Before Marriage Tips : प्रत्येक नवविवाहित जोडप्यासाठी लग्नाचा दिवस खास असतो. हा दिवस खास बनवण्यासाठी ते प्रत्येक गोष्ट स्पेशल करतात नव्याने काही गोष्टी खरेदी करतात. पण कधी-कधी लग्नाच्या उत्साहात अशा काही चुकाही होतात, ज्यामुळे फंक्शन आणि नाते दोन्ही बिघडू शकते. त्यासोबतच नात्यात दुरावाही येऊ शकतो. लग्नामुळे मुलगा असो वा मुलगी दोघांचेही संपूर्ण आयुष्यच बदलून जाते हे सर्वश्रुत आहे. ( Bride and groom should not make these mistakes before marriage)
अशा परिस्थितीत, लग्नापूर्वी बॅचलर जीवन जगण्याची संधी दोघांनाही मिळते. समवयस्कांच्या दबावामुळे काही वधू-वर लपून छपून लग्नाच्या आधी बाहेर भेटतात आणि नको त्या चुका करून आपल्याच पायावर दगड पाडून घेतात. ज्या टाळणे दोघांसाठीही चांगले असते. चला तर आज अशा काही गोष्टी जाणून घेवूया ज्यामुळे लग्न चांगल्या पद्धतीने पार पडेल आणि अनावश्यक चुकाही होणार नाही.
धूम्रपान आणि मद्यपान टाळा
प्री-वेडिंग बॅचलर्स पार्टीमध्ये अनेक वेळा मित्रांच्या बोलण्यात येऊन मुलं-मुली ड्रिंक करतात. पण भान गमावल्यानंतर, दोघेही अशी कृत्ये करू शकतात ज्यामुळे नातेवाईकांसमोर आणि भावी जोडीदारासमोर त्यांचा प्रतिमा कायमची खराब होऊ शकते. यामुळे नाते तुटूही शकते. म्हणून बॅचलर पार्टी एकत्र अटेंड करू नका. केल्यास दोघांनीही ड्रिंक करणे टाळा. शक्यतो बॅचलर पार्टी करत असाल तर ड्रिंक हा पर्यायच ठेवू नका. त्यामुळे ना रहेगा बास और ना बजेगी बासूरी.
एक्सपासून अंतर ठेवा
प्रत्येकाचा एक भूतकाळ असतो. एखाद्या वेळी तुम्हाला त्याच्याबद्दल कितीही भावना मनात दाटून आल्या तरी तुमचे लग्न त्याच मुलाशी किंवा मुलीशी होणार असते ज्यांच्याशी घरच्यांनी ठरवले असते. तेव्हा तुम्ही नातेसंबंधात होता हे विसरून जावे लागते. दुसरी व्यक्ती तुमच्या आयुष्यात आली असते. त्यामुळे चुकूनाही आपल्या एक्सबद्दल त्या व्यक्तीसोबत बोलू नका. तुमच्या या कृतीमुळे समोरची व्यक्ती दुखावली जाऊ शकते. म्हणूनच जर तुम्ही लग्नाचा निर्णय घेतला असेल तर तुमचे एक्स सोबत असलेले सर्व संबंध तोडून टाका आणि त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू नका. आपल्या आयुष्यात आलेल्या व्यक्तीसोबत प्रामाणिक रहा आणि भविष्याचा विचार करा.
लग्नाच्या खर्चावर चर्चा करू नका
लग्नाच्या खर्चाबाबत अनेकजण जोडीदाराशी चर्चा करू लागतात. अशा स्थितीत तुमचा पार्टनर तुमच्या बोलण्यातून कोणताही चुकीचा अर्थ काढण्याची शक्यता आहे. त्यामुळे या विषयावर बोलणे टाळा. पैसा नात्यामध्ये वाईटपणा आणू शकतो. अनेक मुलं किंवा मुली बोलण्याच्या आणि मस्करीच्या ओघात या विषयावर बरेच काही भाष्य करून जातात. परिणामी तुमचे हे बोलणे समोरच्याने सिरियस घेतले तर लग्नाच्या खर्चावरून मोठ्यांमध्ये वाद होवू शकतात आणि याचा परिणाम तुमच्या लग्नावर होवू शकतो. त्यामुळे एक तर आपल्या लग्नाची सर्व जबाबदारी स्वत: उचला, अन्यथा घरचे मोठे तुमच्या लग्नाची आर्थिक जबाबदारी उचलत असेल तर त्यांचा मध्ये किंवा लग्नाच्या खर्चावर चर्चा करणे टाळा.
तक्रार करू नका
लग्नाआधीच अनेक जण आपल्या जोडीदारासमोर तक्रारींची पेटी उघडतात. यामुळे तुमच्या जोडीदाराचा मूडच खराब होत नाही तर कुटुंबातील सदस्यांच्या समस्याही वाढतात. त्यामुळे तक्रार करण्याऐवजी सकारात्मक बाजू पहा आणि आनंदी रहा. तुम्हा मुलाची किंवा मुलीची तक्रार करायची असेल तर ती लग्न जुळण्याआधी करा, म्हणजे भविष्यात नात्यात अडचणी येणार नाही. पण लग्न जुळल्यानंतर तक्रार करणे टाळा.
अनेकदा आपण एखाद्या गोष्टीवरून जजमेंटल होतो आणि एकमेकांवर टिका टिप्पणी करू लागतो. त्यामुळे आपण स्वभावाशी जुळवून घेत नाही असा समज होतो. एखादी चुकीची गोष्ट असेल तर नक्की तक्रार करा. परंतु छोट्या छोट्या गोष्टीवरून एकमेकांची तक्रार करणए टाळा, यामुळे नात्यात दुरावा येवू शकतो. एकमेकांना समजून घ्या आणि वेळ द्या कारण प्रत्येकात प्लस मायनस पॉइंट असतात.