Conjunctivitis Causes and Prevention : दिल्ली आणि एनसीआरमध्ये गेल्या दहा दिवसांपासून यमुनेच्या पाण्याची पातळी वाढली आहे. त्यामुळे पुराची स्थिती कायम आहे. पाणी साचल्यामुळे डेंग्यू आणि मलेरिया यांसारख्या जलजन्य आजारांनी बाधितांची संख्या तर वाढत आहेच, शिवाय डोळ्यांच्या बुबुळाच्या पुढील भागाचा होणारा दाह किंवा डोळे लाला होण्याचा त्रासही वाढला आहे. डोळे लाल होणे, डोळ्यांना सूज येणे, खाज सुटणे, जळजळ होणे यासारख्या समस्या या आजाराचे लक्षण आहेत. या संसर्गजन्य रोगापासून स्वतःचे आणि आपल्या कुटुंबाचे रक्षण करण्यासाठी काही नियम फॉलो करणे गरजेचे आहे.
भारतात आय फ्लूची प्रकरणे का वाढत आहेत
गेल्या 10 दिवसांत सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये आय फ्लूची 20-25 प्रकरणे दररोज नोंदवली जात आहेत. हे प्रकरणांच्या सरासरी संख्येच्या चार पट असू शकतात. संपूर्ण भारतात मुसळधार पावसामुळे, ईशान्येकडील राज्यांमध्ये आय फ्लूच्या प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. गेल्या 10 दिवसांपासून हवामानात झपाट्याने बदल होत आहे. कधी उष्णतेची, कधी आर्द्रतेची समस्या आजारी पडण्याला कारणीभूत ठरत आहे. या ऋतूमध्ये बॅक्टेरियाची वाढ झपाट्याने होते. तसेच स्वच्छतेचे नियम पाळले नाहीत तर त्याचा डोळ्यांवर वाईट परिणाम होतो. एंटीबायोटिक-मेडिसीन रिएक्शनमुळे देखील आय फ्लूची होऊ शकतो.
आय फ्लू किंवा कंजंक्टिवायटिस म्हणजे काय?
आय लॅशेस आणि आय बॉलला जोडणाऱ्या पारदर्शक पडद्यामध्ये जळजळ किंवा संसर्गाची समस्या म्हणजे कंजंक्टिवायटिस किंवा आय फ्लू. हे व्हायरल किंवा बॅक्टेरियाचे संक्रमण, ऍलर्जी आणि पर्यावरणीय परिस्थितींसह विविध घटकांमुळे होते. बॅक्टेरियल आय फ्लू हा जीवाणूजन्य रोगजनकांमुळे होणारा डोळ्यांचा संसर्ग आहे. हवामानातील बदलामुळे, स्वच्छतेच्या नियमांचे पालन न केल्यामुळे किंवा प्रतिजैविकांच्या प्रतिक्रियेमुळे देखील हे होऊ शकते.
आय फ्लू टाळण्यासाठी हे उपाय करा
डोळ्यांना स्पर्श करण्यापूर्वी हात स्वच्छ करणे आवश्यक
हवामानात झपाट्याने बदल होत असताना स्वच्छतेचे नियम पाळणे सर्वात महत्त्वाचे आहे. सर्व प्रथम, साबण आणि कोमट पाण्याने वारंवार हात धुवा. किमान 15 सेकंद हात धुवा. आपल्या डोळ्यांना स्पर्श करण्यापूर्वी आणि नंतर आपले हात धुवा किंवा डोळ्यांमध्ये आयड्रॉप टाका.
आय फ्लू टाळण्यासाठी RO पाण्याने डोळे धुवा
नळाच्या पाण्यामधूनही दूषित घटक येऊ शकते. यामुळे तुमच्या डोळ्यांना संसर्ग होऊ शकतो. म्हणूनच नळाच्या पाण्याऐवजी आरओच्या पाण्याने डोळे साफ करणे डोळ्यांच्या आरोग्यासाठी चांगले असते.
डोळे चोळणे टाळा
आपल्या सवयीनुसार आपण वेळोवेळी डोळे चोळत असतो. ही सवय सोडा. एका डोळ्यात आय फ्लू असल्यास, तो दुसऱ्या डोळ्यात पसरू शकतो. हा रोग आढळल्यास डोळे ओल्या कपड्याने किंवा ताज्या कापसाच्या बॉलने दिवसातून अनेक वेळा स्वच्छ करा.
वस्तू शेअर करू नका
वॉशक्लोथ, टॉवेल, उशा, उशाचे कव्हर, डोळ्याचे ड्रॉप, मेकअप प्रोडक्ट्स, कॉन्टॅक्ट लेन्स, लेन्स स्टोरेज केस किंवा चष्मा एतरांना देवू नका किंवा घेऊ नका. या सर्व गोष्टी शेअर केल्याने व्हायरस किंवा बॅक्टेरियापासून संसर्ग पसरू शकतो.
कॉन्टॅक्ट लेन्स वापरू नका
तुम्ही कॉन्टॅक्ट लेन्स घातल्यास, ते व्यवस्थित स्वच्छ केले आहेत याची खात्री करा. आजकाल आय फ्लूमुळे कॉन्टॅक्ट लेन्स देखील बनवल्या जात आहेत. तुम्हाला आय फ्लू झाल्यास कॉन्टॅक्ट लेन्स घालणे थांबवा. बरे झाल्यानंतर किंवा डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर तुम्ही कॉन्टॅक्ट लेन्स वापरू शकता.
आय फ्लूवर उपचार
उपचारासाठी, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार अँटी-इंफ्लेमेटरी अँटीबायोटिक आय ड्रॉप्स वापरा. काही प्रकरणांमध्ये तोंडावाटे देखील मेडिसीन घेण्याची आवश्यकता असू शकते. तुम्हाला डोळ्यांचा कोमताही त्रास होत असल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा.