World Sexual Health Day 2023 : जागतिक लैंगिक आरोग्य दिनानिमित्त, WHO प्रत्येक व्यक्तीचा लैंगिक आरोग्याचा हक्क साजरा करतो. या वर्षीच्या जागतिक लैंगिक आरोग्य दिनाची थीम ‘संमती!’ आहे, लैंगिक संबध ठेवताना एकमेकांची संमती आणि परस्पर आदराचे महत्त्व समजून घेणे हा या थीमचा उद्देश आहे. लोकांकडे लैंगिक आरोग्याबाबत संपूर्ण आणि अचूक माहिती असली पाहिजे जेणेकरून ते त्यांच्या लैंगिक आरोग्याच्या बाबतीत जागरूक राहू शकतील. हा जागतिक लैंगिक आरोग्य दरवर्षी 4 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. लैंगिक आरोग्यबाबत लोकांमध्ये जागृकता निर्माण करणे हे उद्देश ठेवून World Sexual Health Day जगभर सेलिब्रेट केला जातो. (World Sexual Health Day 2023 Why is sexual consent important in a relationship)
जागतिक लैंगिक आरोग्य दिनाची थीम काय आहे? World Sexual Health Day 2023 Theme
सेक्स ही रोमांचक, मोहक, खेळकर आणि सुखद फिलींग आहे ती तुम्ही जितकी चांगल्या पद्धतीने अनुभवाल तितका तुम्हाला जास्त आनंद मिळेल. तुमच्या लैंगिक जीवनावर नकारात्मक परिणाम करू शकणार्या विविध समस्या शेअर केल्याने कमी होवू शकतात. म्हणून लैंगिक संबध ठेवताना आपल्या पार्टनरसोबत सुसंवाद होणे गरजेचे आहे. संवाद, प्रामाणिकपणा आणि आदर यामुळे लैंगिक संबंध चांगले होतात. संमती मागणे आणि मिळवणे हे स्वतःचा आणि तुमच्या जोडीदाराचा एकमेकांप्रती असलेली आदराची भावना दर्शवते. हे एका भागीदाराला दुसऱ्यावर वाटू शकणारी हक्काची भावना कमी करते. तुमचे शरीर किंवा तुमची लैंगिकता दुसऱ्या कोणाचीही नसून आपल्या शरीराचे आपण बॉस आहोत ही फिलिंग तयार होते. म्हणून आज आपण World Sexual Health Day च्या थीम नुसार लैंगिक संबध ठेवताना एकमेकांची संमती आणि परस्पर आदर असणे का महत्वाचे आहे ते समजून घेणार आहोत.
लैंगिक संमती म्हणजे काय? What is sexual consent?
- संमती एक बुद्धिमान, जाणकार, ऐच्छिक, शांत, उत्साही, सर्जनशील, इच्छित, माहितीपूर्ण, परस्पर, प्रामाणिक आणि स्पष्टपणे केलेला लैंगिक करार असू शकते.
- संमती ही एक प्रक्रिया आहे: जर तुम्हाला लैंगिक जवळीकीच्या पुढील स्तरावर जायचे असेल तर तुम्ही आपल्या पार्टनरची संमती घेतली पाहिजे.
- संमती कधीही निहित नसते आणि ती गृहीत धरली जाऊ शकत नाही, अगदी नातेसंबंधाच्या संदर्भात देखील तुम्ही आपल्या पार्टनरची संमती गृहीत धरू नये. तुम्ही रिलेशनशिपमध्ये आहात याचा अर्थ असा नाही की तुम्हाला तुमच्या पार्टनरसोबत सेक्स करण्याची परवानगी आहे.
- कोणताही निर्णय घेण्यासाठी आणि तुमच्या जोडीदाराशी संवाद साधण्यासाठी तुम्ही पूर्ण शुद्धीत असणे गरजेचे आहे.
- प्रत्येक नकाराचा अर्थ “होय” असा होत नाही, तेव्हा तुमचा पार्टनर एखाद्या प्रसंगी तुम्हाला नकार देत असेल तर त्याच्या नकाराचा आदर करा. कारण लैंगिक संबंधाच्या निर्णयामध्ये दोन्ही लोकांचा सहभाग असणे आवश्यक आहे.
नात्यात लैंगिक संमती घेणे का महत्वाचे आहे? Why is sexual consent important in a relationship?
थोडक्यात, लैंगिक संमती म्हणजे जेव्हा तुम्ही आणि तुमचा लैंगिक साथीदार दोघेही लैंगिक संबंध ठेवण्यास किंवा कोणत्याही प्रकारच्या लैंगिक क्रियाकलापात गुंतण्यास सहमती देता. तुम्ही आणि तुमचा जोडीदार जे करत आहात त्याबद्दल तुम्हाला सोयीस्कर असल्याची खात्री करण्यासाठी कोणत्याही लैंगिक क्रियाकलापादरम्यान एकमेकांशी संवाद साधला पाहिजे. तुम्ही रिलेशनशीपमध्ये असाल तर आपल्या पार्टनरच्या लैंगिक संमतीला महत्व द्या. यामुळे तुमचा आदर आणि नात्यातील प्रेमाची भावना वाढून तुमचं नातं आणखी समृद्ध होईल.