Skin Care Tips : आपल्या त्वचेची खरी चमक आपण काय खातो यावर जास्त अवलंबून असते असे म्हणण्यात शंका नाही. म्हणूनच आपल्या आहाराची काळजी घेणं आपल्यासाठी खूप गरजेचं आहे, अनेक सेलिब्रिटी तुम्ही बघत असाल आपल्या डाएट प्लॅन स्ट्रिकली फॉलो करतात. आपल्या खाण्यापिण्याच्या सवयींची विशेष काळजी घेतात. म्हणून सर्वसामान्य लोकांनीही आपल्या आरोग्याची आणि त्वचेची काळजी घेतली पाहिजे. जे लोक आधीच त्वचेशी संबंधित आजारांनी त्रस्त आहेत, अशा लोकांनी आपल्या आहाराची विशेष काळजी घ्यायला हवी. (you have any skin related problems then stop eating these 5 foods )
जर तुम्ही बाहेरचे पदार्थ खाल्ले तर त्याचा तुमच्या शरीरावर आणि त्वचेवरही वाईट परिणाम होतो. अशावेळी महागड्या क्रीम देखील तुम्हाला ग्लोईंग त्वचा देऊ शकणार नाहीत. तुमचे सर्व ब्युटी प्रोडक्ट्स फेल जातील. जर तुमच्या त्वचेला मुरुम, काळे डाग, सुरकुत्या, ऑयली स्किन (Oily Skin Care Tips) इत्यादी समस्यांपासून वाचवायचे असेल तर काही खाद्यपदार्थांपासून दूर राहणे चांगले.
आज आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टींबद्दल सांगणार आहोत जे तुम्ही खाणे टाळावे, या टिप्स महिला असो वा पुरुष दाघांनाही लागू आहेत. या टिप्समुळे तुम्हाला त्वचेशी संबंधित आजार होणार नाहीत आणि तुम्हाला आधीच त्वचेशी संबंधित आजार असतील तर ते कमी होतील.
तळलेले पदार्थ
पावसाळ्यात तळलेले समोसे, पकोडे खाण्याचा मोह अनेकांना अनावर होतो. तळलेले पदार्थ खाण्यास चवदार असू शकतात परंतु ते आपल्या शरीराचे तसेच त्वचेचे नुकसान करतात. एखादवेळी तुम्ही हे पदार्थ खात असाल तर ठिक आहे. परंतु वारंवार बाहेर नाश्ता करायला गेल्यावर तुम्हा तळलेले पदार्थ खात असाल तर ते आपल्या त्वचेसाठी हानिकारक असू शकतात. यामधील तेल आणि मीठाचे प्रमाण त्वचेचे रोग, जसे की एक्जिमा, दाद आणि त्वचेचा कर्करोग वाढवू शकते.
गोड पदार्थ
आपल्यापैकी अनेकांना मिठाई खाणे आवडते. अधूनमधून चॉकलेट किंवा आईस्क्रीमचा एक स्कूप खाण्याचा मोह अनेकांना होतो. पण एखादवेळी असं गोड खाण हानिकारक नसते पण जर तुम्ही वारंवार गोड खात असाल तर ते तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकते. सुंदर त्वचेसाठी तुम्ही तुमच्या आयुष्यात पांढरी साखर, कॉर्न सिरप, मिठाई, केक, बिस्किटे, आईस्क्रीम यासारख्या गोष्टींचा मोह कमी केला पाहिजे. मिठाई तुमच्या त्वचेसाठी घातक असू शकते, विशेषत: जास्त प्रमाणात साखर खाल्याने त्वचेवर पांढरे चट्टे येवू शकते. साखर त्वचेचे संक्रमण वाढवू शकते आणि खाज सुटणे, दाद, कोरडी त्वचा यासारख्या समस्या निर्माण करू शकतात.
थंड पेय आणि अल्कोहोल
कोल्ड ड्रिंक्स आणि अल्कोहोलयुक्त सोडा ही दोन्ही अशी पेये आहेत, ज्यामुळे त्वचेला खूप नुकसान होते. यामुळे केवळ स्किनच्या समस्या निर्माण होत नाहीत तर शरीराचे निर्जलीकरण होवून त्वचेची चमक देखील कमी होते. जास्त प्रमाणात अल्कोहोल किंवा कोल्ड्रिंक्स पिणे त्वचेसाठी हानिकारक असू शकते. अल्कोहोलच्या सेवनाने त्वचा कोरडी होते आणि त्वचेचा कोमलता आणि सौंदर्य कमी होते. त्यामुळे थंड पेय आणि अल्कोहोल न पिता तुम्हा पाणी पिण्याचे प्रमाण वाढवा. भरपूर पाणी पिल्याने त्वचेच्या अनेक समस्या कमी होतात.
फास्ट फूड आणि प्रक्रिया केलेले अन्न
पॅकबंद वस्तू प्रामुख्याने खाऊ नयेत. नूडल्स, मांस, सूप किंवा रेडी टू इट यासारख्या गोष्टी अजिबात खाऊ नका. ते केवळ तुमच्या आरोग्यालाच हानी पोहोचवत नाहीत तर त्वचेवर मुरुम आणि डाग यासारख्या समस्या देखील निर्माण करतात. त्याचप्रमाणे बर्गर, पिझ्झा, फ्राईज यांसारख्या भुरळ पाडणाऱ्या गोष्टीही त्वचेसाठी शत्रू असतात. हे पदार्थ कॅलरी, चरबी आणि परिष्कृत कार्बोहायड्रेट्सचे स्त्रोत आहेत, जे त्वचेसाठी चांगले नाहीत.
मसालेदार अन्न
भारतात मिळणारे अन्न तिखट आणि मसालेदार असते. मसालेदार अन्न योग्य प्रमाणात खाल्ले तर त्याचा शरीराला नक्कीच फायदा होतो. पण त्याच्या तिसेवनाने त्वचा खराब होऊ शकते. म्हणून जास्तीत जास्त हिरव्या भाज्या किंवा हंगामी भाज्या, फळ खाण्याचा प्रयत्न करा, याचा त्वचेला फायदा होतो आणि तुमचे आरोग्य देखील चांगले रहाते.