Tamanna Bhatia Skin Care Tips : दाक्षिणात्य स्टार अभिनेत्री तमन्ना भाटिया तिच्या खास अभिनयासाठी आणि ग्लोइंग त्वचेसाठी ओळखली जाते. अनेक मुली तमन्नाला फॉलो करतात. जर तुम्ही विचार करत असाल की तिचा स्किन केअर रूटीन कसा आहे तर ती नेहमी आपल्या चाहत्यांना याबाबत टिप्स देत असते. एका अग्रगण्य मासिकाच्या ‘ब्युटी सिक्रेट्स’ व्हिडीओ सीरिजमध्ये तमन्ना भाटियाने तिच्या चाहत्यांना आपल्या ब्युटी हॅक्सबद्दल सांगितले होते. तमन्ना भाटियाने सांगितले की, ती नेहमीच त्वचा आणि केसांची नैसर्गिक पद्धतीने त्वचेची काळजी घेते. त्यामुळे तिची त्वचा लवचिक आणि चमकदार दिसते. (Find out Tamanna Bhatia secret to glowing skin)
अभिनेत्रीच्या फ्रेश आणि तेजस्वी त्वचेचे रहस्य DIY स्किन केअर टिप्समध्ये आहे. तिच्या अभिनय कारकिर्दीमुळे तिला अनेक प्रकारचे रासायनिक प्रोडक्ट्स वापरावे लागतात म्हणून ती घरी असताना जास्तीत जास्त घरगुती स्किन केअर रूटीन फॉलो करते.
तिच्या अलीकडील हिट चित्रपटाच्या नावाप्रमाणे, तमन्नाच्या होममेड हॅक्समध्ये देखील नेहमीच ‘प्लॅन ए’ तसेच ‘प्लॅन बी’ असतो आणि त्यानुसार ती आपल्या त्वचेची काळजी घेते. स्किनकेअरसाठी तिचा किफायतशीर पण प्रभावी दृष्टिकोन उघड करणाऱ्या ट्युटोरियलमध्ये, प्रत्येक व्यस्त मुलीला तिच्या व्हॅनिटीमध्ये आवश्यक असलेला एक्सफोलिएटिंग फेस स्क्रब ठेवला पाहिजे असे तमन्ना सजेस्ट करते.
हा फेस स्क्रब तयार करण्यासाठी, एक चमचे चंदन पावडर आणि ग्राउंड कॉफी सेंद्रिय मधासह एकत्र करा. तुमच्या त्वचेला या उपायांचा खरोखर फायदा व्हावा अशी तुमची इच्छा असेल तर सेंद्रिय घटक वापरण्याचा सल्ला तमन्ना देते. या मिश्रणातील सर्व घटक नैसर्गिकरित्या कोरडे असतात. जर तुमची त्वचा जास्त कोरडी असेल तर तुम्ही यामध्ये अधिक मध घालू शकता आणि तुमच्या त्वचेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी स्क्रब तयार करू शकता. एकदा मिश्रण तयार झाल्यावर, हळू हळू आपल्या त्वचेवर 10 मिनिट मसाज करा आणि डोळ्यांपासून किंवा डोळ्यांखालील भागापासून हा पॅक दूर ठेवा. त्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवून टाका. तमन्ना भाटियाच्या या सोप्या स्किनकेअर पद्धतीमुळे त्वचा हायड्रेट रहाते पण हा फेस स्क्रब चेहऱ्यावर वापरण्यापूर्वी हातावर पॅच टेस्ट करा.
तमन्ना तिच्या त्वचेसाठी आणि केसांसाठी तूप आणि खोबरेल तेल वापरते. ती मानते की हे जुने उपाय म्हणजे आपली त्वचा आणि केसांचे पोषण आणि सुंदर राहण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. ती घरगुती उपचारांना जास्त प्राधान्य देते. क्लीनिंग, टोनिंग आणि मॉइश्चरायझिंग या काही मूलभूत स्किनकेअर स्टेप्स आहेत ज्यांचे पालन करणे आपण बहुतेक वेळा विसरतो. हा स्किनकेअर रूटीन आपण सर्वांनी पाळला पाहिजे असा सल्ला तमन्ना आपल्या चाहत्यांना देते. कारण सुंदर त्वचा मिळविण्यासाठी या मूलभूत स्टेप्सचे पालन करणे आवश्यक आहे. तमन्नाची स्किनकेअर पद्धत मेकअप काढण्यापासून सुरू होते आणि नंतर इतर आवश्यक स्किनकेअर स्टेप्सचा वापर करून ती आपली त्वचा स्वच्छ ठेवते.