Sex Education : आजही आपल्या समाजात फार कमी लोक सेक्सबद्दल उघडपणे बोलू शकतात. यामुळे, जेव्हा लैंगिक जीवनात समस्या उद्भवतात तेव्हा लोक मासिकांमध्ये किंवा मित्रांच्या गप्पांमध्ये उपाय शोधू लागतात, पण तेव्हा त्यांना मित्राच्या मार्गदर्शनाची नाही तर चांगल्या लैंगिक शिक्षणाची आवश्यकता असते. सेक्सशी संबंधित आपण त्या पाच गोष्टींबद्दल जाणून घेवूया ज्या प्रत्येक लैंगिकदृष्ट्या सक्रिय असणाऱ्या कपल्ससाठी जाणून घेणे महत्त्वाचे आहे. (These 5 things about sex education are very important for couples to know)
काय प्रॉब्लेम आहे?
बरेच लोक त्यांच्या लैंगिक जीवनाबद्दल आणि जीवनात लैंगिकतेच्या अभावाबद्दल खूप चिंतित असतात परंतु त्यांच्या असंतोषासाठी त्यांनी कोणती पावले उचलली पाहिजेत याबद्दल ते उदासीन असतात. इतकेच नाही तर त्यांच्या समस्यांची उत्तरे आणि निराकरणासाठी योग्य व्यक्तीशी संपर्क साधण्याऐवजी ते मित्रांशी बोलतात, गप्पा मारतात आणि कधीकधी ऑनलाइन पॉर्नमध्येही अडकतात. वस्तुस्थिती अशी आहे की जे बहुतेक लोक लैंगिक तज्ञांना भेट देतात त्यांना कोणतीही वैद्यकीय समस्या नसते, परंतु ते गैरसमज आणि समाजाच्या लाजेला बळी पडतात.
लैंगिक जीवनाची तुलना मित्रांशी (Comparing sex life with friends)
याबाबत तक्रार करणारी बहुतांश जोडपी 30 ते 40 वयोगटातील आहेत. अशा तक्रारी करणारे लोक निरोगी असतात, पण त्यांच्यात जवळीकता नसते. त्यांची सर्वात मोठी समस्या ही आहे की ते त्यांच्या लैंगिक जीवनाची तुलना त्यांच्या मित्रांशी किंवा मासिकांमध्ये वाचलेल्या लोकांशी करू लागतात. त्यामुळे सर्वात आधी तुमच्या सेक्सलेस रिलेशनशिपमागील कारणे शोधा. आरोग्याशी निगडीत समस्या असल्यास ते वैद्यकीय पद्धतीने सोडवा आणि नातेसंबंधात समस्या असल्यास समुपदेशनाद्वारे काही प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा. अनेक वेळा कपल्स त्यांच्या कामात, स्मार्टफोनमध्ये आणि जबाबदाऱ्यांमध्ये इतके व्यस्त होतात की ते एकत्र वेळ घालवू शकत नाहीत. त्यामुळे कारण समजताच त्यावर उपायही तुमच्यासमोर असते हे लक्षात घ्या.
इरेक्टाइल डिसफंक्शनच्या समस्या (Erectile dysfunction problems)
40 किंवा 50 वर्षे वयोगटातील अनेक लोक बेडरूममध्ये परफॉर्म करू शकत नाहीत कारण त्यांचे शरीर सेक्स करण्यास सक्षम नसते. ते मधुमेह, उच्च रक्तदाब आणि लठ्ठपणाचे बळी ठरले आहेत आणि त्याकडे लक्षही देत नाहीत. आकडेवारीनुसार, 40 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या सुमारे 50 टक्के पुरुषांना इरेक्टाइल डिसफंक्शनच्या समस्येने ग्रासले आहे. अशा परिस्थितीत जेव्हा ते सेक्स करू शकत नाहीत तेव्हा ते स्वत:ला कमजोरी समजतात. इतकंच नाही तर त्यांचा पार्टनर त्यांच्याबद्दल काय विचार करेल, यामुळे ते सेक्स करायलाही लाजतात. तर वास्तविकता अशी आहे की कोणतीही व्यक्ती वयाच्या 90 वर्षापर्यंत सेक्स करू शकते. पुरुषांना हे समजले पाहिजे की शीघ्रपतन हा एक आजार नसून वर्तन समस्या आहे जी सहज सोडवता येते.
लैंगिक फॅंटसी (sexual fantasy)
सामान्यतः, वचनबद्ध नातेसंबंधात इतरांबद्दल कल्पना करणे, म्हणजे लैंगिक संबंधादरम्यान एखाद्याची कल्पना करणे, याकडे संशय आणि अपराधीपणाने पाहिले जाते. लोकांचा असा विश्वास आहे की इतरांबद्दल लैंगिकदृष्ट्या विचार करणे म्हणजे फसवणूक. लैंगिकदृष्ट्या कोणत्यातरी बाजूने आकर्षित होणे हा मानवी स्वभाव आहे. एखाद्या व्यक्तीशी नातेसंबंधात असणे ही आपली निवड आहे, सक्ती नाही. मत्सर आणि संशयाच्या भावनांनी स्वतःला दुखावण्याऐवजी, आपल्या इच्छांबद्दल आपल्या जोडीदाराशी मोकळेपणाने बोला. तसेच, जोडीदार जे काही म्हणतो ते धीराने ऐका.
सेक्समध्ये स्पर्धा करण्याऐवजी बेडरूममधील तुमचे कौशल्ये सुधारा (Don’t compete in sex)
असुरक्षितता, अस्वस्थता, अतिसंवेदनशीलता आणि अपुरेपणाची भावना नवीन युगातील जोडप्यांमध्ये खूप सामान्य आहे, विशेषतः जर कपल्समधील एका पार्टनरचा काही लैंगिक भूतकाळ असेल तेव्हा काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते. उदा. अशा प्रकारच्या असुरक्षिततेमुळे अनेक महिला कॉस्मेटिकचा वापर करून, जननेंद्रियाच्या क्षेत्राचे सौंदर्यीकरण करून स्तन आणि नितंब मोठे करताता यामुळे पुरुषांना सेक्स करताना कंफर्टेबल फील होत नाही. दोन्ही भागीदारांनी हे समजून घेतले पाहिजे की चांगला सेक्स हे तुमच्या शारीरिक आकाराशी संबंधित नसून भावनिक जवळीकतेशी संबधीत आहे. तुमचा पार्टनर तुमच्यासोबत असतो कारण तो तुम्हाला आवडतो आणि तुम्ही त्याला आवडता. त्यामुळे सेक्समध्ये स्पर्धा करण्याऐवजी तुमच्या बेडरूममधील कौशल्ये सुधारण्याचा प्रयत्न करा.