Best Fashion Designer : जेव्हा फॅशनच्या प्रेरणेचा विचार केला जातो तेव्हा भारतातील काही खास नावांचा विचार केला जातो. फॅशन ट्रेंडपासून ते आयकॉनिक स्टाइल स्टेटमेंट्सपर्यंत, बॉलिवूड सेलिब्रिटींना फॅशन जगताबद्दल सर्व काही माहित असते. बॉलीवूडमधील सर्वोत्कृष्ट फॅशनची कॉपी करण्याचा प्रत्येक फॅशन प्रेमी नेहमीच सर्वतोपरी प्रयत्न करत असतो यात आश्चर्य नाही. आपल्यापैकी बहुतेकजण, स्वेच्छेने आणि अनिच्छेने आपल्या बहुतेक फॅशन स्टाईल बॉलीवूड सेलिब्रिटींकडून कॉपी करत असतात. बॉलिवूड सेलिब्रिटि देखील त्यांच्या अनेक कार्यप्रसंगातून नवनवीन फॅशन गोल्स सेट करत असतात. म्हणून आज आम्ही तुम्हाला भारतीय फॅशन डिझायनर्सबद्दल सांगणार आहोत ज्यांना नेहमीच सेलिब्रिटिंनी डोक्यावर घेतले असता. तुमची उत्सुकता वाढवण्यासाठी बॉलिवूड सेलिब्रिटींच्या या आवडत्या भारतीय फॅशन डिझायनर्सनी नावे जाणून घ्या. (Best Indian Fashion Designer Of Bollywood Celebs)
मनीष मल्होत्रा (Manish Malhotra)
बॉलीवूडचे प्रसिद्ध डिझायनर मनीष मल्होत्राने फॅशन जगतात आपला प्रवास मॉडेल म्हणून सुरू केला आणि योगायोगाने तो डिझायनर बनला. मनीष मल्होत्रा हा बॉलीवूड उद्योगातील सर्वात जुन्या हा प्रोफाईल कॉउचर डिझायनर्सपैकी एक आहे. दिवंगत श्रीदेवी कपूर, जान्हवी कपूर, प्रियांका चोप्रा, करीना कपूर खान, करण जोहर यांसारख्या दिग्गज कलाकारांनी त्याच्या डिझाइन्सला पसंती दिली आहे आणि आजही अनेक नवीन सेलिब्रिटी मनीष मल्होत्राच्या फॅशन्स डिझाइन्सला पसंती देतात.
सब्यसाची मुखर्जी (Sabyasachi Mukherjee)
दीपिका पदुकोणपासून अनुष्का शर्मापर्यंत, इंडस्ट्रीतील प्रत्येकाला सब्यसाची मुखर्जी हे लेबल आवडते. स्वप्नवत लग्न साकारत असताना सब्यसाची मुखर्जीच्या शाही वधूच्या पोशाखाची जगभरात एक भव्य प्रतिमा आहे, ज्यामुळे बहुतेक बॉलीवूड दिवा ‘सब्यसाचीच्या वधू’ बनतात. अलिकडे अनेक बॉलीवूड दिवाांनी सब्यसाचीने डिझाइन केलेला ब्रायडल लेहेंगा घातला आहे.
https://www.instagram.com/p/CuCgKJAIvNx/?utm_source=ig_web_copy_link&igshid=MzRlODBiNWFlZA==
अबू जानी आणि संदीप खोसला (Abu Jani and Sandeep Khosla)
अबू जानी आणि संदीप खोसला ही जोडी भारतातील काही आलिशान लेबले तयार करत आहे, जसे की अबू जानी संदीप खोसला, एजेएसकेचे मार्ड, एजेएसकेचे साबू आणि असे बरेच ब्रॅंड तुम्हाला मार्केमध्ये पहायला मिळतील. अबू जानी आणि संदीप खोसलाचे डिझाइन्स नेहमीच ऐश्वर्या बच्चन ते सारा अली खान ते कार्तिक आर्यन ते अगदी सोनम कपूरपर्यंतच्या बी-टाउन सेलिब्रिटींना आवडते.
https://www.instagram.com/p/CteMpfrtWnV/?utm_source=ig_web_copy_link&igshid=MzRlODBiNWFlZA==
मसाबा गुप्ता (Masaba Gupta)
मसाबा गुप्ता फॅशन गेममध्ये तुलनेने नवीन आहे परंतु रणवीर सिंग, सोनम कपूर, रिया कपूर, करीना कपूर आणि इतर बर्याच सेलिब्रिटींमध्ये यशस्वीरित्या प्रतिभावान आणि लोकप्रिय आहे. आधुनिक कारागिरीसह तिचे भारतीय सौंदर्यशास्त्राचे मिश्रण अनेक सेलिब्रिटिंना आकर्षित करते. मसाबा गुप्ता हिंदी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेत्री नीना गुप्ता यांची मुलगी आहे. मसाबा गुप्ताने नुकतेच अभिनेता सत्यदीप मिश्रासोबत लग्न केले आहे. फॅशन डिझायनर आणि अभिनेत्री मसाबा गुप्ता तिच्या परफेक्ट आउटफिटसाठी ओळखली जाते.
https://www.instagram.com/reel/CsoD92cODWh/?utm_source=ig_web_copy_link&igshid=MzRlODBiNWFlZA==
अनामिका खन्ना (Anamika Khanna)
सेलिब्रिटी डिझायनर अनामिका खन्ना ही बॉलिवूड फॅशनिस्टा सोनम कपूरच्या वैयक्तिक आवडींपैकी एक आहे. अनामिका ही पहिली भारतीय डिझायनर आहे जिला ‘अना-मिका’ हे आंतरराष्ट्रीय लेबल मिळाले आहे. बिझनेस ऑफ फॅशन (BOF) अंतर्गत येत, अनामिका भारतीय शैलीला पाश्चिमात्य तंत्रांचे मिश्रण करण्यासाठी ओळखली जाते.
अनिता डोंगरे (Anita Dongre)
अनिता डोंगरे ही देशातील सर्वात यशस्वी व्यावसायिक फॅशन डिझायनर्सपैकी एक आहे. अनिता डोगरेला भारतातील प्रसिद्ध फॅशन डिझायनर म्हणूनही ओळखले जाते. बॉलिवूड इंडस्ट्रीतील अनेक अभिनेत्री देखील अनिता डोगरेने डिझाइन केलेले कपडे घालतात. अनिता ही देशातील सर्वात यशस्वी व्यावसायिक फॅशन डिझायनर मानली जाते. अनिताने फॅशन 1995 साली डिझायनरचा प्रवास सुरू केला आणि आज तिचे AND (वेस्टर्न वेअर) आणि ग्लोबल देसी नावाचे ब्रँड बाजारात आहेत. याशिवाय तिचा अनिता डोंगरे हा सिग्नेचर लेबल ब्रँड आहे जो लग्नाचे कपडे डिझाइन करतो.