Sunflower Oil Health Benefits : निरोगी राहण्यासाठी लोक काय करतात? या प्रश्नाचे सर्वात महत्वाचे उत्तर म्हणजे आपले अन्न. या अन्नात काय असावे, काय नसावे, जेवण बनविताना काय काय करावे अशा गोष्टी महत्वाच्या मानल्या जातात. यातच मसाल्यांबरोबरच तुम्ही वापरत असलेले तेलही स्वयंपाकात महत्त्वाचे आहे. आजकाल बाजारात अनेक प्रकारची स्वयंपाकाची तेल उपलब्ध आहेत. पण यापैकी एक महत्त्वाचे तेल म्हणजे सूर्यफूल तेल. हे तेल मोठ्या प्रमाणात स्वयंपाकात वापरले जात आहे आणि ते खाण्याचे अनेक फायदेही आहेत. सूर्यफूल तेल इतके महत्त्वाचे का मानले जाते ते आपण आज जाणून घेऊया.(Using sunflower oil in cooking can be beneficial for health)
सूर्यफूल तेलाचे फायदे
सूर्यफूल तेल खाण्याचे अनेक फायदे आहेत. त्यात सॅच्युरेटेड फॅटचे प्रमाण खूपच कमी असते. त्यात अधिक प्रकारचे फॅटी ऍसिड असतात – पॉलीअनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड आणि मोनोअनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड. पॉलीअनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिडस् किंवा PUFA मध्ये ओमेगा-3 आणि ओमेगा-6 यांचा समावेश होतो. PUFA रक्तातील कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लिसराइड्स कमी करण्यासाठी उपयुक्त आहे. तर मोनोअनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिडमुळे हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी होतो.
तुमच्या हृदयाचे आरोग्य सुधारते
सूर्यफूल तेलामध्ये ऑलिक ॲसिड असते, जे आरोग्यासाठी फायदेशीर असते. अनेक संशोधनानुसार कमीतकमी 70% ऑलिक ॲसिड असलेले तेल कोरोनरी हृदयरोग कमी करू शकते. म्हणून सूर्यफूल तेल स्वयंपाक करण्यासाठी एक चांगला पर्याय आहे. यामुळे कोलेस्ट्रॉल कमी होते. यासोबतच यामध्ये लिनोलिक ॲसिड देखील असते. अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या अभ्यासानुसार, लिनोलिक ऍसिड कोरोनरी हृदयरोगाचा धोका कमी करते. सूर्यफूल तेलात शिजवलेले अन्न खाल्ल्याने एकूण कॅलरीजपैकी 5 ते 10 टक्के कॅलरीज लिनोलिक ऍसिडमधून मिळतात.
मेंदू आणि मज्जासंस्थेसाठी चांगले
सूर्यफूल तेल हे व्हिटॅमिन ई चा चांगला स्रोत आहे. हे तुमच्या मेंदूचे आणि मज्जासंस्थेचे आरोग्य सुधारते. याच्या नियमित सेवनाने अल्झायमरसारख्या आजारांचा धोका कमी होतो. व्हिटॅमिन ई तुमच्या मज्जातंतूच्या वेदना कमी करते.
कर्करोगाचा धोका कमी होतो
सूर्यफूल तेलामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स कर्करोगाचा धोका कमी करण्यास मदत करतात. विशेषतः हे तेल स्तनाचा कर्करोग, प्रोस्टेट कर्करोग आणि कोलोरेक्टल कर्करोगाचा धोका कमी करते.
काही खबरदारी आवश्यक
सूर्यफूल तेलाचे सेवन करण्याचे अनेक फायदे असले तरी ते वापरण्यापूर्वी काही खबरदारी घेणे आवश्यक आहे. कोणत्याही तेलाचा जास्त वापर करू नका. तुमचे वजन जास्त असेल तर तेलाचे सेवन कमी करा. यासोबतच हे तेल जास्त गरम केल्यानंतर सेवन करू नका. खरं तर, तेल गरम केल्यावर जो धूर निघतो त्यात अल्डीहाइड्स नावाचे विषारी पदार्थ असतात, ज्यामुळे कर्करोगाचा धोका वाढतो. जेव्हा आपण अन्न तळतो तेव्हा देखील हा पदार्थ तयार होतो जो आरोग्यासाठी धोकादायक आहे.\