Eye Flu : पावसाळ्यात पावसासोबत अनेक आजारही येतात. सध्या आय फ्ल्यू हा सर्वात सामान्यपणे आढळणाऱ्या संसर्गांपैकी एक आहे आणि या हंगामात संपूर्ण भारतात या प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. हा रोग वेगाने पसरणाऱ्या संसर्गजन्य आजारांपैकी एक आहे आणि खूप वेदनादायक देखील आहे. त्यामुळे या आजारापासून सुरक्षित राहण्यासाठी काय करावे? डोळ्यांचा संसर्ग टाळण्यासाठी आणि थांबवण्यासाठी आम्ही भालेराव आय क्लिनिकच्या आय स्पेशालिस्ट डॉ. स्वाती भालेराव यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी आम्हाला या आजाराशी संबंधित काही लक्षणं आणि उपाय सांगितले. डॉ. स्वाती भालेराव यांनी सांगितले की, ‘आय फ्ल्यू सामान्यपणे व्हायरल इन्फ्फेक्शन आहे. (Tips from experts to cure eye flu quickly and prevent pink eye infection)
आय फ्ल्यूची लक्षणं (Symptoms of eye flu)
यामध्ये डोळे लाल होतात, चुरचुरतात, डोळ्यात काहीतरी गेल्यासारखं सतत वाटतं, पाणी येतं, डोळ्यांवर सूज वाढते, डोळ्यांना आणि पापण्यांना चिकटपणा जाणवतो, डोळ्यातून घाण येते.
आय फ्लू झाल्यास काय काळजी घ्यावी? (How to take care of eyes?)
डोळ्यांना वारंवार हात लावू नका
डोळे चोळणे किंवा स्पर्श करणे टाळा. यामुळे तुमचा आजार वाढू शकतो किंवा तुमच्या दुसऱ्या डोळ्यात पसरू शकतो. तुमच्या डोळ्यांना हात लावण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा .डोळे आय वाइप्स किवा स्वच्छ रुमालाने स्वच्छ करा. घरी आराम करा. प्रकाशाचा त्रास होत असेल तर काळा चष्मा लावा. चष्मा लावला की डोळ्यांना हात लावला जात नाही .वस्तू शेअर करू नका. तुमच्या संपर्कात जर कोणी आलं तर इनफेक्शन पसरू शकते.
पापण्या ब्लिंक कराव्या आणि पाणी भरपूर प्यावे
पण कुणाच्या डोळ्यात पहिल्याने आय फ्ल्यू होत नाही.तुमच्या हाताला जर त्या व्हायरसचा स्पर्श झाला असेल किंवा ज्याला आय फ्ल्यू झाला त्याचा स्पर्श झाला असेल आणि तो आपल्या डोळ्याला लागला गेला तर आपल्याला आय फ्ल्यू होतो. इम्यूनिटी कमी असेल तर आजार जास्त लवकर वाढतो. त्याचबरोबर ज्यांचे डोळ ड्राय आहेत त्यांना हा आजार लवकर होवू शकतो. ड्रायनेस येऊ नये म्हणून स्क्रीन टाईम कमी करावा, ब्रेक घेऊन काम करावं किंवा स्क्रीन कडे पाहताना डोळ्यांच्या पापण्या ब्लिंक कराव्या आणि पाणी भरपूर प्यावे.
मेडिकल मधून डोळ्यांसाठी ड्रॉप घेवू नका
स्वतः जाऊन मेडिकल मधून डोळ्यांसाठी ड्रॉप घेवू नका. चुकीचे ड्रॉप वापरल्याने इन्फेक्शन वाढू शकतं. त्यामुळे सेल्फ ट्रीटमेंट घेऊ नये किंवा इंटरनेट वर शोधून चुकीच्या ट्रीटमेंट आणि औषधे घेऊ नये. लक्षण दिसल्यास डॉक्टरांना दाखविणे महत्वाचं आहे.
जीवनसत्त्व युक्त आहार
व्हिटॅमिन A, ओमेगा 3 फॅटी अॅसिड असणारे घटक, फळांमध्ये पपई, संत्री, मोसंबी, आंबा, अंजीर इ. समावेश करणे आवश्यक आहे. डोळ्यांचा ड्रायनेस कमी होण्यासाठी याचा फायदा होतो. dryfruit खाणे, नॉनव्हेज खणाऱ्यांनी मासे आणि अंडी खायला पाहिजे. भाज्यांमध्ये शेवगा, पालक, बीट, लाल भोपळा, डोळ्यांसाठी चांगला आहे. संतुलित आहार घ्यावा, बाहेरचे जंक फूड खाणे टाळावे.
व्हिटॅमिन सी-युक्त पदार्थांचे सेवन करा
बीपी, मधुमेह असलेल्या रुग्णांमध्ये डोळ्यांची दृष्टी कमी होण्याचे प्रमाण जास्त दिसून येते आणि हे लगेच लक्षात येतं नाही. कधी तरी डोळ्याच्या आतील पडद्यामध्ये ब्लड प्रेशरमुळे रक्तस्त्राव होतो आणि पूर्ण दृष्टी जाते. वेळेवर ट्रीटमेंट मिळाली नाही तर कायमची दृष्टी जावू शकते. मधुमेहामुळे डोळ्यातील पडद्याच्या नसा ब्लॉक होतात. म्हणून डोळ्यांसंबधी कोणताही आजार असो, त्वरीत डॉक्टरांशी संपर्क करावा.