Potatoes Benefits : बटाटे ही सर्वात लोकप्रिय भाज्यांपैकी एक आहे. तुम्हाला बाईपण भारी देवा चित्रपटातील अण्णा आठवतात का? त्यांना रोज जेवायला बटाट्याची भाजी लागते. ज्यादिवशी बटाट्याची भाजी नसते त्यावेळी त्यांना जेवण जात नाही. तुम्हालाही बटाटा आवडतो का? बटाटा बाजारात स्वस्त आणि मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत आणि तो अनेक प्रकारे तयार केला जाऊ शकतो. उकडलेले, बेक केलेले, मॅश केलेले, चिप किंवा तळणे असे विविध प्रकार करून नवनवीन पदार्थ तुम्ही तयार करू शकता. (Is eating potatoes every day good for health)
बटाट्यांमध्ये कर्बोदकांचे प्रमाण जास्त असते
पण हे बटाटे हेल्दी आहेत की नाही यावर मोठ्या प्रमाणावर चर्चा झाली आहे. एकीकडे बटाट्याची भाजी आवडते तर दुसरीकडे बटाटे खावे की नाही याबाबत डॉक्टरांचा सल्ला घेतला जात आहे. बटाट्यांमध्ये कर्बोदकांचे प्रमाण जास्त असते आणि ते हाय-ग्लायसेमिक असतात, याचा अर्थ ते खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. अनेक आरोग्य तज्ज्ञांच्या मते बटाटे आरोग्यदायी आणि पौष्टिक असतात. त्यामध्ये फायबर, पोटॅशियम, लोह, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन बी 6 यासह फायदेशीर पोषक असतात.
बटाटे शक्य हेल्दी खायचे असतील तर…
असे असले तरी अनेक लोकांना बटाटे अस्वास्थ्यकर वाटतात याचे कारण म्हणजे ते ज्या पद्धतीने तयार केले जातात ते सहसा निरोगी नसतात हे तुम्ही लक्षात घेतले पाहिजे. बटाटे सारखेच असतात, परंतु निरोगी किंवा अस्वास्थ्यकर असणे हे तुम्ही ते कसे शिजवता किंवा त्यापोसून कोणता पदार्थ तयार करता यावर अवलंबून आहे. उदाहरणार्थ, फ्रेंच फ्राईज, जे तेलात तळलेले बटाटे असतात, ते साध्या भाजलेल्या किंवा उकडलेल्या बटाट्याइतके पौष्टिक नसतात. जर तुम्हाला बटाटे शक्य तितके हेल्दी खायचे असतील तर तुम्ही ते डीप फ्राय करण्याऐवजी बेक करू शकता, उकळू शकता किंवा एअर फ्राय करू शकता.
कार्बोहायड्रेट्स प्रोटीनपेक्षा लवकर पचतात
बटाट्यामध्ये असलेले कर्बोदके मेंदू आणि शरीरासाठी ऊर्जेचा मुख्य स्त्रोत आहे, विशेषतः हेवी वर्कआऊटदरम्यान कार्बोहायड्रेटयुक्त पदार्थ खाणे तुमच्यासाठी आवश्यक आहे. कार्बोहायड्रेट्स प्रोटीनपेक्षा लवकर पचतात आणि शरीरात शोषले जातात. तुम्ही बटाटे कसे शिजवावे यासोबतच, तुम्ही ते कशासोबत काता यावरही काही गोष्टी अवलंबून असतात. चीज किंवा मेयो सारख्या हाय-कॅलरीसोबत बटाटे खाणे टाळा.
बटाट्यातील फायबर आणि पोटॅशियम हृदयासाठी चांगले
रोज एक बटाटा खाण्याचे अनेक फायदे होऊ शकतात. आरोग्य तज्ञांच्या म्हणण्यानुसार, जोपर्यंत बटाटे तळलेले नाही किंवा उच्च प्रमाणात सॅच्युरेटेड फॅट असलेल्या पदार्थांसोबत जोडत नाही तोपर्यंत ते तुमच्या आरोग्यसाठी चांगले असतात. बटाट्यातील फायबर आणि पोटॅशियम हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले असते. पोटॅशियम स्नायूंच्या कार्य सुरळीत करते. तुमचे हृदय हा एक महत्त्वाचा स्नायू आहे ज्याला पोटॅशियमची आवश्यकता असते.
वजन मेंटेन ठेवण्यासाठी
जर तुम्ही वजन कमी करणारा आहार घेत असाल, तर तुम्ही दररोज बटाटे खाऊ शकता. वजन मेंटेन ठेवण्यासाठी अनेकदा बटाटे खाण्याचा सल्ला दिला जातो. पण लक्षात ठेवा बटाटे अशा प्रकारे शिजवू नका किंवा त्यापासून असे पदार्थ तयार करू नका की त्यात कॅलरीज जास्त असतील. जसे की तळलेले पदार्थ.