Possessive Vs Protective Relationship : जेव्हा एखादी व्यक्ती एखाद्यावर प्रेम करते आणि त्याच्यासोबत रिलेशनमध्ये असते तेव्हा त्याला पार्टनरशी संबंधित प्रत्येक गोष्टीची जाणीव असते. जसे तो काय करतोय?, कुठे चालला आहे?, कोणाशी बोलत आहे? आणि तो कोणासोबत हँग आउट करत आहे इ. पण ही गोष्ट जेव्हा मर्यादेत असते तेव्हा सगळ्यांना छान वाटते आणि कोणीतरी खरंच प्रेम करतंय असं वाटतं. (Know the difference between Possessive and Protective Relationship)
पण जेव्हा ती मर्यादा ओलांडू लागते तेव्हा हेच प्रमाचे नाते ओझे वाटू लागते आणि माणसे गुदमरायला लागतात. याचा अर्थ असा की जेव्हा कोणीतरी रिलेशनशीपमध्ये असते आणि त्याचा जोडीदार त्याच्या आयुष्यात प्रत्येक छोट्या-छोट्या गोष्टीत हस्तक्षेप करतो, तेव्हा अनेकांना समजत नाही की आपला जोडीदार संरक्षणात्मक आहे की मालकी हक्क गाजवत आहे. म्हणून आज आम्ही तुम्हाला पझेसिव्ह आणि प्रोटेक्टिव्हमधला फरक सांगत आहोत.
पझेसिव्ह नातेसंबंध (Possessive Relationship)
- पझेसिव्ह नातेसंबंधात तुम्ही तुमच्या जोडीदारासोबतच आनंदी रहावे अशी पार्टनरची इच्छा असते. जर तुम्ही दुस-या कोणामुळे आनंदी असाल, मग ते तुमचे आई-वडील, मित्र, भावंड, शेजारी किंवा इतर कोणीही असो, तो ते अजिबात सहन करणार नाही आणि तुम्हाला पूर्णपणे वेगळे करण्याचा प्रयत्न करेल.
- जर तुमचे खास मित्र असतील ज्यांच्यासोबत तुम्हाला चांगले वाटत असेल किंवा तुम्हाला आनंदी वाटत असेल, फिरायला आणि भेटायला आवडत असेल तर तुमचा पार्टनर तुम्हाला त्यांच्यापासून वेगळे करेल. आणि आपण त्याच्याशी पुन्हा कधीही बोलू नये अशी त्याची इच्छा असेल.
- अशी व्यक्ती तुमची सर्व सपोर्ट सिस्टम तोडण्याचा प्रयत्न करेल आणि तुम्ही पूर्णपणे त्याच्यावर अवलंबून राहावे अशी तिची इच्छा असेल.
- पझेसिव्ह पार्टनर तुम्हाला बदलण्याचा देखील प्रयत्न करेल. तुम्ही त्याच्या मनाप्रमाणे जगावे, त्याला जे आवडते तेच करावे अशी त्याची इच्छा असेल.
- पझेसिव्ह पार्टनर तुम्हाला प्रत्येक गोष्टीवर प्रश्न विचारेल. तुम्ही काय करत आहात, कसे करत आहात आणि कोणासोबत आहात, याचा प्रत्येक वेळी समाचार घेणार.
- आपण भेटतो तेव्हा प्रत्येक वेळी फोन तपासणे, त्याने कॉल केल्यावर त्याचा फोन न उचलणे, तो ऑनलाइन असताना त्याच्याशी न बोलणे आणि आपण फोनवर व्यस्त असल्यास, पझेसिव्ह पार्टनर अजिबात सहन करणार नाही.
- अशी व्यक्ती तुमच्या प्रत्येक गोष्टीवर टीका करेल आणि तुमचा स्वाभिमान कमी करण्याचा प्रयत्न करेल.
- जर तुम्ही तुमच्या पझेसिव्ह पार्टनरचे ऐकले नाही किंवा प्रश्नांची उत्तरे दिली नाहीत तर तो तुम्हाला टॉक्सिक पद्धतीने ट्रिट करू शकतो.
प्रोटेक्टिव पार्टनर (Protective Relationship)
- प्रोटेक्टिव पार्टनरचा एकमेव उद्देश तुम्हाला आनंदी पाहणे हा असेल. मग तुम्ही त्याच्यासोबत आनंदी असाल, तुमच्या कुटुंबीयांसह किंवा मित्रांसोबत याने त्याला काही फरक नाही पडत, त्याला फक्त तुमचा आनंद महत्वाचा वाटतो.
- प्रोटेक्टिव पार्टनर तुम्हाला पुन्हा पुन्हा कॉल करेल परंतु याचा अर्थ तुमच्यावर संशय घेणे नाही तर तुमची काळजी करणे असा आहे.
- जर तुम्ही तुमच्या कोणत्याही मित्राला भेटायला जात असाल किंवा तुमच्या कुटुंबासोबत खरेदीला जात असाल तर तो तुम्हाला एंजॉय करण्यास सांगेल.
- जर तुम्ही रात्री बाहेर जात असाल तर तुमचा प्रोटेक्टिव पार्टनर तुम्हाला कॉल करेल आणि तुमच्याबद्दल विचारेल, यामागचा उद्देश तुमची काळजी करणे हा असेल.
- काहीवेळा असे होऊ शकते की तुमचा प्रोटेक्टिव पार्टनर तुम्हाला तुमच्या आजूबाजूच्या लोकांशी किंवा मित्रांशी बोलण्यास मनाई करेल, परंतु ते असे करतात जेणेकरून कोणीही तुमचा गैरफायदा घेऊ नये, तुम्हाला त्रास देऊ नये आणि तुम्ही सुरक्षित असाल.
- प्रोटेक्टिव पार्टनर तुम्हाला नेहमी सुरक्षित वाटेल असे वातावरण तयार करेल. तो तुम्हाला नेहमी मी तुझ्यासोबत असेल याची वेळोवेळी जाणून करून देतो.
- जर तुम्हाला एखादी गोष्ट माहित नसेल आणि तुम्ही तुमच्या पार्टनरला विचाराल तर तो तुम्हाला नक्कीच पूर्ण माहिती देईल. पण तुम्ही त्याच्यावर किंवा इतर कोणावरही अवलंबून राहावे अशी त्याची इच्छा नसते.