Fitness Tips : व्यायाम म्हटलं की तरुणाईच्या डोळ्यापुढे पहिला पर्याय येतो तो जीमचा. सकाळी उठून वॉकला जाणं किंवा सायकलिंग, स्विमिंग ऐवजी जीमला जाण्याचा ट्रेंड तरुणाईमध्ये दिसून येतो. फिट राहणं आणि फिट दिसणं असं या प्रमुख कारण दिसून येतातच. पण त्याचवेळी काही तरुण असेही असतात जे केवळ क्रेझ म्हणून, हौस म्हणून जीम जॉईन करतात. 1-2 महिने जातात आणि हौस संपल्यावर मागे फिरतात. तर अनेक तरुण केवळ बॉडी करुन मिरविण्यासाठी जीम जॉईन करतात. (joining gym just before marriage and not continue after 2 month it cloud be dangerous for health)
याच ट्रेंडमध्ये आता नवीन लग्न जमलेल्या तरुण आणि तरुणींची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याच दिसून येत आहे. लग्न जुळलं की अनेक मुला मुलींना जीम जॉईन करायचा मोह अनावर होतो. व्यायामाचा गंधही नसणारी मुलं-मुली अचानक जीमध्ये जावून कसरत करताना दिसून येऊ लागली आहेत. फिट दिसणं आणि फिट राहणं या गोष्टी कोणाला आवडणार नाहीत? पण लग्नापूर्वीच मुलं किंवा मुली जीम का लावत आहेत हा विचार तुम्ही कधी केला आहे का?
फोटोंमध्ये फिट आणि आकर्षक दिसण्यासाठी
खरंतर लग्न हा तुमच्या वैयक्तिक आयुष्याचा टर्निंग पॉईंट असतो. त्यामुळे लग्नात अगदी बारीकसारीक गोष्टींवरही लक्ष दिलं जातं. यातच तब्येतीकडेही आवर्जून लक्ष दिलं जातं. आपल्या लग्नाच्या फोटोंमध्ये फिट आणि आकर्षक दिसण्यासाठी अनेक मुलामुलींचा प्रयत्न असतो. ‘मी भविष्यात लग्न केल्यास, मला निश्चितच फिट दिसायचे आहे, सब्यसाची लेहेंगा घालण्याची आणि माझ्या जोडीदारासोबतच्या प्रत्येक कार्यक्रमात स्वत:ला फिट ठेवण्याची माझी इच्छा आहे.’ असे अनेक तरूण तरूणी म्हणतात.
तरणांच्या प्रतिक्रिया
https://www.instagram.com/reel/CvhFKYJt9FP/?utm_source=ig_web_copy_link&igshid=MzRlODBiNWFlZA==
त्याचबरोबर अनेकदा आपल्या जोडीदाराला आपण सुडौल दिसाव म्हणून जीमही लावली जाते. याव्यतिरिक्त आणखी एक कारण म्हणजे सेक्स ड्राइव्हमध्ये परफॉर्मन्स चांगला मिळावा म्हणून लग्नापूर्वी जीम लावण्याचा ट्रेंड हल्ली बघायला मिळत आहे. मात्र लग्न होताच एका किंवा दोन महिन्यात तरुण-तरुणी जीमकडे दुर्लक्ष करतात, हळूहळू हे दुर्लक्ष वाढतं जात आणि काही दिवसातच जीम बंद होते. नवविवाहीत जोडपं जुनं होतं आणि जीमही मागे पडत जाते.
ट्रेंडच्या मागे पळणे कितपण योग्य आहे?
पण हे असं दोन-तीन महिन्यांसाठी जीम लावलं आणि व्यायाम करणं आपल्या आरोग्यासाठी खरोखर चांगलं आहे का? अचानक तुमचा वर्कआऊट किंवा डाएट प्लॅन बदलला तर काय? त्याच्या तुमच्या आरोग्यावर आणि तुमच्या डेली रूटीनवर कसा परिणाम होतो? केवळ लग्न जुळलं म्हणून जीम जॉईन करणं कितपण योग्य आहे? फिटनेसबद्दल जास्त विचार न करता ट्रेंडच्या मागे पळणे कितपण योग्य आहे? अशा तुम्हाला आणि मला पडलेल्या अनेक प्रश्नांची उत्तर जाणून घेण्यासाठी आम्ही जीम फिटनेस ट्रेनरसोबत चर्चा केली.
काय म्हणाले फिटनेस ट्रेनर?
फिटनेस ट्रेनर मानिक कांबळे यांनी सांगितले की, ‘मी फक्त एवढेच सांगतोय की डू इट फॉर युवरसेल्फ. आरोग्याची काळजी घ्या. तुम्ही तुमच्या लाईफपार्टनर किंवा कोणाच्याही प्रभावात येवून जीम लावण्याचा निर्णय घेवू नका. कारण आरोग्याचा प्रश्न येतो तेव्हा स्वत:ला मिसगाईड करण्यात काही अर्थ नाही. दोन महिन्यांच्या स्ट्रेचिंग, जंपिंग आणि लाइट कार्डिओनंतर तुम्ही 100% रिझल्टची अपेक्षा करू शकत नाही.
https://www.instagram.com/reel/Cvg4G02NNQJ/?utm_source=ig_web_copy_link&igshid=MzRlODBiNWFlZA==
लोक लग्नासाठी आपले सर्वोत्तम पाऊल पुढे टाकण्याचा प्रयत्न करतात. इव्हेंटमध्ये छाप पाडण्यासाठी, फोटोंमध्ये चांगले दिसण्यासाठी किंवा जोडीदाराला आकर्षित करण्यासाठी अनेकजन जीम लावतात. पण त्यांना माझं सांगणं आहे की जर तुम्हाला वाटत असेल की तुमचा जोडीदार एका चांगल्या आकर्षक बेटर हाफला पात्र आहे, तर लग्नानंतरही तुमचा फिटनेस गोल कायम ठेवा. कारण अनेकदा लग्नाच्या आधी जीममध्ये जावून प्रॉपर डाएट प्लॅन फॉलो नाही केला तर आपल्याला अनेक आरोग्यांच्या समस्यांना सामोरे जावं लागतं. अशावेळी केळवणाचा प्रकार आपल्या आयुष्यात आल्यानंतर त्यावर थोडा कंट्रोल ठेवला पाहिजे.’
हेल्थकडे लक्ष द्यावं आणि फिट रहावं
शिवाय, सोशल मीडिया ट्रेंडचा आजकाल लोकांच्या जीवनावर मोठा प्रभाव पडतो. याचा अर्थ त्यांना ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर देखील त्यांच्या लूकचे प्रदर्शन करायला आवडते. अर्थात, यातून तंदुरुस्त शरीरासोबतच जीवनाकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टीकोन असतो, जो विवाहाच्या दृष्टिकोनातून चांगला असतो. परंतु लग्नानंतर बरेच लोक त्यांचं फिटनेस रूटीन फॉलो करणे टाळतात. ते मुद्दाम करत नाही पण लग्नांतर वेळ मिळत नसल्याने हा परिणाम दिसून येतो. अशा वेळी मी त्यांना एकच सांगेन की त्यांनी लग्नाच्या एक महिन्यानंतर पुन्हा आपल्या हेल्थकडे लक्ष द्यावं आणि फिट रहावं.
आरोग्याला सिरियसली घ्यावं
कारण लग्नापूर्वी जो केळवणाचा प्रकार असतो किंवा लग्नानंतर लगेचच नवीन घरगुती कर्तव्ये, नोकरीच्या जबाबदाऱ्या यात आपण गुंतून जातो. अनेकदा जेवणाची आमंत्रणं, नवीन पाककृती, बाहेर खाणे आणि व्यायामाकडे दुर्लक्ष करणे यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात. प्रत्येकाला निरोगी जीवन जगण्याचे महत्व माहित आहे, तेव्हा कोणत्याही परिस्थितीत आरोग्याच्या बाबतीत निष्काळजीपणा करू नका. लग्नाआधी किंवा नंतर जीम लावणे हा जरी अनेक तरूणांचा भ्रम असला तरी त्यांनी आपल्या आरोग्याला सिरियसली घ्यावं. कुणाला तरी इंप्रेस करायचं आहे म्हणून जीम जॉईन करायचा निर्णय घेणे चुकीचे आहे असं माझ स्पष्ट मत आहे.
फिजीकल ड्राईव्हसाठी लग्नापूर्वी जीम लावतात का?
अनेकदा मुलं फिजिकल ड्राइव्हसाठी जीम लावतात याविषयांवर चर्चा करताना, ‘प्रत्येकाने प्रॉपर डाएट प्लॅन फोलो करायला पाहिजे. त्यासाठी लग्नाआधी देखील आपला वर्कआऊट प्रॉपर असायला पाहिजे. यामुळे मसल्समध्ये आणि फिजिकल रिलेशनमध्ये फरक पडू शकतो. यामुळे सेक्स ड्राइव्ह स्ट्रेंथ वाढू शकते. पण फिटनेसकडे प्रॉपर लक्ष देणे गरजेचे आहे. या टिप्स मुलं आणि मुली दोघांनाही लागू होते. जीम हा तुमच्या लाईफस्टाईलचा भाग असावा त्याकडे फॅशन म्हणून पाहू नका, आरोग्यासाठी टाईम मॅनेजमेंट करा आपली आणि आपल्या पार्टनरची काळजी घ्या.