Cause Heart Attack in Winter : थंडीचा हंगाम येतो आणि त्यासोबतच अनेक आजारांचा धोकाही वाढतो. या ऋतूमध्ये आपल्याच चुकांमुळे आपल्याला काही आजारांचा धोका वाढतो.आरोग्यविषयक अनेक आजार असतात, ज्याचा धोका हिवाळ्यात आपल्याकडून झालेल्या काही चुकांमुळे वाढतो. हिवाळ्याच्या मोसमातही लोक जाणूनबुजून किंवा नकळत अशा चुका करतात, ज्यामुळे हृदयविकाराच्या झटक्यासारख्या गंभीर आजारांचा धोका वाढतो. म्हणून आज आपण हिवाळ्यात कोणत्या चूका करू नये ते जाणून घेणार आहोत जेणेकरून हृदयविकाराच्या झटक्यासारख्या गंभीर आजारांचा धोका कमी होईल. (These 3 mistakes can increase risk of heart attack in winter)
ह्रदयविकाराचा झटका हे आजकाल मृत्यूच्या सर्वात सामान्य कारणांपैकी एक आहे, 20, 30 आणि 40 च्या वयातील लोकांमध्ये अनेक प्रकरणे वाढत जात आहेत. हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढवणारे कारणं तसेच लक्षणांकडे दुर्लक्ष करणारे अनेकजण आहेत. पण ऋतुमानातील बदल देखील तुमच्या हृदयाला त्रास देऊ शकतात.
हिवाळ्यात थंड पाण्याने आंघोळ करणे
हिवाळ्यात थंड पाण्याने आंघोळ केल्याने तुमच्या शरीरातील अनेक अवयवांवर परिणाम होतो आणि यामध्ये प्रामुख्याने हृदयाचा समावेश होतो हे फार कमी लोकांना माहिती आहे. हिवाळ्यात थंड पाण्याने आंघोळ केल्याने तुमच्या शरीरातील रक्तवाहिन्या आकुंचन पावतात, ज्याचा थेट परिणाम तुमच्या हृदयावर होतो आणि अशा परिस्थितीत हृदयविकाराचा धोका वाढतो.
जास्त चरबीयुक्त आहार
काही लोकांना थंडीच्या दिवसात वेगवेगळ्या गोष्टी खायला लागतात आणि आपल्या देशात हिवाळ्यात लोक जास्त फॅट डाएट घेतात. याशिवाय, जास्त चरबीयुक्त आहारामध्ये देखील खूप मीठ असते आणि या दोन्ही गोष्टी हृदयासाठी हानिकारक असू शकतात. विशेषत: हिवाळ्यात हृदयाच्या रुग्णांना समस्यांना सामोरे जावे लागते.
जुनाट आजारांना गांभीर्याने न घेणे
विशेषत: थंडीच्या मोसमात मधुमेह, कोलेस्ट्रॉल, उच्च रक्तदाब यांसारखे आजार अधिक गंभीर होतात. या जुनाट आजारांवर दीर्घकाळ नियंत्रण न ठेवल्यास हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका खूप वाढू शकतो आणि म्हणूनच अशा तीव्र आजारांची विशेषत: हिवाळ्यात विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.
हिवाळा हा बर्याचदा पसंतीचा ऋतू मानला जात असताना, बहुतेकदा हृदयविकाराचा झटका येतो तेव्हा हेच हवामान कारणीभूत ठरते. केवळ श्वासोच्छवासाचे आजार आणि विषाणूंचे आयफ्लक्सच नाही तर हृदयविकार वाढण्याचे कारण हिवाळा ठरू शकते. तापमानात अचानक घट होणे हे चिंतेचे आणि महत्वाचे कारण असू शकते. अचानक हृदयविकाराचा झटका आणि आजारांना बळी पडण्याचे कारण हिवाळ्यातील थंड तापमान ठरू शकते. म्हणून हिवाळाळ्यात देखील नेहमीपेक्षा अधिक सावधगिरी बाळगण्याची गरज असते.