Exercising With Partner : इंटिमेट नातेसंबंध आणि निरोगी लैंगिक जीवनासाठी, एकमेकांना आधार देणे आवश्यक आहे. वेळेच्या कमतरतेमुळे आणि बिझी लाईफस्टाईलमुळे अनेक कपल एकमेकांना वेळ देवू शकत नाही. एकमेकांना आधार देऊ शकत नाहीत. त्यांनी रोज एकत्र व्यायाम केला तर त्याचे दोन फायदे होतील. एकत्र व्यायाम केल्याने एकमेकांना मदत होईल, लैंगिक जीवनालाही चालना मिळेल आणि एकमेकांना वेळ देवू शकतील. (Exercising with a partner can be beneficial for sex life)
जोडीदारासोबत व्यायाम करण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात ठेवा
एकत्र व्यायाम करण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टींचीही काळजी घ्यावी लागते. यासाठी दोन्ही लोक एकाच वेळी हजर राहणे आवश्यक आहे. एकमेकांशी बांधिलकी राखणेही महत्त्वाचे आहे. एकमेकांच्या वेळेची उपयुक्तता जपायला सुरुवात केली, तर जुनी नातीही नव्या सारखीच मजेशीर होतात. त्याचबरोबर आपले आरोग्यही चांगले रहाते.
नात्यात प्रेम आणि आपुलकी वाढते
एकत्र व्यायामाचा थेट परिणाम मेटाबॉलिक रेट, स्नायूंची क्रिया आणि रक्तप्रवाहावर होतो. दीर्घकाळ नियमित व्यायाम केल्यास शारीरिक कार्यक्षमताही सुधारते. त्याचबरोबर नात्यात प्रेम आणि आपुलकी वाढते. व्यामासाठी वेळ दिल्याने एकमेकांच्या आरोग्याची कपल काळजी घ्यायला लागतात. म्हणून अनेक जीम किंवा योगा क्लासेसमध्ये कपल ऑफर दिली जाते.
लैंगिक कार्यक्षमता सुधारते
सर्वसाधारणपणे एकत्र व्यायाम केल्याने शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारते. लैंगिक कार्यप्रदर्शन शारीरिक आणि मानसिक आरोग्य दोन्ही अंतर्गत येते. जर जोडीदारासोबत वर्कआउट करत असाल तर मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत होते. पार्टनरसोबत क्वालिटी टाइम घालवल्याने आपोआपच नातं अधिक घट्ट होते.
एकत्र व्यायामाचा हार्मोन्सवर परिणाम होतो
हॉर्मोन्स अँड बिहेविअर या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासाच्या निष्कर्षांनुसार, पार्टनरसोबत एकत्र व्यायाम केल्यास त्यांना अधिक आनंद मिळतो. यामुळे हार्मोन्स बाहेर पडतात आणि तणाव कमी होतो. डोपामाइन हार्मोन त्यापैकी एक आहे. व्यायाम केल्याने एंडोर्फिन हार्मोन्स बाहेर पडतात. हा हार्मोन एकमेकांना जवळ आणतो. या प्रक्रियेचा लैंगिक जीवनावर सकारात्मक परिणाम होतो.
स्वतःसोबत पार्टनरच्या आरोग्याची काळजी घेवू शकता
एकत्र व्यायाम केल्याने तुम्ही स्वतःसोबत पार्टनरच्या आरोग्याची काळजी घेवू शकता. आपण सामाजिक प्राणी आहोत आणि जेव्हा आपण स्वतःशिवाय इतर कोणाची जबाबदारी घेतो तेव्हा आपण अधिक चांगले कार्य करतो. जेव्हा तुमच्यासोबत कोणीतरी व्यायाम करत असेल आणि तुम्हाला प्रेरित करत असेल तेव्हा तुमच्यात सातत्य येते. विशेषत: जेव्हा ती व्यक्ती तुमच्यासोबत राहणारी तुमची जोडीदार असते. जोडीदारासोबत व्यायाम केल्याने आरोग्याच्या वर्तनात सकारात्मक बदल होण्याची शक्यता जास्त असते. एकंदरीत, फिटनेस नियम अधिक मनोरंजक बनतात आणि कपल म्हणून व्यायाम करणे सोपे जाते.