Personal Hygiene Tips : पावसाळा जितका सुखद असतो तितकाच तो वेदनादायी आणि आरोग्यासाठी हानिकारक असतो. पावसाळ्यात संसर्गजन्य रोग होण्याचा धोका जास्त असतो. गॅस्ट्रोइंटेस्टाइनल आजार, सर्दी-खोकला, त्वचेची अॅलर्जी, डोळ्यांची अॅलर्जी अशा अनेक समस्या पावसाळ्यात उद्भवू शकतात. कारण अशा हवामानात जास्त आर्द्रता आणि पाणी साचल्याने बॅक्टेरिया आणि विषाणूंचा संसर्ग होण्याचा धोका वाढतो. आणि असे बरेच संक्रमण आहेत जे इतरांच्या वैयक्तिक स्वच्छतेच्या वस्तूंच्या वापरामुळे देखील पसरू शकतात. (Do not share these 6 things related to Personal Hygiene with anyone)
विविध प्रकारचे जीवाणू आणि विषाणू टाळण्यासाठी बाथरूममधील आवश्यक वस्तू किंवा वैयक्तिक स्वच्छतेच्या वस्तू कुटुंबातील सदस्यांसोबत शेअर करू नयेत, अगदी साबणही वेगळा ठेवावा. चला तर जाणून घेऊया, वैयक्तिक स्वच्छतेशी संबंधित अशा काही गोष्टी आहेत ज्या इतर कोणत्याही व्यक्तीसोबत शेअर करू नयेत.
वैयक्तिक स्वच्छता म्हणजे काय?
“वैयक्तिक स्वच्छता” म्हणजे आपल्याला आपल्या शरीराच्या स्वच्छता, आरोग्य आणि सुरक्षिततेसाठी लागणाऱ्या महत्वाच्या गोष्टी किंवा सवयी. या वैयक्तिक सवयी तुमच्या दिवसाच्या सुरवातीपासून ते रात्री झोपेपर्यंत असतात.
- शॉवर आणि साबण
- दात, तोंड आणि नाक साफ करणे
- केसांची काळजी आणि ट्रिमिंग
- नखांची काळजी
- शरीराच्या इतर भागांची स्वच्छता
- निरोगी खाणे
- निरोगी झोप घेणे
- व्यायाम करणे
- स्वच्छ कपडे घालणे
- हे सर्व उपाय आपले शारीरिक आणि मानसिक आरोग्य राखण्यास मदत करतात.
वैयक्तिक स्वच्छतेच्या या वस्तू इतरांसोबत शेअर करू नका
टॉवेल
जर तुम्ही तुमचा टॉवेल एखाद्यासोबत शेअर करत असाल तर तुम्ही चुकीचे करत आहात. हे सर्वज्ञात सत्य आहे की जेव्हा एखादा टॉवेल वापरतो तेव्हा ते ओलसर आणि उबदार होतात कारण ते एका डार्क खोलीत वाळत घातलेले असतात. म्हणून, जेव्हा आपला टॉवेल इतर कोणी वापरतात तेव्हा ते संसर्गास कारणीभूत ठरू शकते.
साबण
त्वचेवर असलेले बॅक्टेरिया साबणामध्ये ट्रान्सफर होतात हे जाणून तुम्हाला धक्का बसेल. सार्वजनिक ठिकाणी ठेवलेला किंवा इतरांनी वापरलेला साबण वापरणे टाळा. तसेच, इतरांनी वापरलेल्या बाथ स्पंज किंवा बाथरूम उत्पादनांपासून दूर रहा. या गोष्टी ओलसर राहतात आणि त्यामध्ये जंतू वाढतात.
टूथब्रश
वापरलेल्या टूथब्रशमध्ये अनेक बॅक्टेरिया असतात. जे लोक एकमेकांचे टूथब्रश वापरतात त्यांना क्रॉस इन्फेक्शन होण्याची अधिक शक्यता असते, ज्यामुळे दात किडण्यासारख्या समस्या उद्भवू शकतात. याव्यतिरिक्त, ब्रिस्टल्सवरील जंतूंमुळे घशाचे संक्रमण होऊ शकते.
कंगवा
तुम्हाला कोंडा, केस गळणे किंवा उवा यासारख्या केसांच्या अनेक समस्या असल्यास, इतरांसोबत कंगवा शेअर करताना किंवा दुसऱ्याचा कंगवा वापरताना काळजी घ्या. असे केल्याने टाळूमध्ये संसर्ग आणि खाज येऊ शकते.
रुमाल
तुमचा रुमाल इतरांसोबत शेअर करू नका. तुम्हाला माहित आहे का हे रुमाल जीवाणूंसाठी एक कट्टा तयार करण्यासारखे आहेत. अनेकदा आपण डोक्यावरचा घाम देखील रूमालाने पुसतो. त्यामुळे इतरांचा रूमान वापरणे किंवा शेअर करणे टाळा.
लिप बाम
बॅक्टेरिया ओठ आणि तोंडाच्या पातळ स्तरात जाऊ शकतात आणि इतरांसोबत लिप बाम शेअर केल्याने तोंडाच्या अनेक संसर्गजन्य समस्या उद्भवू शकतात. म्हणून आपला लिप बाम असो वा लिपस्टिक शक्यतोवर शेअर करणे टाळा.
योनी स्वच्छता
योनीची स्वच्छ ठेवण्यासाठी दररोज आंघोळ करा. साबण पूर्णपणे स्वच्छ धुवा. अंडरगारमेट्स खूप घट्ट नसल्याची खात्री करा. कॉटनच्या अंडरगारमेट्सला प्राधान्य द्या. मोशननंतर आपले खाजगी पार्ट पूर्णपणे स्वच्छ आणि कोरडे करा. यामुळे योनीचे आरोग्य मेंटेन राहिल आणि संसर्गाचा धोका ठाळता येईल.
मानवी शरीर जीवाणूंच्या वाढीसाठी आणि गुणाकारासाठी एक प्लॅटफॉर्म सारखे काम करते. रोग निर्माण करणारे जंतू शरीरात अशी जागा शोधतात जी त्वचेने झाकलेली नसेल आणि शरीरात सहज प्रवेश करता येईल. हे जंतू शरीरात शिरण्याआधीच त्यांचा नायनाट करणे म्हणजे वैयक्तिक स्वच्छता होय.