Mental Health : जर आपण नेहमी आपल्या अपयशाचा विचार करत असाल तर याचा अर्थ आपले मानसिक आरोग्य बिघडले आहे. कारण विचारांचा मानसिक आरोग्यावर सर्वाधिक परिणाम होतो. जीवनात यश मिळवण्यासाठी आणि पुढे जाण्यासाठी, आपण मानसिकदृष्ट्या निरोगी असणे आवश्यक आहे. यासाठी आपण स्वतः प्रयत्न केले पाहिजेत. मानसिक आरोग्यासाठी आवश्यक गोष्टी केल्या पाहिजेत. (Good mental health can be maintained by following good habits)
मानसिक आरोग्य का महत्त्वाचे आहे? (What is Mental Health)
आपले भावनिक, मानसिक आणि सामाजिक विचार देखील मानसिक आरोग्याशी संबधीत असतात. आपल्या विचार करण्याच्या, अनुभवण्याच्या आणि वागण्याच्या पद्धतीवर त्याचा परिणाम होतो. आपण तणाव कसा हाताळतो हे आपल्या चांगल्या विचारांवर अवलंबून असते. आपण इतरांशी कसे कनेक्ट होऊन आणि बाँडिंग तयार करून मानसिक आजारातून बरे होऊ शकतो. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर मानसिक आरोग्य महत्वाचे आहे. मग ते बालपण असो, तारुण्य असो किंवा म्हातारपण.
मानसिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी काय करावे? (What to do to maintain good mental health?)
लोकांशी चांगले संबंध तयार करा
मानसिक आरोग्यासाठी चांगले संबंध महत्त्वाचे आहेत. यामुळे आपलेपणा आणि आत्मसन्मानाची भावना तयार होण्यास मदत होते. लोकांशी संपर्क साधणे आणि चांगले संबध तयार करणे सकारात्मक अनुभव शेअर करण्याची संधी देते. यासाठी दररोज आपल्या कुटुंबासोबत बसा गप्पा करा, त्यांच्यासाठी वेळ काढा.
रात्रीचे जेवण एकत्र करण्यासाठी ठराविक वेळ काढा. आपण काही काळापासून न भेटलेल्या मित्रांसोबत एक दिवसाचा प्लॅन करा. सहकाऱ्यासोबत जेवण करा. मित्र किंवा कुटुंबातील सदस्याशी संपर्क साधा. ज्यांना मदत किंवा सहवास हवा आहे त्यांच्यासोबत तुम्ही बोला. कुणाशी कनेक्ट होण्यासाठी केवळ तंत्रज्ञान किंवा सोशल मीडियावर अवलंबून राहू नका. समोरासमोर बसून बोला यामुळे तुम्हाला खूप चांगले फिल होईल.
शारीरिकरित्या सक्रिय रहा
शारीरिकरित्या सक्रिय राहिल्याने शारीरिक आरोग्य आणि फिटनेससाठी चांगले आहे. त्यामुळे मानसिक आरोग्यही सुधारू शकते. शारीरिकदृष्ट्या सक्रिय राहिल्याने आत्मसन्मान वाढतो. ध्येये किंवा आव्हाने निश्चित करण्यात आणि ती साध्य करण्यात मदत होते. मेंदूतील रासायनिक बदल मूडमध्ये सकारात्मक बदल घडून आणण्यास मदत करतात. चालणे, धावणे आणि एरोबिक व्यायाम, तसेच लवचिकता व्यायाम, स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी, संतुलन सुधारण्यासाठी आणि सांधेदुखी कमी करण्यासाठी केले जाऊ शकतात.
नवीन कौशल्य शिका
संशोधनानुसार नवीन कौशल्ये शिकल्याने मानसिक आरोग्य सुधारू शकते . आत्मविश्वास वाढू शकतो. नवीन कौशल्ये शिकल्याने नवीन लोकांशी कनेक्ट होण्यास मदत होते. तुमच्याकडे पुरेसा वेळ नाही किंवा तुम्हाला नवीन गोष्टी शिकण्याची गरज नाही असे वाटू शकते, परंतु तरीही तुम्ही तुमच्या जीवनात नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. काहीतरी नवीन रेसीपी करण्याचा प्रयत्न करा.
कार्यालयात नवीन जबाबदाऱ्या घेण्याचा प्रयत्न करा, जसे की कनिष्ठ कर्मचारी सदस्याचे मार्गदर्शन करणे किंवा तुमचे प्रेझेंटेशन कौशल्य सुधारणे. DIY प्रकल्पांवर काम करणे. तुटलेली बाईक, गार्डन गेट किंवा कोणतीही मोठी वस्तू दुरुस्त करणे. नवीन भाषा किंवा प्लंबिंगसारखे व्यावहारिक कौशल्य देखील शिकता येते. तुम्हाला आव्हान देणारे नवीन छंद जोपासा. ब्लॉग लिहिणे, नवीन खेळ घेणे किंवा चित्रकला शिकणे यासारख्या कला शिका.
इतरांना मदत करा
गरजूंना मदत करणे, दान देणे किंवा कुणाचे तरी दु:ख ऐकल्याने मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत करू शकते. यामुळे सकारात्मक भावना निर्माण होतात. यामुळे मला चांगले वाटते. हे इतर लोकांशी कनेक्ट होण्यास मदत करते. कुणी आपल्यासाठी केलेल्या प्रत्येक गोष्टीबद्दल आभार मानणे देखील मानसिक आरोग्यासाठी महत्वाचे आहे. ज्यांना मदतीची किंवा सहवासाची गरज आहे अशा मित्र किंवा नातेवाईकांसोबत वेळ घालवा.
वर्तमानावर लक्ष केंद्रित करा
वर्तमानावर अधिक लक्ष दिल्यास मानसिक आरोग्य सुधारू शकते. यामध्ये तुमचे विचार, भावना, तुमचे शरीर आणि तुमच्या सभोवतालचे जग समाविष्ट असते. या प्रक्रियेला माइंडफुलनेस (Mental Well Being) असेही म्हटले जाऊ शकते. माइंडफुलनेस तुम्हाला जीवनाचा अधिक आनंद घेण्यास आणि स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यास मदत करू शकते. जीवनाबद्दल तुमची भावना आणि आव्हानांना सामोरे जाण्याचा मार्ग सकारात्मक पद्धतीने बदलू शकतो.