Tips For Increase Beard Growth for Men: आजकाल दाढी पुन्हा फॅशनमध्ये आहे. लॉकडाऊनपासून मुलांमध्ये दाढीचे आकर्षण शिखरावर आहे. एक काळ असा होता की जेव्हा मुली क्लीन शेव्ह मुलांना पसंती देत असत, पण आता पुन्हा रफ अँड टफ लूकची क्रेझ तरुणांमध्ये पाहायला मिळत आहे. (5 Simple Tips That Can Help You Grow Beard Fast)
दाढी वाढवणे बहुतांशी अनुवांशिक असले तरी ती वाढवण्याची सक्ती करता येत नाही. तुम्ही प्रोफेशनल बियर्ड एक्सपर्ट असाल किंवा पहिल्यांदाच दाढी वाढवत असाल, तर तुम्ही काही टिप्स पाळल्या पाहिजेत. दाढी वाढवण्यासाठी पुरुष बर्याचदा महागड्या उत्पादनांचा वापर करतात. परंतु अनेक पुरुषांची दाढी पातळ आणि लहान दिसते. त्यामुळे तुमच्या चेहऱ्याच्या लूकवरही परिणाम होऊ शकतो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला काही सोपे घरगुती उपाय सांगणार आहोत ज्याद्वारे तुम्ही सहज दाढी वाढवू शकाल.
दाढीच्या वाढीवर केवळ पोषणाचा परिणाम होत नाही. उलट दाढीवर वाढलेले केस , ब्लॅकहेड्स आणि व्हाईट हेड्स यांचाही परिणाम होतो. ते छिद्र बंद करतात, ज्यामुळे केसांच्या वाढीवर नकारात्मक परिणाम होतो. म्हणून दाढीवर आलेल्या केसांची देखील काळजी घेणे ही तुमची जबाबदारी आहे.
बायोटिन सप्लिमेंट्स घ्या : बायोटिन सप्लिमेंट्सच्या मदतीने तुम्ही दाढी वाढण्यास गती देऊ शकता. बायोटिन असलेल्या गोष्टींचा आहारात समावेश करा. यामुळे दाढीचे केस वाढण्यास मदत होईल आणि डोक्यावरील केसांचीही वाढ होईल. त्याचबरोबर बायोटिन सप्लिमेंट खाल्ल्याने नवीन केस वाढण्यास मदत होते. बायोटिन सप्लिमेंट घेण्यापूर्वी संबधीत डॉक्टरांचा सल्ला घेणे विसरू नका.
बदामाचे तेल लावा : व्हिटॅमिन ई समृद्ध बदाम तेल देखील दाढी वाढण्यास मदत करते. रोज रात्री झोपण्यापूर्वी बदामाचे तेल हातावर घ्या आणि दाढीला लावून दाढीला मसाज करा. यामुळे दाढीच्या केसांची वाढ होण्यास सुरुवात होईल आणि तुमची दाढीही जाड दिसू लागेल.
टी ट्री ऑइल लावा : दाढीचे केस वाढवण्यासाठी तुम्ही टी ट्री ऑइलची मदत घेऊ शकता. यासाठी रोज रात्री झोपण्यापूर्वी टी ट्री ऑइलमध्ये एरंडेल तेल मिक्स करून चेहऱ्यावर लावा. या तेलाने दाढीला मसाज करा. यामुळे दाढीच्या केसांची वाढ झपाट्याने होईल आणि काही दिवसातच तुमची दाढी दाट दिसू लागेल.
ट्रिमिंग आवश्यक आहे : दाढीची वाढ सुधारण्यासाठी, वेळोवेळी ट्रिम करणे देखील खूप गरजेचे आहे. दाढीचे विकली ट्रिमिंग करा. यामुळे तुमच्या दाढीची वाढ चांगली होऊ लागते. त्याच वेळी, ट्रिमिंग केल्याने, आपल्या चेहरऱ्याला लूक देखील सुधारतो.
फेस पॅक वापरा : दाढीचे केस वाढवण्यासाठी तुम्ही फेस पॅकची मदत घेऊ शकता. यासाठी आवळा आणि मोहरीची पाने एकत्र करून त्याची बारीक पेस्ट तयार करा. ही पेस्ट दाढीसह संपूर्ण चेहऱ्यावर फेसपॅकप्रमाणे लावा आणि वीस मिनिटांनी थंड पाण्याने चेहरा धुवा.
आणखी एक प्रभावी घरगुती उपाय म्हणजे लिंबाचा रस आणि दालचिनी पावडर मिक्स करून पेस्ट तयार करा. यासाठी एक चमचा लिंबाचा रस आणि थोडी दालचिनी पावडर घाला. त्याचा पातळ थर चेहऱ्यावर लावा. 15-20 मिनिटे तसेच राहू द्या. यानंतर सौम्य क्लींजरने धुवा. यानंतर, चेहऱ्याच्या त्वचेचा ड्राय होवू नये यासाठी नियमित मॉइश्चरायझर लावायला विसरू नका. हा पॅक वापरण्यापुर्वी त्वचेच्या लहान भागावर पॅच टेस्ट करा. जळजळ किंवा खाज येत असल्यास हा पॅक अजिबात वापरू नका.
आहारात बदल करा : सकस आणि संतुलित आहारामुळे दाढी वाढण्यास मदत होते. आहारात प्रथिने आणि बायोटिन युक्त अन्नाचा समावेश केल्यास केसांची वाढ होण्यास मदत होते. यामागील शास्त्र असे आहे की केस हे प्रथिनांचे बनलेले असतात, त्यामुळे जास्त प्रथिने घेतल्याने केसांची वाढ होण्यास मदत होते. मांस, मासे आणि अंडी हे काही पर्याय जेवणात स्वीकारले जाऊ शकतात. दुसरीकडे, शाकाहारी लोक क्विनोआ, सोया चंक्स, पालक, बीन्स, एवोकॅडो आणि चिया बियांचे सेवन करू शकतात.
जसे निरोगी केसांना वाढण्यासाठी तेल आणि फॅटची आवश्यकता असते, त्याचप्रमाणे दाढीला वाढण्यासाठी या पोषक तत्वांची आवश्यकता असते. आहारात खालील अन्नाचा समावेश केल्यास त्यातून आपल्याला योग्य प्रमाणात पोषक तत्वे मिळतात.
बायोटिनसाठी : नट्स, संपूर्ण धान्य, एवोकॅडो, चिकन, अंडी आणि दूध.
फॉलिक ऍसिडसाठी : हिरव्या पालेभाज्या आणि कडधान्ये.
त्वचेची चांगली काळजी घ्या
स्वच्छ त्वचा केसांच्या वाढीस मदत करते. दाढी वाढवण्यासाठी तुम्हाला संपूर्ण त्वचेची काळजी घेण्याची आवश्यकता नाही. दिवसातून दोनदा सौम्य क्लिन्झरने चेहरा धुणे पुरेसे आहे. पण नंतर चांगले मॉइश्चरायझर लावा.
पण, जर तुम्ही बियर्ड वाढवण्यासाठी खरोखर गंभीर असाल तर आठवड्यातून एकदा चेहऱ्याचा मसाज आणि स्क्रब देखील करू शकताा. यामुळे रक्ताभिसरण क्रिया सुधारते आणि मृत त्वचा काढून टाकते. परिणामी केसांची चांगली वाढ होण्यास मदत होते.
धूम्रपान सोडा
धूम्रपान सोडणे केवळ दाढी वाढवण्यासाठीच नाही तर आरोग्यासाठीही चांगले आहे. धूम्रपान करणे आरोग्यासाठी किती धोकादायक आहे हे आपणा सर्वांना माहीत आहे. याचा आपल्या शरिराच्या प्रत्येक भागावर परिणाम होतो. म्हणून आपल्या आरोग्याची आणि लूकची काळजी घेण्यासाठी धूम्रपानापासून दूर रहा.