Cotton In House Is Cause Of Skin Infection : राज्यभरात 40 लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर कापसाची लागवड केली जाते. मुख्यतः विदर्भ आणि मराठवाडा भागात मोठ्या प्रमाणात कापसाची लागवड केली जाते. कापसाची लागवड केलेल्या अर्ध्याहून अधिक शेतात मोठ्या प्रमाणाच किटकनाशकांची फवारणी केली जाते. कापसाला भाव नसल्यामुळे विदर्भ मराठवाड्यातील अनेक शेतकरी कापूस घरात भरून ठेवतात. लख्ख उन्हाळा सुरू होऊनही भाव न मिळाल्याने आजही मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या घरात कापूस साठवून ठेवला आहे. (Cotton In House Is Cause Of Skin Infection know the remedies and symptoms from dr sachin pawade)
आता हा कापूस घरी साठवून ठेवणाऱ्या शेतकऱ्यांना आणि कुटूंबातील इतर सदस्यांना त्वचेचा त्रास होऊ लागला आहे. त्यांना त्वचेच्या ऍलर्जीचे नेमके कारण माहित नसले तरी, साठवून ठेवलेल्या कापसामुळे ही समस्या उद्भवत आहे असा समज आहे. घरातील प्रत्येक सदस्य सतत खाज येण्याची तक्रार करू लागला आहे. माझ्या भागातील काही शेतकऱ्यांशी संवाद साधल्यानंतर मला कळले की अशाप्रकारे कापसाची साठवणूक करणाऱ्या प्रत्येकाला या समस्येचा सामना करावा लागत आहे. पिकाला भाव नसल्यामुळे शेतकरी कापूस विकू शकत नाही. पण वाढत्या त्वचेच्या समस्येचे कारण लक्षात घेऊन या समस्येवर उपाय सुचविण्यासाठी विदर्भातील प्रसिद्ध ‘डॉक्टर सचिन पावडे’ (Dr Sachin Pawade) यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये घरात कापूस असल्यामुळे त्वचेला खाज का सुटते? त्याची लक्षणे काय? त्यावर उपाय काय करता येईल? याबद्दल सविस्तर माहिती सांगितली आहे.
डॉ. पावडे सांगतात की,अंगावर खाज येण्याचा आजार आपल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या घरात आढळत आहे. या आजाराला इंग्रजीमध्ये ‘बेडबग्स’ (bed bugs) म्हणातात. हा छोटासा किडा कापसामध्ये आढळतो. हा किडा कापसाच्या आजूबाजूला झोपल्यास किंवा कापसाला स्पर्श केल्यास आपल्या अंगाला चावतो. हा किडा शरीराच्या लपलेल्या जागेवर चावतो. जसे की, बगल, मांड्या, हाताच्या आणि पायाच्या गॅपमध्ये, गळ्याला किंवा पोटावर. ज्यामुळे लाल रंगाची पुरळ येते आणि त्या भागात लालसर सुजही येते ज्याला मोठ्या प्रमाणात खाज असते.
यावर काय उपाय करता येईल?
ज्या ठिकाणी तुम्हाला खाज आहे किंवा त्वचा लाल झाली आहे त्या ठिकाणी लॅक्टो कॅलामाइन(Lacto Calamine) नावाचे लोशन लावा.
जर या लालसर पुरळ ला खाज असेल तर सेंटिझिन किंवा एव्हिल (Cetirizine or Evil)ची गोळी आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घ्यावी.
लहान मुलांना हा त्रास होत असल्यास त्यांना सेंटिझिनचे सिरप सुद्धा त्यांना देऊ शकता.
या किड्यांचा नायनाट कसा करावा?
हे पेशंट दुरूस्त होतात खरे, पण घरात कापूस असल्यामुळे त्यांना वारंवार खाजेचा त्रास होतो. लोशन लावून काही वेळासाठी त्वचेच्या एलर्जीपासून आराम मिळतो पण वारंवार या समस्येला शेतकरी बळी पडतो. अशावेळी काय करावे?
1. ज्या ठिकाणी कापसू ठेवण्यात आला ती खोली पूर्णपणे बंद असली पाहिजे.
2. त्या खोलीचे दरवाचे पूर्णत: बंद असले पाहिजे, खोलीच्या दाराला फटा असल्यास त्या पूर्णपणे बंद केल्या पाहिजे. जेणेकरून हे किडे बाहेर येणार नाही.
3. जिथे कापूस आहे त्याच्या आजूबाजूला मिठाची फवारणी करा. यामुळे किडांचा नायनाट होतो.
4. घरातील अंथरूण उन्हामध्ये वाळत घाला. त्याचबरोबर चादरा देखील गरम पाण्याने स्वच्छ धुऊन टाका.
5. लहान मुलांचे आणि आपले रोजचे घालायचे कपडे गरम पाण्याने धुवा.
कापसू विकल्यानंतरही घरात किडे राहत असतील तर काय करावे?
कापसातील लहान किडे कापूस विकल्यानंतरही घरातील छोट्या छोट्या गॅपमध्ये राहतात. टाइल्स किंवा फरशीमध्ये लपून बसतात. अशावेळी कापूस विकल्यानंतर घरात मिठाच्या पाण्याची फवारणी करा यामुळे नक्कीच तुम्हाला या त्रासापासून सुटका मिळेल.