Skin Infections : सध्याच्या काळात तरुणाईचा जिममध्ये जाण्याचा छंद वाढत आहे. फिटनेस प्रेमींना त्यांचा जास्तीत जास्त वेळ जिममध्ये घालवायला आवडते. जिमला जाणे ही चांगली सवय आहे. यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. यामुळे लठ्ठपणा दूर होतो आणि अनेक आजारांपासून तुमचा बचाव होतो. परंतु, जी जीम तुम्हाला निरोगी बनवते त्यामुळे त्वचेचे संक्रमण देखील होऊ शकते. जिम मशीन आणि इतर वस्तू प्रत्येकजण वापरतात. अशा वेळी एका व्यक्तीच्या त्वचेच्या संसर्गामुळे जिममध्ये येणाऱ्या सर्व लोकांना संसर्ग होऊ शकतो. एखाद्या व्यक्तीला जिममध्ये कोणत्या प्रकारचा संसर्ग असल्यास तो इतरांना होण्याची शक्यता असते. हा संसर्ग कसा टाळता येईल यावर उपाय जाणून घेणार आहोत. (these 5 types of skin infections that gym goers can get)
प्लांटर वार्ट
प्लांटार वॉर्ट हा पायात होणारा संसर्ग आहे. यामध्ये पायांच्या त्वचेवर गुठळ्या तयार होऊ लागतात, जो प्रामुख्याने पायाच्या तळव्यावर होतो. हा संसर्ग मानवी पॅपिलोमा विषाणूमुळे होतो. यामध्ये पायावर चामखीळ होते. जर तुमच्या पायावर जखमा झाल्या असतील तर त्यामुळे तुमच्या पायात इन्फेक्शन होण्याची शक्यता वाढते.
रिंग वर्म
रिंग वर्म हा एक प्रकारचा बुरशीजन्य संसर्ग आहे. यामध्ये त्वचेवर खाज आणि लाल पुरळ उठतात. शरीराच्या कोणत्याही भागात रिंग वर्म होऊ शकतात. रिंग वर्म हा एक संसर्गजन्य रोग आहे, तो एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीमध्ये सहज पसरतो. या संसर्गामध्ये, एखादी व्यक्ती जीवाणूंच्या संपर्कात आल्यानंतर सुमारे दोन आठवड्यांच्या आत लक्षणे दिसू शकतात.
इम्पेटिगो
हा एक जीवाणूजन्य संसर्ग आहे, ज्यामुळे त्वचेवर जळजळ होते. यामध्ये व्यक्तीला खाज येण्याची समस्या असू शकते. त्यानंतर त्वचेवर कवच तयार होऊ लागते. हा संसर्ग एका व्यक्तीकडून इतरांमध्ये पसरू शकतो.
फॉलिकुलिटिसस (folliculitis)
फॉलिक्युलायटिसमध्ये, एखाद्या व्यक्तीला त्वचेवर वेदना जाणवते. यामध्ये त्वचेवर लाल डाग तयार होतात. काहीवेळा या खुणा तुम्हाला पुरळ असल्यासारख्या दिसू शकतात. यामुळे त्वचेवर जळजळ जाणवते. या संसर्गामध्ये, बॅक्टेरिया केसांच्या रोमांवर परिणाम करतात. ही समस्या मान, बगल आणि मांडीवर होऊ शकते.
एथलीट फुट
एथलीट फुट हा एक प्रकारचा बुरशीजन्य संसर्ग आहे जो आपल्या पायावर होतो. यामुळे पायांच्या त्वचेवर खाज सुटते आणि क्रस्टिंग होते. ट्रायकोफिटन रुब्रम नावाच्या बुरशीमुळे ही समस्या उद्भवते. हा संसर्ग घाणेरडे जिम कार्पेट आणि योगा मॅट्सद्वारे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला होऊ शकतो.
जिममध्ये त्वचेचा संसर्ग कसा टाळावा
- व्यायामशाळेत शरीर पूर्णपणे झाकणारे सैल कपडे घाला.
- कोणत्याही वस्तूला स्पर्श करण्यापूर्वी हातमोजे घाला.
- संसर्गाची शक्यता कमी करण्यासाठी व्यायामशाळेत शूज घाला.
- जर तुम्हाला दुखापत झाली असेल तर ती झाकून किंवा बॅंडेज करून ठेवा.
- जिममधून आल्यानंतर कोमट पाण्याने आंघोळ करावी.
जीममध्ये होणारा संसर्ग टाळण्यासाठी तुम्ही हँड सॅनिटायझर वापरू शकता. मशीनला स्पर्श केल्यानंतर तुम्हाला संसर्ग होण्याचा धोका असल्यास, साबणाने हात धुवा. तुम्हाला आधीच स्किन इन्फेक्शन असेल तर त्यावर आधी उपचार करा, मगच जिममध्ये जा.