहक आहेत. विविध वनस्पती आणि प्राण्यांसह नैसर्गिक विविधतेचे समृद्ध ठिकाण आहे. कोलाडमध्ये तुम्ही पिकनिक, किल्ले ट्रेकिंग, कॅम्पिंग, रिव्हर राफ्टिंग, अशा अनेक मजेदार अॅक्टिव्हिटीजचा आनंद घेऊ शकता. (Top attractions places to visit in Kolad)
कोलाडमध्ये काय पहायचे? (Places to Visit in Kolad)
ताम्हिणी घाट धबधबा, कुडा मांदाड लेणी, गायमुख, देवकुंड धबधबा, भीरा धरण, घोसला किल्ला, सुतारवाडी तलाव, तळा किल्ला, प्लस व्हॅली
कोलाडला कसे जायचे (How to reach Kolad?)
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेस, कॅब, खाजगी टूर बसेस, सेल्फ-ड्राइव्ह आणि बाईकवरुनही तुम्ही कर्नाळ्याला पोहचू शकता.
पाचगणी (Panchgani) :
समुद्रसपाटीपासून तब्बल 1300 फुटांवर असलेलं सातारा जिल्ह्यातील हे वर्ल्ड फेमस हिल स्टेशन आहे. अनेक कपल्स त्यांचे बेस्ट विकेंड डेस्टिनेशन म्हणून पाचगणीला पसंती देतात. पाचगणीमध्ये रोमॅन्टिक होणाऱ्यांपासून ते इतिहासाची आवड असणाऱ्यांपर्यंतच्या लोकांना आवडणारी अनेक फेमस ठिकाणं आहेत. थंड हवेच ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या पाचगणीमध्ये जाताना पसरणी घाटात तुम्हाला शांत दऱ्या, धबधबे आणि हिरव्यागार जंगलाचा अनुभव देईल. घाट चढून पाचगणी शहरात गेल्यानंतर तुम्ही पुणे-मुंबईच्या गर्दीतून एका नव्या विश्वात जालं. पाचगणी तुम्हाला सौंदर्य, रोमान्स, इतिहास, रहस्य आणि कलेशी जोडून ठेवते. शिवाय ट्रेकिंग आणि हायकिंगचा आनंदही तुम्ही घेऊ शकता.
पाचगणीमध्ये काय पहायचे? (Places to Visit in Panchgani)
टेबल लँड, केट्स पॉईंट, मॅप्रो गार्डन, वेण्णा तलाव, प्रतापगड किल्ला, माउंट माल्कम
पाचगणीला कसे जायचे (How to reach Panchgani?)
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेस, कॅब, खाजगी टूर बसेस, सेल्फ-ड्राइव्ह आणि बाईकवरुनही तुम्ही पाचगणीला जाऊ शकता. इथे पोहचण्यासाठी तुम्हाला जवळच रेल्वे स्टेशन म्हणजे सातारा.
महाबळेश्वर (Mahabaleshwar)
पाचगणीपासून अवघ्या 18 किलोमीटर अंतरावर असलेले महाबळेश्वर हे देखील एक जगप्रसिद्ध हिल स्टेशन आहे. सुंदर मंदिरे, खळखळून वाहणारे धबधबे, विलोभनीय दृश्ये, उंच पर्वत, शांत दऱ्या, गर्द हिरवळ आणि रोमांचित करणार अल्हाददायक वातावरण असं सगळं काही तुम्हाला एकाच ठिकाणी अनुभवता येईल. महाबळेश्वरला भेट देण्यासाठी 12 महिन्यांचा काळ सर्वोत्तम असतो. हिवाळ्यात तुम्हाला गुलाबी थंडीने हुडहुडलेलं महाबळेश्वर तर उन्हाळ्याच्या दिवसात घामाच्या धारांचा कुठेही लवलेश नसणारे शांत महाबळेश्वर पाहता येईल.
थंड हवेच्या ठिकाणामुळे महाबळेश्वर ही ब्रिटिश राजवटीत बॉम्बे प्रेसिडेन्सीची उन्हाळी राजधानी होती. महाबळेश्वरमध्ये आल्यानंतर इथली स्ट्रॉबेरी अवश्य ट्राय करायला हवी. भारतातील एकूण स्ट्रॉबेरी उत्पादनात महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरीचा 85 टक्के वाटा आहे.ऑक्टोबर-नोव्हेंबर ते एप्रिल-मे या दरम्यान स्ट्रॉबेरीचा हंगाम असतो.महाबळेश्वर हे प्रसिद्ध पर्यटन स्थळासोबतच एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र देखील आहे. येथील पंचगंगा मंदिर कृष्णा, कोयना, वेण्णा, सावित्री आणि गायत्री या पाच नद्यांचे उगमस्थान आहे.
महाबळेश्वरमध्ये काय पहायचे? (Places to Visit in Mahableshwar)
महाबळेश्वरमध्ये विल्सन पॉईंट, माखरिया पॉईंट, केल्स पॉंईंट, इको पॉईंट, आर्थर सीट पॉईंट, विडो पॉईंट, कसल रॉक, सावित्री पॉईंट, मार्जोरी पॉईंट, एल्फिन्स्टन पॉईंट, कॅनॉट पीक हंटर पॉईंट,नॉर्थकोर्ट पॉईंट, लॉडविक पॉईंट, बॉम्बे पॉईंट, फाकलेड पॉईंट, चायनामन धबधबा, हत्तीचा माथा, वेण्णा लेक आवर्जून पाहण्यासारखी आहेत. याशिवाय प्रतापगड, तापोळा अशा आजूबाजूच्या ठिकाणांनाही भेट देता येते.
महाबळेश्वरला कसे जायचे (How to reach Panchgani?)
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेस, कॅब, खाजगी टूर बसेस, सेल्फ-ड्राइव्ह आणि बाईकवरुनही तुम्ही महाबळेश्वरला जाऊ शकता. इथे पोहचण्यासाठी तुम्हाला जवळच रेल्वे स्टेशन म्हणजे सातारा.
दुरशेत (Durshet)
सह्याद्री पर्वतरांगेच्या घनदाट जंगलातून वाहणाऱ्या अंबा नदीच्या काठावर शांत दुरशेत वसलेलं आहे. पण त्याशिवाय खळखळून वाहणाऱ्या धबधब्यांनी वेढलेला निसर्ग तुमच्या डोळ्यांसाठी एक मेजवानी असेल.कोलाडप्रमाणेच तुम्ही इथेही अॅडव्हेंचर्स स्पोर्ट्सचा आनंद घेऊ शकता. यात सरसगड ट्रेकिंग, रॅपलिंग, रॉक-क्लायंबिंग, रिव्हर राफ्टिंग, कुंडलिका नदीवर कायकिंगचा अनुभव तुम्हाला समृद्ध करणारा असेल.
दुरशेत हे इतर पर्यटन स्थळांसारखे गजबजलेले नसून अतिशय शांत ठिकाण म्हणून ओळखले जाते. पावसाळ्यातील शांतता आणि आल्हाददायक हवामान दुर्शतच्या नैसर्गिक सौंदर्याची अनुभूती देते.त्यामुळे जर तुम्ही वीकेंड ट्रिपसाठी एखादे शांत ठिकाण शोधत असेल तर तुमची पहिली निवड दुरशेतची असेल.
दुरशेतला काय पहायचे? (Places to Visit in Durshet)
पाली किल्ला, पाली गणपती मंदिर, दुरशेत फॉरेस्ट लॉज, उद्धर हॉट स्प्रिंग्स, महाड गणपती मंदिर.
दुरशेतला कसे जायचे (How to reach Durshet?)
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेस, कॅब, खाजगी टूर बसेस, सेल्फ-ड्राइव्ह आणि बाईकवरुनही तुम्ही दुरशेतला जाऊ शकता.