Kangana Ranaut Beauty Secrets : बॉलीवूड क्वीन कंगना राणौत खूप सुंदर आणि एक उत्तम अभिनेत्री आहे. 2023 च्या राष्ट्रीय पुरस्कारा नंतर कंगनाचा बॉलीवूडमध्ये दबदबा वाढला आहे. कंगनाचा फिटनेस आणि सौंदर्यही खूप खास आहे. अनेक मुलींना कंगना आवडते. तिचा लूक आणि तिची सिंपल स्टाईल खूप हटके असते. या प्रतिभावान आणि सुंदर अभिनेत्रीच्या चमकदार त्वचेचे रहस्य आज आपण जाणून घेणार आहोत. (Kangana Ranaut’s beauty secret is natural)
साबण लावत नाही
कंगनाची त्वचा संवेदनशील आहे त्यामुळे ती फेशियल करत नाही. कंगना तिच्या चेहऱ्यावर साबण वापरत नाही. तिचा चेहरा स्वच्छ करण्यासाठी कंगना सोप फ्री क्लिंझर वापरते आणि कधीकधी क्लीनअप देखील करते. कंगना चेहऱ्यावर मध लावते कारण त्यात अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात, जे त्वचेसाठी खूप चांगले मानले जातात.
मेकअप काढते
कंगनाला तिचा मेकअप काढण्यासाठी 20-25 मिनिटे लागतात. तिचा मेकअप लवकर साफ करता येत नाही. चेहऱ्यावरील मेकअप काढल्यानंतर कंगना प्रथम टोनर आणि मॉइश्चरायझर लावते आणि डोळ्यांचीही पूर्ण काळजी घेते, यासाठी ती आय क्रीम देखील वापरते.
हायड्रेट राहते निरोगी आहार घेते
कंगना रणौत तिची त्वचा सुंदर ठेवण्यासाठी भरपूर पाणी पिते. जास्त पाणी प्यायल्याने तिची त्वचा चमकदार राहते. यासोबतच कंगना नारळाचे पाणी देखील पिते, ज्यामुळे तिची त्वचा हायड्रेट आणि चमकदार बनते. तुम्ही देखील दिवसाला एक नारळ पाणी पिवू शकता किंवा दिवसभरात पाणी पिण्याचे प्रमाण वाढवू शकता. कंगनाचे मत आहे की चांगले दिसण्यासाठी तुम्हाला चांगला पोषक आहार घेणे गरजेचे आहे. तुम्ही जेव्हा चांगले अन्न खाता तेव्हा ते तुमच्या त्वचेवरही दिसून येते. म्हणूनच तुमची त्वचा निरोगी आणि ताजी ठेवण्यासाठी निरोगी संतुलित आहार घेणे आवश्यक आहे.
केसांची नैसर्गिक पद्धतीने काळजी घेते
हेअर स्टायलिंग उत्पादनांचे दुष्परिणाम टाळण्यासाठी कंगना वेळोवेळी आपल्या केसांची नैसर्गिक पद्धतीने काळजी घेते. कंगना तिच्या केसांसाठी ऑर्गेनिक उत्पादनांचा अधिक वापर करते. केसांचे सौंदर्य टिकून राहावे यासाठी कंगना आठवड्यातून तीनदा केसांना तेल लावते. कारण कंगनाला ओल्ड हॉलीवूड असो वा बॉलिवूड हेअरस्टाइल करायला जास्त आवडते.