Pregnancy Post Of Gazal Alagh : Mamaearth या ब्युटी आणि हेल्थ केअर कंपनीच्या प्रमुख गझल अलघ यांच्या एका पोस्टची सोशल मिडियावर मोठी चर्चा होत आहे. त्यांनी सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट करून मी गरोदरपणात 12 तास काम केल्याचे सांगितले आहे. त्यावरून सोशल मिडियावर त्यांच्या या मताचा काहींनी विरोध केला तर काहींनी या मतावर टीका केली. गरोदर महिला तिच्या स्वत:च्या बाळाच्या आरोग्यापेक्षा बाहेरील कामासाठी किंवा नोकरीसाठी वेळ देत असेल तर ते तिच्या आरोग्यासाठी चांगले आहे की वाईट यावर चर्चा होत आहे. म्हणून आज आपण गर्भधारणेदरम्यान महिलांनी किती तास काम करावे आपली काळजी कशी घ्यावी ते जाणून घेणार आहोत. त्याआधी गझल काय म्हणाल्या ते जाणून घेऊया. (Pregnancy Post Of Gazal Alagh Is it safe for women to work 12 hours during pregnancy)
गझल अलग काय म्हणाल्या? ( Pregnancy Post Of Gazal Alagh)
गझल यांने लिंक्डिनवर एक पोस्ट केली होती. यामध्ये त्यांनी लिहिले की, “जेव्हा मी शार्क टँक इंडियाला जाण्याचा निर्णय घेतला तेव्हा मी 8 महिन्यांची गरोदर होती. त्यानंतर मी इतरांसोबत दररोज 12 तास शूटिंग करायचे. माझे ध्येय लोकांना प्रेरित करणे आणि गरोदरपणात महिला कमी सक्रिय असतात किंवा त्यांची क्षमता कमी होते हा समज मोडून काढणे हे होते. यावर्षी माझ्या इनोव्हेशन टीममध्ये समाविष्ट असलेल्या 4 व्यवस्थापक गर्भवती आहेत. तरीही आम्ही नव्या उपक्रमावर सर्वाधिक महसूलाचे लक्ष्य गाठले आहे. आम्हाला खात्री आहे की आम्ही या बाळांना तर सुरक्षित जन्म देऊच शिवाय आमचे लक्ष्य देखील साध्य करू.”
गरोदर असताना काम करणे सुरक्षित आहे का? (Is it safe to work while pregnant?)
बहुतेक महिला गर्भधारणेदरम्यान काम करतात. यामागे आर्थिक गरज हे देखील एक कारण असू शकते. तुमची नोकरीची सुरक्षितता विविध घटकांवर अवलंबून असते, जसे की तुम्ही उदरनिर्वाहासाठी काय करता, तुमची आरोग्य स्थिती किंवा तुमच्या गरोदरपणात तुम्हाला येणारी कोणतीही अडचण. तुम्हाला तुमच्या नोकरीबद्दल काही चिंता असल्यास किंवा तुमच्या कामामुळे कोणताही धोका असल्यास तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.
• रेडिएशन, रसायने किंवा इतर घातक पदार्थांच्या संपर्कात येणे टाळा.
• दीर्घकाळ उभे राहणे आणि चढणे उतरणे टाळा
• जड वजन उचलणे किंवा वाहून नेणे टाळा.
• मोठ्या आवाजात बोलणे किंवा ओरडणे टाळा.
• उष्णता किंवा अति थंड तापमानात बसू नका.
गरोदरपणात किती तास काम करावे? (How many hours to work during pregnancy)
विचारात घेण्यासारखा आणखी एक घटक म्हणजे गरोदर महिलांच्या कामाची वेळ आणि तुम्ही किती तास काम करत आहे हे समजून घेणे. एका अभ्यासातून असे दिसून आले आहे की ज्या महिला आठवड्यातून 40 तासांपेक्षा जास्त काम करतात त्यांना गर्भपात आणि वेळेपूर्वी प्रसूती होण्याचा धोका जास्त असतो. पहिल्या तिमाहीत हा धोका सर्वाधिक असतो. एका अभ्यासात असाही निष्कर्ष काढण्यात आला आहे की ज्या महिला आठवड्यातून किमान दोन वेळा नाईटशिफ्टमध्ये काम करतात त्यांना दिवसा काम करणाऱ्या स्त्रियांपेक्षा गर्भपात होण्याचा धोका जास्त असतो. सर्कॅडियन रिदम्स आणि हार्मोन मेलाटोनिनचे उत्पादन हे या मागील वैज्ञानिक कारण आहे जे प्लेसेंटाच्या संरक्षणात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते.
गर्भधारणेदरम्यान काम करणे कधी थांबवावे? (When to stop working during pregnancy?)
जसजशी तुमची प्रसुतीची तारीख जवळ येत आहे, तसतसे तुमच्या कामाते तास कमी करा. तुम्हाला प्रसूतीदरम्यान कोणत्याही अडचणीचा सामना करायचा नसेल तर आराम करण्याला प्राधान्य द्या. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार जीवनशैली फॉलो करा. अकाली प्रसूतीची काही लक्षणे खालीलप्रमाणे आहेत.
• पोटात पेटके येणे आणि अस्वस्थता.
• योनीतून पाणी, रक्त किंवा इतर स्त्राव जाणे.
• कोणत्याही प्रकारचा वाढलेला स्त्राव.
• पाठदुखी
प्रसूती रजेचा अधिकार (Maternity Leave Rights)
तुमची आर्थिक परिस्थिती, तुमची कामाची भूमिका, तुम्हाला गर्भधारणेदरम्यान कसे वाटते त्याचबरोबर इतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य यासारख्या अनेक घटकांवर तुमची काम करण्याची पद्धती आणि कामाच्या तासाचे नियोजन अवलंबून असते. म्हणून तुमच्या अधिकारांबाबत जाणून घेण्यासाठी तुमच्या कंपनीच्या HR विभागाशी संपर्क साधा. जर तुम्हाला 36 आठवड्यांपासून पॅरेंटल रजा सुरू करायची असेल, तर तुम्हाला 26 आठवडे गरोदर असताना तुमच्या कंपनीला तुमच्या नियोजनांबदद्ल सांगावे लागेल. त्याचबरोबर गर्भधारणेदरम्यान अकाली प्रसूती तुमच्या काम करण्याच्या क्षमतेवर परिणाम करू शकते. यासाठी तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार कामाचे तास आणि काम करण्याची पद्धत बदलून घ्या. आपल्या आणि बाळाच्या आरोग्याला प्राधान्य द्या.