White Butter Benefits : श्रीकृष्ण जन्माष्टमीला (Janmashtami) खूप महत्त्वाचे स्थान आहे. या दिवशी लोक भगवान श्रीकृष्णाचा जन्म मोठ्या उत्साहात साजरा करतात. यावेळी बुधवारी, 6 सप्टेंबर 2023 रोजी म्हणजे जन्माष्टमीचा सण साजरा केला जाणार आहे. तुम्हाला माहित असेलच श्रीकृष्णाला लोणी (Loni Benefits) खूप आवडत होते. पांढरे लोणी हा आपल्या असो वा श्रीकृष्णाच्या बालपणीच्या आठवणीचा एक महत्वाचा भाग आहे. अनेकदा आपण कथांमध्ये श्रीकृष्णाला लोणी चोरताना बघितले आहे. (health benefits of butter that is loved by Lord Krishna)
आरोग्यासाठी लोणी कसं फायदेशीर आहे
आमची आजी आम्हाला चमच्याने पांढऱ्या लोणीने पराठे खायला घालायची ही आठवण आता मागे पडत चालली आहे. आता मुलांना लोणी ऐवजी बटर खायला आवडते. अलिकडच्या वर्षांत आपल्याला लहान मोठे लोणी नाही तर बटर खाताना दिसतात. नवीन युगातील विज्ञान आणि अगणित अभ्यासामुळे लोणीचे अनेक फायदे आणि तोटे सांगितले आहेत. म्हणून आज आपण आपल्या आरोग्यासाठी लोणी कसं फायदेशीर आहे हे जाणून घेणार आहोत.
पांढरे लोणी भारतीय स्वयंपाकघरात नवीन नाही. पण या लोण्याची जागा ‘ट्रान्स-फॅट फ्री’ बटरने घेतली आहे. पण लोणी चांगले आरोग्य आणि वजन कमी करण्यास मदत करते. स्थानिक खाद्यपदार्थांचे समर्थन करताना, सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट रुजुता दिवेकर यांनी देखील या भारतीय सुपरफूडच्या अनेक फायद्यांविषयी सांगितले आहे, त्यापैकी एक म्हणजे वजन कमी करणे.
पोषक तत्वांचा समावेश
बाजारात विकले जाणारे पिवळे लोणी आणि पांढरे लोणी यांच्यातील मुख्य फरक म्हणजे पोषक मूल्य. पिवळ्या बटरमध्ये जास्त मीठ, ट्रान्स फॅट्स, शर्करा आणि कलरिंग एजंट असतात, तर दुसरीकडे, पांढऱ्या लोणीमध्ये वरीलपैकी एकही घटक नसतो आणि त्यात जीवनसत्त्वे ए आणि डी सारख्या पोषक तत्वांचा भरपूर प्रमाणात समावेश असतो.
बाजारात विकले जाणारे लोणी ‘कमी किंवा नो कॅलरी’ असते. त्यात सिंथेटिक फॅट्स असतात ज्यामुळे वजन वाढू शकते. पांढर्या बटरमध्ये मात्र निरोगी कॅलरीज असतात जे वजन कमी करण्यासाठी आणि शरीराच्या आरोग्यासाठी आवश्यक असतात.
लोणी खाण्याचे प्रमुख फायदे
वजन कमी करणे
पांढऱ्या लोणीमध्ये लेसिथिन हा पदार्थ असतो जो आपल्या शरीरात चरबीचे एकत्रीकरण करण्यास मदत करतो. खराब चरबी बर्न कर कण्यासाठी, चांगली चरबी आवश्यक आहे. पांढरे लोणी या प्रक्रियेत मदत करते. एकदा तुमची चरबी कमी झाली की, वजन कमी होणे शाश्वत होते.
उत्तम प्रतिकारशक्ती
पांढऱ्या लोण्यामध्ये सॅच्युरेटेड फॅट्स असतात जे कॅल्शियम, फॉस्फरस आणि जीवनसत्त्वे ए आणि डी यांसारखी रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे आवश्यक घटक टिकवून ठेवतात. जर तुमची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असेल, तर पांढरे लोणी खाण्याचा सल्ला दिला जातो.
चयापचय क्रिया
लेसिथिन केवळ खराब चरबी कमी करण्यास मदत करत नाही तर चयापचय वाढवण्यास देखील मदत करते, वजन कमी करण्यासाठी लेसिथिन हा महत्वाचा घटक आहे. चयापचय वाढल्याने तीव्र क्रियाकलाप पातळी वाढते. हे निरोगी शरीराचे चांगले लक्षण आहे.
निरोगी त्वचा
त्वचेच्या समस्यांसह संघर्ष करणाऱ्यांसाठी, पांढरे लोणी हा उत्तम पर्याय आहे. म्हणून लोणी खाण्याकडे वळले पाहिजे. सामान्यतः तुम्हाला फॅट्सपासून दूर राहण्यास सांगितले जाते त्यासाठी पांढरे लोणी चांगला पर्याय ठरू शकते. कारण पांढर्या बटरमध्ये आवश्यक अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन ई असतात जे तुमची त्वचा स्वच्छ करू शकतात. पण लोणी जास्त खाऊ नका कारण ते आपल्या त्वचेला इजाही पोहचवू शकते. पांढरे लोणी त्वचेच्या लवचिकतेस मदत करते आणि त्वचेला नैसर्गिक चमक देते.
मेंदूचे कार्य चांगले होते
पांढऱ्या लोणीमध्ये आण्विक रचना असते जी चरबी शोषून घेते आणि सांध्यांना लुब्रिकेट करते. त्यामुळे सांधेदुखीचा त्रास असलेल्या लोकांनी त्यांच्या रोजच्या आहारात एक चमचा पांढरे लोणी समाविष्ट केले पाहिजे. पांढर्या बटरमध्ये अॅराकिडोनिक अॅसिड (AA) असते, ज्यामुळे मेंदूचे कार्य चांगले होते. म्हणूनच आपल्या आजीच्या काळात थालिपाठासोबत पांढरे लोणी खावू घातले जायचे. यामुळे मुलांचे मानसिक आरोग्य चांगले रहाते.
लोणी तयार करण्याची पद्धत
भारतात, माखन किंवा पांढरे लोणी घरी तयार करणे ही खूप जुनी पद्धत आहे. लोणी तयार करण्याचा पद्धत हिंदू पौराणिक कथांमध्ये आढळते. लोणी हे भगवान कृष्णाचे आवडते अन्न होते. मलईदार लोणी तयार करण्यासाठी घरगुती पद्धतीचा वापर करा. दूधाचे दही करा आणि त्याची रई लावा हे दही जेवढे जास्त घुसळाल तेवढे लोणी वर येत जाईल. हे लोणी हाताने काढा आणि थंड पाण्याने धुवून घ्या.
पांढरे लोणी हे प्रथिने, सॅच्युरेटेड फॅट्स, व्हिटॅमिन डी आणि ए च्या घटकांनी समृद्ध आहेत. जे रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते आणि हाडांच्या आरोग्यासाठी चांगले असते. पांढरे लोणी कोणत्याही पदार्थाची चव वाढवू शकत नाही. परंतु त्याचा शरीराला अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन ई चा मोठा फायदा होतो. जे पचन, चयापचय क्रिया सुधारते.