How To Avoid Gym Accidents : 33 वर्षीय इंडोनेशियन फिटनेस इन्फ्लुएंसरचा बारबेल उचलण्याचा प्रयत्न करत असताना मान मोडल्याने झालेल्या मृत्यूमुळे जिमच्या वर्कआऊटबद्दल चिंता वाढली आहे. अनेकजण व्यायम करताना घाई करतात किंवा तो चूकीच्या पद्धतीने करतात परिणामी जीममध्ये असे अपघात होतात. जीममध्ये अपघात होण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही अनेक सेलिब्रिटींचा वक्रआऊट दरम्यान मृत्यू झाला आहे. (Simple Tricks To Avoid Gym Accidents Dos and Don’ts)
सोशल मीडियावर फिरत असलेल्या बातम्या आणि व्हिडिओंनुसार, जस्टिन विकी बालीमधील जिममध्ये व्यायाम करत होता, जिथे त्याने खांद्यावर बारबेल घेऊन स्क्वॅट-प्रेस करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, स्क्वॅटमध्ये गेल्यानंतर तो सरळ उभा राहू शकला नाही असे दिसते. त्याच्या मानेच्या मागील बाजूस बारबेल खाली पडल्याने त्याच्यावर असलेल्या वजनामुळे तो पुन्हा बसलेल्या स्थितीत पडला. इंस्टाग्रामवर त्याचे 30,000 फॉलोअर्स असलेले आहेत. 210 किलो वजन उचलण्याचा विक्रम तो आपल्या फॉलोअर्सना दाखवण्याचा प्रयत्न करत होता. यादरम्यान मानेला फ्रॅक्चर झाल्याने आणि नसा दबल्या गेल्याने विकीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
जेव्हा आपण एखाद्या विचित्र स्थितीत अडकले जातो तेव्हा काय करावे? इंडियन एक्सप्रेसच्या माहितीनुसार, जड लिफ्टचा उचलण्याचा प्रयत्न स्क्वॅट रॅकच्या मर्यादेत केला पाहिजे. रॅकच्या मदतीने तुम्ही वजन उचलले तर अशा आपत्कालिन वेळी त्याचा उपयोग होतो आणि तुम्ही तुमचा बचाव करू शकता. यामुळे तुमच्या शरीरावर पूर्ण भार पडणार नाही आणि तुम्ही सेफ वर्कआऊट करू शकाल. यादरम्यान श्रेणीबद्ध प्रोटोकॉल पाळणे गरजेचे आहे.
https://www.instagram.com/reel/CtrVMGFufez/?utm_source=ig_web_copy_link&igshid=MzRlODBiNWFlZA==
यासाठी तुमचे शरीर तयार करा. हलके किंवा कमी वजन उचलून आपल्या व्यायामाला सुरुवात करा. आपण संतुलन, समन्वय आणि योग्य फॉर्म प्राप्त केल्यानंतरच वजन वाढवा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, वजन उचलताना नियंत्रण सुटले तर काय करावे हे जाणून घ्या. अशा स्थितीत स्वत:ला इजा न करता भार सुरक्षितपणे कसा टाकायचा ते जाणून घ्या. लिफ्टमध्ये कधीही घाई करू नका, तुमची सहनशक्ती तपासा आणि नंतर तुमच्या प्रशिक्षक आणि स्पॉटरच्या संपूर्ण मार्गदर्शनाखाली प्रयत्न करा. या तंत्रांचा एकट्याने प्रयत्न करू नका. लक्षात ठेवा तुम्ही स्पर्धात्मक बॉडी बिल्डिंगमध्ये नाही आहात. योग्यरित्या वर्कआऊट केल्यावर तुम्हाला चरबी कमी करण्यास, तुमची ताकद आणि स्नायूंचा टोन वाढविण्यात आणि हाडांचे आरोग्य सुधारण्यात मदत होवू शकते. प्रशिक्षणाचा अभाव तुम्हाला संकटात आणू शकते.
वर्कआऊट दरम्यान या टिप्स लक्षात ठेवा
तुमचे शरीर जेवढे वजन घेऊ शकते तेवढेच वजन उचला. स्वतःला त्रास देऊ नका: जेव्हा तुमचे स्नायू मजबूत असतील तेव्हाच तुम्ही हळूहळू वजन वाढवू शकता.
तंत्र जाणून घ्या: तुम्ही तुमच्या सांध्यातील गतीची पूर्ण क्षमता तपासली पाहिजे. त्यामुळे तुमची क्षमता आणि फॉर्म वाढतो. आणि तुमचे शरीर जास्त वजनासाठी तयार आहे की नाही हे फक्त तुमचा ट्रेनर किंवा योग्य फिटनेस तज्ञ तुम्हाला सांगू शकतात.
श्वास घ्या: वजन उचलताना आपल्यापैकी बहुतेकांना आपला श्वास रोखून ठेवण्याचा मोह होतो. योग्य मार्ग म्हणजे वजन उचलताना श्वास सोडणे आणि वजन कमी करताना श्वास घेणे हे ट्रिक लक्षात ठेवा.
विश्रांती : आपले सर्व स्नायू एका वेळी थकवू नका. प्रत्येक स्नायू गटासाठी एक दिवस द्या. तसेच लिफ्ट दरम्यान ब्रेक घ्या.
योग्य वॉर्म-अप करा: काही स्नायूंना दुखापत होण्याची अधिक शक्यता असते. त्यामुळे वेट लिफ्टिंग काही प्रकारच्या एरोबिक अॅक्टिव्हिटी किंवा वॉर्म-अप रूटीननंतरच केले पाहिजे.
जास्त साध्य करण्याचा आणि महत्वाकांक्षी बनण्याचा प्रयत्न करू नका: फक्त एक बेंचमार्क सेट केला गेला आहे याचा अर्थ असा नाही की तुम्हाला त्याचे उल्लंघन करणे आवश्यक आहे. ओव्हरलोडिंग केवळ तुम्हाला इजा आणि हानी पोहोचवू शकते. त्यामुळे ओव्हरकॉन्फिडन्समध्ये जावू नका, जसे या प्रकरणात दिसून आले.