How to Control Cholesterol : तुमच्या रक्तात हाय कोलेस्टेरॉल असण्यामुळे हृदयविकार, हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोक यासारख्या अनेक आरोग्यविषयक भीती मनात येतात. कालांतराने, रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्टेरॉल तयार होऊ शकते, ज्यामुळे रक्तवाहिन्या अरुंद होऊ शकतात आणि आरोग्याशी संबंधीत अनेक अडथळे निर्माण करू शकतात. पण आहार आणि व्यायाम यासारख्या जीवनशैलीतील अनेक घटकांमुळे हाय कोलेस्टेरॉल अनेकदा कमी होवू शकते. (Controlling these lifestyle factors will reduce cholesterol levels)
सॅच्युरेटेड फॅट्स जास्त असलेले पदार्थ खाल्ल्यानेही कोलेस्ट्रॉलची पातळी वाढू शकते. काही वैद्यकीय परिस्थितींमुळेही कोलेस्टेरॉलची पातळी खराब होऊ शकते, जसे की दीर्घकालीन मूत्रपिंडाचा आजार आणि मधुमेह. तुमची अनुवांशिकता देखील तुमच्या उच्च कोलेस्टेरॉलचा धोका वाढवू शकतो. तुम्ही काय खाता याशिवाय, तुमच्या इतर जीवनशैलीच्या निवडींचा तुमच्या कोलेस्टेरॉलच्या पातळीवर कसा परिणाम होतो हे जाणून घेवूया.
जीवनशैलीत काही बदल करणे गरजेचे
कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यात मदत करण्यासाठी आपल्याला जीवनशैलीत काही बदल करणे गरजेचे आहे. जोपर्यंत तुमचा डॉक्टर तुम्हाला सल्ला देत नाही तोपर्यंत तुमच्या कोलेस्टेरॉलची पातळी मेंटेन ठेवणे ही तुमची जबाबदारी आहे. जर तुमची कोलेस्टेरॉल पातळी वाढली असेल तर व्यायाम, आहार, वजन किंवा ध्यान यांसाराख्या गोष्टींचा दैनंदीन जीवनात समावेश करणे आवश्यक आहे. आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याचे पालन करा. डॉक्टर तुम्हाला औषधे किंवा इतर आवश्यक उपायांचा सल्ला देऊ शकतात.
रोज व्यायाम करा
कमी घनतेचे लिपोप्रोटीन कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी व्यायाम उत्तम पर्याय आहे. ज्याला अनहेल्दी कोलेस्ट्रॉल असेही म्हणतात. नियमित वर्कआऊट केल्याने वजन मेंटेंन राहण्यास मदत होते. तुम्ही व्यायामशाळेत घाम गाळत नसला तरी दिवसभर शारीरिकदृष्ट्या सक्रिय राहणेही तुम्हाला कोलेस्टेरॉल लेवल कमी करण्यात मदत करू शकते. आठवड्यातून किमान 150 मिनिटांच्या शारीरिक हालचालींमध्ये भाग घेण्याचा सल्ला फिटनेस तज्ञ देतात. सुरुवातीला वेगाने चालण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुमच्या हृदयाचा व्यायम होईल. त्यानंतर पोहणे आणि सायकलिंग करणे सुरू करा.
रात्री 8 तास आवश्यक
प्रौढांनी रात्री 7-9 तास झोपेचे लक्ष्य ठेवले पाहिजे. जर तुम्हाला पुरेशी झोप मिळत नसेल, तर हाय कोलेस्टेरॉलचा धोका वाढू शकते. यासाठी दिवसाची सुरवात व्यायाम, योग, ध्यान, रनिंग, वॉकिंग, स्विमिंगने करा. यामुळे तुम्हाला शांत आणि चांगली झोप लागू शकते. जे लोक रात्री 8 तास झोपतात त्यांच्यात एचडीएल (चांगले कोलेस्टेरॉल) संख्या सर्वाधिक असते.
तणाव पातळी कमी करणे
दीर्घकालीन तणावामुळे शरीरात कोलेस्टेरॉलची पातळी वाढू शकते. यामुळे तुम्हाला हृदयविकाराचा धोका वाढू शकतो. हाय कोलेस्टेरॉल तसेच जीवनशैलीच्या इतर गंभीर परिस्थितींपासून दूर ठेवण्यासाठी तुमची तणाव पातळी कमी करणे गरजेचे आहे. ही सुद्धी निरोगी जीवनशैलीची सवय आहे. तणावात धुम्रपान आणि तंबाखूचे सेवन करणे बंद करा. अति धुम्रपानामुळे देखील कोलेस्टेरॉलची पातळी वाढू शकते.
ओमेगा-3 फॅटी ऍसिड
ओमेगा-3 फॅटी ऍसिड असलेले पदार्थ खा. ओमेगा-3 फॅटी ऍसिडचा एलडीएल कोलेस्टेरॉलवर परिणाम होत नाही. ओमेगा -3 फॅटी ऍसिड असलेल्या पदार्थांमध्ये सॅल्मन, मॅकेरल, हेरिंग, अक्रोड आणि फ्लेक्ससीड्स यांचा समावेश होतो. यामुळे हृदय निरोगी आणि रक्तदाब नियंत्रित रहाते.
जीवनशैलीतील बदल पुरेसे नसल्यास…
कधीकधी निरोगी जीवनशैलीतील बदल कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यासाठी पुरेसे नसतात. तुमच्या डॉक्टरांनी तुमचे कोलेस्टेरॉल कमी करण्यात मदत करण्यासाठी औषधाची शिफारस केल्यास, तुमच्या जीवनशैलीत बदल करत असताना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषध घ्या. जीवनशैलीतील काही बदल तुम्हाला तुमच्या औषधांचा डोस कमी करण्यास मदत करू शकतात.