Monsoon Health Tips: पावसाळ्याच्या सुरुवातीमुळे बराच दिलासा मिळतो, परंतु पावसाच्या सरी जसजशा वाढत जाते त्यामुळे संसर्ग आणि आजारपणाचा धोका वाढतो. इतर कोणत्याही ऋतूच्या तुलनेत पावसाळ्यात अनेक विषाणू, जीवाणू, परजीवी आणि इतर विषाणूंचा संसर्गा होण्याचा धोका दुप्पट असतो. (Strengthen your immunity to take care of health during monsoon)
हवेतील उच्च आर्द्रता आणि पाणी साचल्याने हानिकारक सूक्ष्मजीव वाढण्यास सक्षम वातावरण तयार करतात, ज्यामुळे आरोग्याशी संबंधित अनेक आजार होतात. सामान्यत: पावसाळ्यात होणारे आजार एखाद्या व्यक्तीच्या आरोग्यावर मोठे लक्षण किंवा मोठा परिणाम होईपर्यंत आढळून येत नाहीत. मात्र लवकर निदान आणि काही प्रतिबंधात्मक आणि स्वच्छता उपाय या ऋतूमध्ये तुम्हाला सुरक्षित ठेवू शकतात.
तुमची प्रतिकारशक्ती मजबूत करा
कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या व्यक्तीला सहज संसर्ग होतो. फळे, भाज्या आणि तृणधान्यांसह संतुलित आहार घ्या. ग्रीन टी प्यायल्याने तुमची प्रतिकारशक्ती मजबूत होण्यास मदत होते. रोगजनकांच्या वाढीसाठी पावसाळा हा योग्य काळ आहे. पावसाळ्यात विषाणूजन्य ताप, जिवाणू आणि इतर परजीवी संसर्गाची प्रकरणे मोठ्या प्रमाणावर आढळतात. मजबूत रोगप्रतिकारक शक्ती आपल्या शरीराला हानिकारक संक्रमण आणि जीवाणूंपासून संरक्षण करते.
वैयक्तिक स्वच्छता राखा
स्वतःची चांगली काळजी घ्या. आपली त्वचा कोरडी ठेवा आणि वैयक्तिक स्वच्छता राखा. ओलावा किंवा ओलसरपणा संक्रमणांच्या वाढीस आकर्षित करते ज्यामुळे रोग प्रतिकारशक्ती कमकुवत होते.
हायड्रेटेड रहा
पावसाळ्यात लोकांना तहान कमी लागते आणि त्यामुळे त्यांचे पाणी पिण्याचे प्रमाण कमी होते. मात्र ऋतू कोणताही असो शरीराला पाण्याची गरज आवश्यक असते. पोटाशी संबंधित आजारांचा धोका कमी करण्यासाठी भरपूर शुद्ध पाणी पिणे अत्यावश्यक आहे. तुम्ही तुमच्या सकाळच्या चहाचा कप अदरक चहा, कॅमोमाइल चहा इत्यादी हर्बल चहासह देखील घेवू शकता, जे चांगले प्रतिकारशक्ती वाढवणारे म्हणून काम करतात.
स्ट्रीट फूड खाणे टाळा
रस्त्याच्या कडेला कापून विकली जाणारी फळे आणि भाजीपाला कटाक्षाने टाळावा. रस्त्यावरील खड्डे सहसा पाणी आणि चिखलाने भरलेले असतात. हे विविध प्रकारच्या हानिकारक सूक्ष्मजीवांसाठी परिपूर्ण इनक्यूबेटर तयार करतात. रस्त्याच्या कडेला मोकळ्या हवेत सोडले जाणारे अन्नपदार्थ हानीकारक संक्रामक जीवांचे निवासस्थान बनू शकतात. पावसाळ्यात निरोगी रहायचे असेल तर दोन आवश्यक गोष्टींशी तडजोड करू नका एक म्हणजे पुरेशी झोप आणि नियमित व्यायाम.