Virat Kohli’s vegan diet: भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू विराट कोहली त्याच्या फिटनेससाठी ओळखला जातो. विराट नेहमी फिट आणि उत्साही रहातो आणि त्यासाठी तो खूप मेहनतही घेतो. आपल्या आहारात पोर्शन कंट्रोलची खूप काळजी घेतो. याचा अर्थ असा की, तो त्यांच्या दैनंदिन आहारात काही विशिष्ट पदार्थांचाच समावेश करतो. त्याचबरोबर सामन्यादरम्यानही खाण्यापिण्याशी संबंधित कोणतीही चूक होणार नाही, यासाठी तो पुरेपूर प्रयत्न करतो. 2023 च्या विश्वचषकादरम्यान विराट कोहली खास आहार घेत आहे. (Know Virat Kohli’s diet plan to stay fit in the World Cup)
विराटचा आहार कसा आहे आणि दररोज त्याच्या ब्रेकफास्ट, लंच आणि डिनरमध्ये कोणते पदार्थ दिले जातात ते आज आपण जाणून घेऊया.
क्रिकेट विश्वचषकादरम्यान खेळाडूंच्या खाण्यापिण्याच्या सवयींबाबत व्यवस्थापनही बरीच खबरदारी घेत आहे. खेळाडूंना स्वादिष्ट जेवण मिळावे पण त्याचबरोबर ते निरोगी राहावे आणि खेळाडूंचा स्टॅमिना, प्रतिकारशक्ती सुदृढ रहावी यासाठी टीम इंडिया व्यवस्थापन पूर्ण काळजी घेत आहे. त्यांचा संपूर्ण मेनू नुकताच मीडियासमोर आला आहे.
कमी कार्ब आहार
विराट कोहली कमी कार्बोहायड्रेट अन्न खातो. त्यांच्या ताटात प्रथिनांचे प्रमाण जास्त असते. विराट कोहली पूर्णपणे शाकाहारी पदार्थ खातो. तो शाकाहारी आहाराचे पालन करतो आणि दूध किंवा दुग्धजन्य पदार्थ खाणे टाळतो. त्यामुळे प्रथिनांसाठी तो सोया उत्पादनांना जास्त प्राधान्य देतो.
नाचणीपासून बनवलेला डोसा
भारतीय क्रिकेट संघाच्या खेळाडूंना तांदूळ आणि डाळीऐवजी नाचणीपासून बनवलेला डोसा दिला जातो. नाचणी किंवा नाचणीच्या पिठापासून बनवलेले पदार्थ खाल्ल्याने लोह, जस्त आणि कॅल्शियम यांसारखे पोषक घटक मिळतात आणि यामुळे दिर्घकाळ पोट भरलेले रहाते.
वाफवलेले अन्न खातो
विराट कोहली वाफेवर शिजवलेले पदार्थ जास्त खातो आणि त्याला वाफवलेले मॉक मीट (शाकाहारी मांस) आणि डिम सिम खायला आवडते.