What Is Makeup Sex : जर तुम्ही रोमँटिक चित्रपटांचे शौकीन असाल तर तुम्ही अनेकदा पाहिले असेल की दोघांमध्ये खूप वाद होतात, एकमेकांवर खूप ओरडतात आणि एका तणावपूर्ण शांततेनंतर कपल एकमेकांना डिप किस करतात. पॉप संस्कृती अनेकदा मेक-अप सेक्सला सर्वोत्तम सेक्सपैकी एक आणि कपलमधील रोमँटिक परस्परसंवादाचा सर्वात तीव्र प्रकार म्हणून संबोधीत करते. एड्रेनालाईनच्या नशेत कपल एकमेकांबद्दलचे प्रेम पुन्हा जागृत करू शकतात. म्हणून आज आपण मेकअप सेक्समुळे तुमच्या नात्यावर काय परिणाम होतो, त्याचे फायदे आणि तोटे काय आहेत ते जाणून घेणार आहोत.
जाणून घ्या मेकअप सेक्स म्हणजे काय
सोप्या भाषेत, मेकअप सेक्स ही एक अनौपचारिक संज्ञा आहे जी लैंगिक आत्मीयतेचे वर्णन करण्यासाठी वापरली जाते. जोडप्यांमधील भांडणानंतर होणारे लैंगिक संबंध म्हणजे मेकअप सेक्स. काहीवेळा, जोडप्यांमध्ये खूप मतभेद असतात, ज्यामुळे वातावरण खूप तणावपूर्व होऊ शकते परिणामी काही नात्यांमध्ये शारीरिक जवळीक होऊ शकते. मोठ्या भांडणानंतर रिलिफ मिळवण्याचा हा एक मार्ग आहे.
मेकअप सेक्स ब्रेकअप सेक्समध्ये रूपांतरीत होते का?
नाही, ब्रेक-अप सेक्स वेगळे आहे कारण जेव्हा कपल त्यांचे नाते संपवण्याचा निर्णय घेतात तेव्हा असे घडते. जोडीदाराने रोमँटिक पद्धतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला असला तरीही यात लैंगिक क्रियाकलापांमध्ये गुंतणे समाविष्ट आहे. याव्यतिरिक्त, ब्रेक-अप सेक्सला विविध भावनांनी प्रेरित केले जाऊ शकते. ज्यामध्ये विभक्त होण्यापूर्वी शेवटच्या वेळी जवळीक व्यक्त करावी लागते. ब्रेकअपच्या भावनिक समस्यांना तोंड देण्याचा हा एक मार्ग मानला जाऊ शकतो. दुसरीकडे, तज्ञांचे म्हणणे आहे की लैंगिक संघर्षानंतर समेट करण्याचा आणि पुन्हा एकत्र येण्याचा मार्ग म्हणून मेकअप सेक्स समावेश केला जातो.
मेकअप सेक्सचे फायदे काय?
नातेसंबंधांमध्ये विश्वास निर्माण करतो
सेक्स करणे हा एक बाँडिंग अनुभव आहे जो विश्वास पुन्हा निर्माण करण्यात मदत करतो आणि जोडप्यासाठी आनंदी भविष्याची आशा निर्माण करतो. विश्वास पुन्हा मिळवल्याने लैंगिक भावना देखील वाढवू शकते कारण अधिक सुरक्षिततेमुळे घनिष्ठ संबंध अधिक चांगले होऊ शकतात
डोपामाइन आणि ऑक्सिटोसिन वाढवते
सेक्स दरम्यान मेंदू ऑक्सिटोसिन आणि डोपामाइन सोडतो. ऑक्सफर्ड अकॅडेमिक जर्नलमध्ये प्रकाशित केलेल्या अभ्यासानुसार, हे पदार्थ समाधानकारक, आनंददायी आणि सुखदायक अनुभवांना मदत करतात. ते केवळ संभोग, भावनोत्कटता आणि अनौपचारिक टप्प्यांमध्येच नव्हे तर संभोग दरम्यान देखील डोपामाइन हार्मोन शरीरात सोडले जातात. थोडक्यात, मेकअप सेक्स आनंदी संप्रेरक तयार करण्यात मदत करू शकतो, ज्यामुळे मानसिक आरोग्य समस्यांना तोंड देण्यास मदत होते.
वाद संपणार
नातेसंबंधात, सेक्स करणे हा काही आनंददायक, उत्स्फूर्त क्रियाकलापांमध्ये गुंतण्याचा एक चांगला मार्ग आहे. एक आनंददायक अनुभव शेअर केल्याने तुमच्या नातेसंबंधात महत्त्वपूर्ण बदल होतात आणि भावनिक जवळीकही वाढते. मेकअप सेक्सचा पुरेपूर उपयोग केल्याने नातेसंबंधात निर्माण झालेल्या समस्या दूर होऊ शकतात.
जोडीदाराचा ताण कमी होतो
जेव्हा दोन्ही पार्टनर मेकअप सेक्ससारख्या गोष्टीचा एकत्र आनंद घेतात तेव्हा त्यांच्यातील तणाव नाहीसा होतो. सेक्स केल्याने तुमच्या मूडमध्ये सकारात्मक बदल होऊ शकतात. जर्नल ऑफ सेक्शुअल मेडिसिनमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात असे आढळून आले आहे की सेक्स केल्याने महिलांमध्ये चिंता आणि नैराश्य कमी होण्यास मदत होते. त्यामुळे, अनावश्यक तणाव दूर करण्यासाठी सेक्स हा एक प्रभावी मार्ग आहे.
मेकअप सेक्सचा दीर्घकालीन नातेसंबंधांवर काय परिणाम होतो?
- मेकअप सेक्स एखाद्यासाठी चांगला आहे की नाही हे प्रत्येक व्यक्तीनुसार बदलू शकते. काही लोकांचा राग इतका तिव्र असतो की कदाचित त्यावेळी सेक्सचा विचारही त्यांच्या डोक्यात शिरत नाही.
- काही लोकांसाठी, नातेसंबंधातील तणाव दूर करण्याचा हा एक चांगला मार्ग असू शकतो. तज्ञांचे म्हणणे आहे की जेव्हा तुमच्या नातेसंबंधात संघर्ष असतो तेव्हा स्पष्ट आणि चांगला संवाद करणे गरजेचे असते.
- असेही मानले जाते की मेकअप सेक्समुळे कपल थोड्या काळासाठी शांत होतात आणि दीर्घकाळापर्यंत त्यांच्यावर नकारात्मक प्रभाव पडतो. निरोगी नातेसंबंधासाठी, संभाषण आणि शारीरिक जवळीकतेचे संतुलित राखणे महत्वाचे आहे जेणेकरून पार्टनरला असुरक्षित न वाटता त्यांच्या भावना शेअर करण्याची संधी मिळेल असा प्रयत्न करा.
मेकअप सेक्सचे दुष्परिणाम
- लैंगिक संबध संवादाची जागा घेऊ शकत नाही
- सेक्स हा संभाषणाचा पर्याय असू शकत नाही. जेव्हा तुम्ही एकमेकांशी संवाद साधता आणि ऐकता तेव्हाच समस्या सुटू शकतात.
- मुख्य समस्येकडे आणि भावनांकडे दुर्लक्ष केले जाते.
- सेक्स हा तात्पुरता उपाय असला तरी, तुम्हाला तुमच्या गरजा, इच्छा आणि समस्यांबद्दल योग्यरित्या बोलून वाद सोडवण्याचा प्रय्तन करावा लागेल.
- मेकअप सेक्समुळे कोणतीही समस्या सोडवल्या जात नाही. जर एखाद्या कपलने भूतकाळातील अडचणींना तोंड देण्यासाठी किंवा पुढे जाण्यासाठीलैंगिक संबधाचा वापर केला असेल आणि भूतकाळातील विषयांवर चर्चा केली नसेल तर हे असे नाते भविष्यात तुटण्याची खात्री शंभर टक्के असते हे नक्की.
टिप- या लेखात दिलेली माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. कोणताही सल्ला स्वीकारण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.