Monsoon Healthy Snacks : पावसाळा जोरात सुरू असताना, गार वाऱ्यात गरमागरम चटपटीत पदार्थ खायला मिळाले तर आहा..! पावसाच्या सरींचा आनंद घेत स्वादिष्ट स्नॅक्स सर्वांना खायला आवडते. भारतीय पाककृती असे अनेक पदार्थ आहेत जे पावसाळ्यात पोष्टीक आणि हेल्दी आहेत. या हवामानाला उत्तम प्रकारे पूरक असणारे आणि तोंडाला पाणी आणणारे स्नॅक्स कोणते हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर काळजी नसावी. ( 9 Healthy and Spicy Snacks in Monsoon)
अनेक पारंपारिक स्नॅक्स मोहक असू शकतात, परंतु आपल्या आरोग्याशी तडजोड न करता आपल्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी आणि या पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी आरोग्यदायी पर्याय निवडणे आवश्यक आहे. म्हणून आज आपण पावसाळ्यात कोणते हेल्दी स्नॅक्स खावे ते जाणून घेवूया.
पावसात आनंद घेण्यासाठी हे कुरकुरीत आणि मसालेदार ते तिखट आणि चवदार असे 9 स्नॅक्स ट्राय करून पहा.
भुट्टा किंवा कॉर्न ( Bhutta or corn)
कोळशावर भाजलेले किंवा ग्रील्ड केलेले कॉर्न अनेकांना माहित आहे. स्थानिक भाषेत याला “भुट्टा” म्हणून ओळखले जाते. हे भारतातील एक उत्कृष्ट मान्सून ट्रीट आहे. हा पौष्टिक नाश्ता केवळ चवदारच नाही तर फायबर, अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी आणि मॅग्नेशियम सारख्या आवश्यक पोषक तत्वांनी समृद्ध आहे. चिमूटभर मीठ, मिरची पावडर आणि लिंबाचा रस टाकून या ताज्या आणि ग्रील्ड कॉर्नच्या स्मोकी चवीचा तुम्ही आनंद घेवू शकता.
भाजलेले समोसे (Baked samosa)
तळलेले आणि मसालेदार बटाटे भरलेले समोसे हा एक लोकप्रिय भारतीय नाश्ता आहे. पावसाळ्यात याच समोस्यांना आरोग्यदायी बनवण्यासाठी डिप तळ्याऐवजी भाजलेल्या समोस्यांचा पर्याय निवडा. बेकिंगमुळे स्वादिष्ट चव टिकून राहते, कॅलरी आणि चरबीचे प्रमाण कमी होते.
कॉर्न चाट ( Corn chaat)
चवदार आणि पौष्टिक कॉर्न चाट तयार करण्यासाठी, टोमॅटो, काकडी, कांदे आणि लिंबाच्या रसात भाजलेले किंवा उकडलेले कॉर्नचे दाणे एकत्र करा. त्यावर चाट मसाला, थोडं मीठ, आणि तुम्हाला हवे असल्यास मिरची पावडर टाकून मिक्स करा. यात हाय फायबर, व्हिटॅमिन-समृद्ध, अँटिऑक्सिडंट असतात. पावसाळ्यात कमी-कॅलरी स्नॅकचा आनंद घेण्यासाठी कॉर्न चाट परफेक्ट पर्याय आहे.
Air Fry पकोडे (Air fried pakodas)
पकोडा हा पावसाळ्यात खाल्ला जाणारा मुख्य नाश्ता आहे, परंतु पारंपारिक डिप फ्राय करण्याच्या पद्धतीमुळे हा पदार्थ अनहेल्दी मानला जातो. तळण्याऐवजी पकोडे बेकिंग किंवा एअर फ्राय करून पहा. पालक, कांदे, बटाटे आणि फ्लॉवर सारख्या भाज्यांचा त्यात वापर करून, चण्याच्या पीठ आणि मसाल्यांमध्ये मिक्स करा आणि एअर फ्राय करा. हे स्वादिष्ट, कुरकुरीत पकोडे अत्यावश्यक पोषक तत्वे देतात आणि तुमची पावसाळ्यात पकोडे खाण्याची इच्छाही पूर्ण होते.
मूग डाळ चिल्ला ( Moong dal chilla)
मूग डाळ चिरलेली भाजी, मसाले आणि पीठ एकत्र करून मूग डाळ चिल्ला बनवतात. या चवदार स्नॅक्समध्ये प्रथिने, फायबर आणि इतर पोषक घटक मुबलक प्रमाणात असतात. दही किंवा पुदिन्याच्या चटणीसह या पौष्टिक नाश्त्याचा आनंद तुम्ही घेवू शकता.
स्प्राउट्स सॅलड (Sprouts salad)
स्प्राउट चाट हा एक फ्रेश आणि पौष्टिक नाश्ता आहे जो अंकुरलेल्या बीन्स आणि कडधान्यांसह बनविला जातो. स्प्राउट्स हे प्रथिने, फायबर आणि जीवनसत्त्वे यांचा उत्कृष्ट स्रोत आहेत. त्यात चिरलेला टोमॅटो, कांदे, काकडी आणि तिखट चिंचेची चटणी टाकून चाट तयार करा. हा लो-कॅलरी स्नॅक केवळ आरोग्यदायी नाही तर पचन सुधारण्यास आणि ऊर्जा पातळी वाढविण्यास मदत करतो.
मसाला भाजलेले काजू ( Masala roasted nuts)
बदाम, काजू आणि शेंगदाणे यासारख्या नट्समध्ये निरोगी चरबी, प्रथिने आणि आवश्यक खनिजे असतात. पावसाळ्यासाठी अनुकूल स्नॅक्स बनवण्यासाठी, जिरे, धणे आणि हळद यांसारख्या सुगंधी मसाल्यांचा वापर करून तुम्ही भाजलेले मसाला नट्स तयार करू शकता. हे भाजलेले काजू कुरकुरीत चवदार स्नॅक बनवतात जे पावसाळ्याच्या दिवसात तुम्हाला हेल्दी ठेवतात.
कटलेट (Vegetable cutlets)
विविध प्रकारच्या बारीक चिरलेल्या भाज्या, मॅश केलेले बटाटे आणि मसाला वापरून कटलेट तयार केले जाते. व्हेजीटेबल कटलेट हा पौष्टिक नाश्ता आहे. हे कटलेट्स बेक किंवा एअर फ्राय करू शकतात, ते जीवनसत्त्वे, फायबर आणि कार्बोहायड्रेट्सचे निरोगी संतुलन आहे, ज्यामुळे ते पावसाळ्यातील स्नॅक्स म्हणून बेस्ट पर्याय आहे.
पोहे (Poha)
पोहे हा एक पारंपारिक भारतीय नाश्ता आहे, जो प्रत्येक घरात तयार केला जातो. पोहे तयार करण्यासाठी पोह्यांमध्ये मीठ, लिंबू, शेंगदाणे, मिर्ची आणि थोडी हळद टाकून मोहरी आणि जिऱ्याच्या तेलाचा तडका द्या. पोह्यांमध्ये कार्बोहायड्रेट्स आणि फायबर चांगल्या प्रमाणात आढळतात. कढीपत्ता आणि कोथिंबीर घालून त्याची चव वाढवू शकता.
पावसाळा हा विविध प्रकारच्या भारतीय स्नॅक्सचा आस्वाद घेण्याची एक उत्तम संधी आहे. पण तुमच्या आरोग्याची काळजी घेवून या स्नॅक्सचा तुम्ही आनंद घेऊ शकता. मग कशाची वाट पाहताय? हे स्नॅक्स घरीच तयार करा आणि पावसाळी वातावरणात या स्नॅक्सचा आस्वाद घ्या.