Jackie Shroff Recipe Video : हल्ली एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे आणि हा व्हिडिओ आहे वांग्याचे भरीत बनवितानाचा. आता तुम्ही म्हणाल, वांग्याच भरीतच तर आहे, त्यात काय एवढे? आता हे वांग्याचं भरीत कुणी तयार केलं हे जाणून घेतल तर तुम्ही म्हणाल खरंच खास आहे.
सोशल मीडियावर केवळ लोकप्रिय शेफच त्यांच्या रेसिपीज शेअर करत नाहीत तर आजकाल प्रत्येकजण सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या खास रेसिपी लोकांसोबत शेअर करत आहे. ज्यांना स्वयंपाकाची आवड आहे, ते स्वयंपाकासोबतच त्यांच्या पाककृतीही जगासोबत शेअर करतात.
अलीकडेच, अपना भिडू अर्थात लोकप्रिय बॉलीवूड स्टार जॅकी श्रॉफने त्याच्या चाहत्यांसाठी एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो वांग्याचं भरीत आणि एग कढीपत्ता करी तयार करण्याची रेसिपी सांगत आहे. हे पाहून तुम्हीही म्हणू शकता की जॉकी भाई करू शकतो तर मी का नाही?
तुम्ही सर्वांनी वांग्याचं भरीत खाल्लं असेल पण, एकदा जॉकी श्रॉफने सांगितलेल्या रेसिपीनुसार भरीत घरी नक्की करून पहा. सोबत एग कढीपत्त्याची रेसिपीही जरुर ट्राय करा. चला तर मग या दोन्ही पाककृतींबद्दल आपणही जाणून घेऊया.
अभिनेता जॅकी श्रॉफ झाला शेफ जॅकी श्रॉफ
जॅकी श्रॉफने व्हिडीओमध्ये अतिशय सोप्या पद्धतीने वांग्याचे भरीत तयार करण्याची रेसिपी सांगितली आहे. भरीत तयार करण्यासाठी वांगी, लसूण, हिरवी मिरची, टोमॅटो, मोहरीचे तेल आणि मीठ घेतले आहे. भरीत तयार करण्यासाठी प्रथम वांगी स्वच्छ धुवून घ्या. नंतर मधोमध कापा. त्यात मिरच्या आणि लसूण नीट बसवा.
मिरच्या आणि लसूणासह हे वांग आणि टोमॅटो गोवऱ्या किंवा कोळश्यावर भाजून घ्या. त्यानंतर वांग्याची साल काढून टोमॅटोसोबत हाताने स्मॅश करा. सोबत मिरची त्यानंतर त्यात एक चमचा मोहरीचे तेल आणि मीठ घालून मिक्स करा. त्यात कांदा आणि कोथिंबीर मिक्स करून गार्निश करा आणि वांग्याचा भरीताचा कडक भाकरीसोबत आस्वाद घ्या.
https://www.instagram.com/reel/Cu63CYAgBfV/?utm_source=ig_web_copy_link
जॅकी श्रॉफकडून शिका एग कढीपत्ता करी कशी तयार करायची
वांग्याच्या भरता व्यतिरिक्त, जॅकी श्रॉफने अंडा कढीपत्त्याची रेसिपी देखील शेअर केली आहे. अंडा कढीपत्ता करी बनवण्यासाठी तुम्हाला कशाची गरज आहे ते जाणून घेवूया. यासाठी फक्त एका भांड्यात अंड्याचा पांढरा भाग घ्या आणि पॅन गॅसवर ठेवा. कढईत थोडे तेल टाकून त्यात कढीपत्ता आणि हिरव्या मिरच्या घालून तडतडू द्या. आता त्यात अंड्याचा पांढरा भाग घालून मिक्स करा आणि पॅनमध्ये चांगले शिजू द्या. अंड्याचा पांढरा भाग दोन्ही बाजूंनी शिजल्यावर त्यावर मीठ आणि काळी मिरी पावडर टाकून गरमागरम सर्व्ह करा.
दादा नव्याने स्वत: काहीतरी तयार करून पहा
जॅकी श्रॉफने व्हिडीओच्या माध्यमातून वांग्याचं भरीत आणि एग कढीपत्ता करीची ही सोपी रेसिपी लोकांना सांगितली आहे. ग्रामीण भागात राहणार्या लोकांसाठी, अभिनेत्याने सुचविल्याप्रमाणे शेणाचा गौऱ्यांचा वापर तुम्ही वांगी भाजण्यासाठी करू शकता. आता तुमच्या दादालाही हा व्हिडिओ दाखवा आणि आपण सोबत ही रेसिपी ट्राय करू म्हणत आपल्या घरातील पुरुषांनाही स्वयंपाकचे धडे द्या. यामुळे अडीअडचणीच्या काळात तुम्हाल किंवा तुमच्या आईला उपाशी रहावं लागणार नाही किंवा घरता सगळ साहित्य असताना बाहेरून ऑनलाईन काही मागावं लागणार नाही. यामुळे तुमचे पैसे, वेळ आणि आरोग्य सेफ राहिल शिवाय आपला दादा नव्याने स्वत: काहीतरी तयार करून खायला शिकेल.