Weight Lifting Tips : अलीकडे तरुणांमध्ये जीम जॉईन करण्याचा मोठा फॅड आलाय. जीमला जाऊन बॉडी तयार करणे मोठं मोठे वजन उचलणे आणि त्याचे फोटो सोशल मीडियावर अपलोड करणे हा सध्याचा ट्रेंड आहे. पण मित्रानो, तुम्हाला माहित आहे का जास्त वजन उचलल्याचे एखाद्याचा जीवही जाऊ शकतो. (How much weight should you lift while exercising?)
33 वर्षीय फिटनेस इन्फ्लुएन्सर आणि लोकप्रिय बॉडीबिल्डर जस्टिन विक्कीचा (Justyn Vicky Dies in Gym) वर्कआऊट दरम्यान मृत्यू झाला. त्याने 210 किलो वजन उचलण्याचा प्रयत्न केला आणि त्याची एक चूक जीवावर बेतली. या घटनेचा धक्कादायक व्हिडीओ आला समोर आला आहे. म्हणून आज आपण वर्कआऊट करताना काय चुका करू नये हे जाणून घेणार आहोत.
वेट लिफ्टिंगमुळे तुम्हाला प्रोटीन पावडर शेक घेण्याचा आणि मसल्स वाढवण्याचा विचार येऊ शकतो, परंतु ते फक्त स्टिरिओटाइप आहे. वेट लिफ्टिंगच्या काही स्टेप्स आहेत त्यानुसारच तुम्ही व्यायम केला पाहिजे. सुरुवात कशी करावी आणि तुम्ही किती वजन उचलले पाहिजे यासाठी काही ट्रिक्स असतात त्या तुम्ही प्रशिक्षकांच्या देखरेखीखालीच केल्या पाहिजे.
https://www.instagram.com/reel/CuUNKsKtQad/?utm_source=ig_web_copy_link&igshid=MzRlODBiNWFlZA==
वेटलिफ्टिंग म्हणजे वजन उचलणे. तुम्हाला असेही वाटते का की वजन उचलण्याचे व्यायाम फक्त मसल्स मिळविण्यासाठी केले जातात. तर आम्ही तुम्हाला सांगतो की असे अजिबात नाही. हा देखील व्यायामाचा एक मार्ग आहे ज्यामुळे आपल्या शरीराला अनेक फायदे मिळतात, ज्याबद्दल तुम्हाला माहिती नसेल. व्यायामाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे शारीरिक विकास. याद्वारे तुमचे संपूर्ण शरीर सुडौल बनते आणि स्नायू मजबूत होतात. वर्कआउट दरम्यान, सर्वात कठीण गोष्ट म्हणजे कोणता वर्कआउट, तुम्हाला किती वेळ करायचा आहे आणि किती वजन उचलणे तुमच्यासाठी योग्य आहे हे ठरवणे. वेटलिफ्टिंग व्यायाम केवळ तुमचे स्नायू मजबूत करत नाहीत तर तुमचे हात देखील मजबूत करतात.
तुम्ही नवशिके असाल किंवा प्रशिक्षण घेत असाल तर प्रत्येकाला हे माहित असले पाहिजे की त्यांनी एका दिवसात किती वजन उचलले पाहिजे. जेणेकरून दुखापत होणार नाही आणि तुमचे फिटनेसचे ध्येयही पूर्ण होऊ शकेल. तुम्ही किती वजन उचलू शकता हे तुमचे लिंग, वय, वजन आणि ताकद यावर अवलंबून असते.
योग्य वजन ओळखण्यासाठी या टिप्स फॉलो करा
- पहिल्या 10 दिवसात कोणतेही वजन उचलताना थोडे कठीण जाईल.
- त्यानंतर तुम्हाला असे वाटले पाहिजे की तुम्ही आणखी वजन उचलू शकता पण असे नाही. असे केल्यास तुम्हाला
- श्वास घेता येणार नाही किंवा तुमचे स्नायू दुखतील.
- प्रत्येक सेट दरम्यान 60 सेकंदांपेक्षा जास्त विश्रांती घेणे आवश्यक आहे.
- तुम्ही नवशिके असाल तर तुम्ही तुमच्या शरीराच्या समान वजनाएवढे वजन उचलले पाहिजे.
- जीमला जात असताना स्टेप बाय स्टेप ध्येय निश्चित करा.
- सर्वप्रथम तुम्हाला तुमचे ध्येय माहित असले पाहिजे की तुम्हाला काय साध्य करायचे आहे. जर तुम्हाला फिटनेस,
- किंवा ताकद प्रशिक्षण हवे असेल किंवा तुम्हाला मसल्सचा आकार वाढवायचा असेल तर. प्रत्येक ध्येयासाठी
- तुम्हाला वेगवेगळ्या आकाराचे वजन उचलावे लागेल आणि कठोर परिश्रम करावे लागतील.
https://www.instagram.com/reel/CupADYgtE8X/?utm_source=ig_web_copy_link&igshid=MzRlODBiNWFlZA==
एकूणच शारीरिक तंदुरुस्तीसाठी
जर तुम्ही नवशिके असाल किंवा तुमचा संपूर्ण फिटनेस टिकवून ठेवायचा असेल तर तुम्ही दररोज 8 ते 12 वेळा 3 सेट मध्ये व्यायम केला पाहिजे. हे करण्यासाठी, तुम्ही वर दिलेल्या माहितीच्या आधारे वजन निवडा. जर तुम्ही एखादे सेशन केले जे तुमच्या संपूर्ण शरीरावर परिणाम करत असेल तर तुम्ही ते आठवड्यातून दोन किंवा तीन वेळा करू नये.
तर या काही टिप्स होत्या ज्या तुम्ही वेट लिफ्टिंग दरम्यान फॉलो करू शकता. तुमच्यासाठी किती वजन पुरेसे असेल हे तुमच्या शरीराला माहीत आहे, त्यामुळे तुमच्या शरीराच्या क्षमतेनुसार वेट लिफ्टिंग करण्याचा प्रयत्न करा. आणि कोणताही व्यायाम करताना फिटनेस तज्ञाच्या देखरेखीखाली करा.