Health Benefits of Marriage : असं म्हणतात की “शादी का लड्डू खाये तो भी पछताये, ना खाये तो भी पछताये!” लग्न करणे आणि न करणे या दोन्ही गोष्टींचे आप-आपले फायदे आणि तोटे आहेत. बऱ्याचवेळा लग्नानंतर आपल्याला कसा त्रास होतो, काय समस्या येतात यावरचं मोठ मोठ्या चर्चा ऐकायला मिळतात. त्याचवेळी लग्न झाल्यामुळे आयुष्यात सुख, शांती, समाधान या गोष्टी आल्याचीही अनेक उदाहरण आहेत. दुसऱ्या बाजूला लग्न न झालेल्यांना स्वतंत्र वाटते, तर अनेकवेळा लग्न झाले नाही म्हणून होणारी दुःखही वेगळी असतात. आपण फक्त त्याकडे सकारात्मक की नकारात्मक नेमके कोणत्या दृष्टिकोणातून बघतो हे महत्वाचे ठरते. (How is marriage beneficial for health)
पण लग्न हे आरोग्यासाठी चांगलं असू शकते याचा तुम्ही विचार कधी तरी केलाय का? किंवा अशी चर्चा कुणी करताना ऐकलंय का? आता कसं तर, आपण सर्व व्यायाम करू शकतो आणि निरोगी आहार घेण्याच्या सवयींचे पालन करू शकतो, परंतु विवाहित जोडप्यांना याचा आपोआप फायदा होतो, कारण लग्न हे जीवन रक्षक किंवा सीट बेल्टसारखे आहे. शिकागो विद्यापीठातील समाजशास्त्रज्ञ आणि द केस फॉर मॅरेजच्या लेखिका, लिंडा वेट यांनी न्यूयॉर्क टाइम्सला सांगितले की, “चांगला आहार घेणे, व्यायाम करणे आणि धूम्रपान न करणे या यादीमध्ये लग्न करणे हे देखील एक चांगल्या आरोग्याच्या सवयींमध्ये येते.
लग्न कसे ठरते आरोग्यासाठी फायदेशीर? (How is marriage beneficial for health?)
जेव्हा कपल एकमेकांच्या निरोगी सवयींचे अनुकरण करतात तेव्हा विवाह आरोग्यासाठी सर्वात जास्त मदत करतो. ब्रिघम यंग युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी 51 ते 61 वयोगटातील 4 हजार 746 विवाहित जोडप्यांचा अभ्यास केला, तेव्हा त्यांना आढळून आले की, आरोग्याच्या स्थितीचा विचार केल्यास कपल एकमेकांना मोटिव्हेट करतात. जर पुरुषाची तब्येत बरी असेल तर त्याची पत्नी त्याची काळजी घेते. महिलांच्या मासिक पाळीच्या काळात अनेक पुरुष आपल्या पत्नीची काळजी घेतात. पोषक आहार, व्यायाम आणि तणाव कमी करण्याच्या बाबतीत कपल एकमेकांना सपोर्ट करतात.
अनेकदा तुम्हाला जीममध्ये देखील कपल पॅकेजची ऑफर दिली जाते. यामागचे कारण कधी शोधण्याचा प्रयत्न केलाय का? याचे कारण म्हणजे लग्नामुळे भावनिक ताण कमी होतो. कारण कपल एकमेकांना आपल्या भावना, मनातील शंका आणि प्रोब्लेम्स शेअर करतात, यातून प्रोब्लेम्सचे सोल्युशनही मिळते. यावरून निरोगी जीवनासाठी विवाह हा एक चांगला पर्याय आहे असे म्हणायला हरकत नाही. यामुळे केवळ तुमचे वैयक्तिक आरोग्य सुधारत नाही, तर तुम्ही एकत्रितपणे अनेक चांगल्या गोष्टी करण्यासाठी स्वत:ला संधी देत असता. हा अनुभव खरा आहे का हे तपासण्यासाठी आम्ही काही कपल्ससोबत चर्चा केली. या चर्चेमध्ये 25 ते 55 वयोगटातील कपल्सनी आमच्यासोबत संवाद साधला.
अनेकदा आम्ही एकमेकांच्या आरोग्याबद्दल चर्चा करतो :
अमोल आणि प्रणिता यांनी आम्हाला सांगितलं की, “जेव्हा आम्ही रात्री टेरेसवर किंवा जेवणानंतर बाहेर फिरायला जातो तेव्हा अनेकदा आम्ही एकमेकांच्या आरोग्याबद्दल चर्चा करतो. यादरम्यान, माझं वजन वाढलं म्हणून अमोल मला ते कसं कमी करायचं, त्यासाठी कोणता व्यायाम करायचा, तो कसा करायचे हे सांगत असातात. कधी बाहेर फिरायला किंवा वर्कआऊट करायला जाण जमलं नाही तरी घरच्या टेरेसवर आम्ही जेवणानंतर थोडा वेळ फिरतोय. यावेळी कधी जास्त जेवण झालं किंवा अनहेल्दी खाण्यात आलं तर मी अमोलला, तुमच पोट वाढलं आहे ते कमी करा, खाण्यापिण्याचा सवयींवर नियंत्रण ठेवा हे सांगते. कधी कधी आम्ही दोघही अनहेल्दी फूड खाणे टाळतो. या सर्व गोष्टी पार्टनर केअरिंग असल्याने शक्य आहे.”
कपल्स एकमेकांना वजन कमी करण्यास मोटिव्हेट करतात (Couples motivate each other to lose weight)
अॅडव्होकेट असलेल्या माधुरी आणि त्यांचे मिस्टर मनिष यांनी आपले अनुभव शेअर केले. माधुरी म्हणाल्या, “लग्नानंतर शरीरातील होर्मोन्स बदलतात. शारिरीक संबंध आल्याने महिलांमध्ये वेटगेन होते. पण हा बदल मनिषने स्वीकारला आणि मला वेटलॉससाठी मोटिव्हेट केलं. हे सांगत असताना, माझं वजन वाढलं किंवा मी सुंदर दिसत नाही म्हणून त्यांनी मला वेट लॉसचा सल्ला दिला नाही तर, माझ आरोग्य चांगलं रहावं, कामाच्या ठिकाणचा ताण कमी व्हावा, त्याचबरोबर हेल्दी आयुष्य जगावं म्हणून मी वजन कमी करावं अस मला समजावून सांगितलं.”
“मुळात आपला पार्टनर जेवढी केअर स्वत:ची करतो तेवढीच आपल्या पार्टनरची करतो. कारण केअरिंग हे देखील प्रेम व्यक्त करण्याचा एक पार्ट आहे. लग्नाआधी कधी कधी मी आरोग्याकडे दुर्लक्ष करायचे. परंतु लग्नानंतर मी आणि माझा पार्टनर दोघंही एकमेकांची काळजी घेतो. एकमेकांना आरोग्यदायी जीवन जगण्यासाठी मोटिव्हेट करतो. यामुळे आम्हा दोघांमध्ये चांगला संवाद होतो आणि प्रेमही वाढते. यावरून असे दिसून येते की कपल्समध्ये एकाला कंटाळा आला तर दुसरा त्याला मोटिव्हेट करू शकतो. वेट लॉस करत असताना एकमेकांना सपोर्ट करू शकतो आणि वजन मेंटेन ठेवण्याचे महत्व पटवून देवून आपल्या पार्टनरवरचे प्रेमही व्यक्त करू शकतो.”
सकाळी 30 मिनिट एकत्र मॉर्निग वॉक केल्याचा फायदा आम्हाला दिवसभराच्या कामासाठी उत्साही ठेवतो :
अनेकदा आपण एकटे असलो तर जीमला किंवा मॉर्निंग वॉकला जायचा कंटाळा करतो. पण आपल्या पार्टनरसोबत मॉर्निंग किंवा इव्हनिंग वॉक करताना उत्साही असतो. कारण एक पर्सन जेव्हा रिलेशनशीपमध्ये येतो तेव्हा तो आपल्या पार्टनरला प्रत्येक गोष्टीसाठी मोटिव्हेट आणि सपोर्ट करत असतो.
लग्नाला तब्बल 28 वर्ष झालेले मनिषा आणि संदिप म्हणाले, “एवढ्या वर्षांनंतरही आम्ही एकमेकांना आरोग्याबद्दल मोटिव्हेट करतो. कधीकधी मला कंटाळा आला तर संदिप मला जबरदस्तीने उठवून फिरायला घेवून जातात आणि सांगताता की, तारूण्यात माझं एकलं असतं तर या वयात अशी दुखणी आली नसती. यावरून आमच्या संवादामध्ये विनोद होतो. निसर्गाच्या सानिध्यात फिरायला गेल्याने पॉझिटिव्ह व्हाईब्स येतात, आमचा मूड फ्रेश राहतो. सकाळी 30 मिनिट एकत्र मॉर्निग वॉक केल्याचा फायदा आम्हाला दिवसभराच्या कामासाठी उत्साही ठेवतो. नाती आहेत तर ताण तणाव राहणारच पण तुम्ही त्या परिस्थितीला कसे हाताळता आणि आपल्या पार्टनरसोबत योग्य संवाद साधून कसे समजून घेताय यावर तुमच्या नात्याचे भविष्य अवलंबून असते.”
पती-पत्नींनी एकत्रितपणे स्वतःच्या आरोग्याची जबाबदारी घेतली पाहिजे
प्रसाद आणि प्रियंका सांगतात, “पारंपारिक घरात राहणाऱ्या पति-पत्नीला एकमेकांकडे लक्ष द्यायला संधी मिळत नाही. किंवा अनेक कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे ते एकत्र फिरायला जावू शकत नाही. अशा वेळी आपण आपली काळजी घ्यायला हवी. पौष्टिक जेवण करून आपली आणि आपल्या कुटुंबियांचा काळजी घेतली पाहिजे. तणावमुक्ती राहून, घरात विनोदी वातावरण ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. यातून देखील आपल्या वैवाहिक आरोग्याचे रक्षण होते.
अनेकदा पूर्णवेळ काम करणारा पती असेल तर त्याच्या चांगल्या आरोग्याची शक्यता 25 टक्के कमी होते. त्याचवेळी पत्नी घर सांभाळून जॉब करत असेल तर तिचे आरोग्याकडे दुर्लक्ष होते. जेव्हा बाळ होतं आणि फॅमिली वाढते तेव्हा कपल्सचे कितीही प्रेम असले तरी कामाच्या व्यापामुळे आपण पर्सनली पार्टनरकडे लक्ष देवू शकत नाही. अशावेळी, पती-पत्नींनी एकत्रितपणे स्वतःच्या आरोग्याची जबाबदारी घेतली पाहिजे. तु माझ्याकडे लक्ष देत नाही म्हणून आरोप करण्यापेक्षा आपण आपल्या आरोग्याची वैयक्तिक काळजी घेवून एक संघ म्हणून काम केल्याने चांगले परिणाम मिळतात, असेही हे दोघे सांगतात.”