kajol black And Red Saree Look : काजोलच्या मंत्रमुग्ध करणार्या साडीच्या फॅशन सेन्सने अनेकांना वेड लावले आहे. काजोलचा कोणताही लूक असो तो नेहमी एव्हरग्रीन राहिला आहे. गेल्या काही वर्षांमध्ये लाल आणि काळ्या लूकसाठी काजोलचे खूप कौतुक होत आहे आणि ती सध्याची ट्रेंडींग फॅशन दिवा आहे. म्हणून आज आपण काजोलचे काही फेमस आणि आवडते लूक्स बघणार आहोत. (Kajol Love tradishional saree look Here Are Her Top Desi Looks In Red Black saree)
https://www.instagram.com/p/Csann_orlCO/?utm_source=ig_web_copy_link&igshid=MzRlODBiNWFlZA==
काजोलला तिच्या ड्रेसिंग सेन्समुळे अनेकदा ट्रोलर्सचे लक्ष्य केले जाते. विशेषतः जेव्हा ती वेस्टर्न लूक कॅरी करते तेव्हा यूजर्सना तिची स्टाइल फारशी आवडत नाही. मात्र काजोल जेव्हा देसी लूकमध्ये दिसते तेव्हा हेच ट्रोलर्स तिचा वाहवाह करताना दिसतात. काजोल प्रत्येक वेळी तिच्या साड्यांच्या निवडीवरून ट्रेंडमध्ये असते आणि चाहत्यांकडून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत असतो. काजोलचा साधा साडी लूक 50 च्या दशकातील महिलांसाठीच नाही तर तरूण मुलींसाठी देखील प्रेरणादायी आहे. कधी काजोल लाल तर कधी काळ्या रंगाच्या साडीत सुंदर दिसत दिसते. काजोलचे साडी कलेक्शन खूप हटके असते आज आपण तिच्या याच साडी कलेक्शनवर नजर टाकणार आहोत.
https://www.instagram.com/p/CmHDaKlqB4C/?utm_source=ig_web_copy_link&igshid=MzRlODBiNWFlZA==
प्रमोशनसाठी तयार काजोलने लाल रंगाची साडी निवडली. ज्यावर भारी जरीचे काम होते आणि हाफ स्लीव्ह ब्लाउजवर मॅचिंग एम्ब्रॉयडरीही केली होती. ज्याला काजोलने डायमंड नेकपीससोबत कॅरी केले होते. न्यूट्रल टोनचा मेकअप मोकळ्या केसांवर सुंदर दिसत होता.
https://www.instagram.com/p/ClGblYgqFSx/?utm_source=ig_web_copy_link&igshid=MzRlODBiNWFlZA==
त्याचबरोबर काजोल ब्लॅक कलरची साडी आणि स्लीव्हलेस ब्लाउजमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. काळ्या साडीला लाल रंगाची बॉर्डर आहे. काजोलने शायनी लाल लिपस्टिक आणि शीमर मेकअपने आपला लूक पूर्ण केला आहे. कानात घातलेली मोत्यांची चांदबाली साडीसोबत शोभून दिसत आहे.
काजोल सतत अशा साड्यांमध्ये दिसते जी सहज कॅरी करता येते. काजोलचा हा डार्क मरून शेड अनेक महिलांच्या फेवरेट लिस्टमध्ये अॅड झाला आहे. तिने हाफ स्लीव्ह आणि व्ही नेकलाइनसह ब्लाउजसह ही साडी पेअर केली आहे. बॅकलेस ब्लाउजसोबत तिने ही साडी कॅरी केली आहे. यासोबत तिने मॅचिंग बांगड्या आणि स्टेटमेंट इअरिंग्ससह तिचा लूक पूर्ण केला आहे.
रफल साडी स्टाईल
काजोल अनेकदा सुंदर लूक कॅरी करताना दिसते. काजोलने मनीष मल्होत्राच्या कलेक्शनमधील गुलाबी रंगाची रफल साडी छान स्टाईलने पेअर केली होती. कुंदनचा लेयर्ड नेकपीस स्लीव्हलेस ब्लाउजशी मॅच होता ज्यात काजोल सेक्सी दिसत होती. काजोलबद्दल एक खास गोष्ट सांगतो की काजोल तिच्या चाहत्यांना कधीही निराश करत नाही. सोशल मीडिया प्रेमी काजोल तिच्या इंस्टाग्रामवर रोज काही ना काही शेअर करत असते. इंस्टाग्रामवर चाहत्यांना तिच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्याची झलक जवळजवळ दररोज पाहायला मिळते.
सूट सूट करदा!
‘सलाम वेंकी’ या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान काजोलने घातलेला हा ब्लॅक सूट देसी वाईब्स देत होता. तुम्ही देखील कॉलेज फक्शनमध्ये हा लूक कॉपी करू शकता.
https://www.instagram.com/p/Cl09KqtKJ52/?utm_source=ig_web_copy_link&igshid=MzRlODBiNWFlZA==
प्रिंटेड फ्लोरल साडी
काजोलच्या या साडीवर गुलाबी, हिरवा, पांढरा आणि पीच शेड्समध्ये फ्लोरल प्रिंट्स दिसत आहे ज्यावर हलकी एम्ब्रॉयडरीही केली आहे. साडीत बॉर्डरवर चांदीची गोटा पट्टी जोडली आहे. स्ट्रॅपी ब्लाउजने काजोलचा हॉटनेस वाढवला असून तिने या साडीसोबत कॅरी केलेल्या ब्लाउजचा पॅटर्न स्लीव्हलेस असल्याने अधिक आकर्षक दिसत होता.
काजोलची सिझलिंग स्टाइल
काजोलने पुन्हा एकदा तिच्या सिझलिंग स्टाइलने चाहत्यांना वेड लावले आहे. नवीन फोटोशूटमध्ये काजोल काळ्या रंगाच्या जॉर्जेट साडीमध्ये अप्रतिम फिगर प्लॉट करताना दिसत आहे. काळ्या जॉर्जेट साडीला स्टाइल करण्यासाठी अभिनेत्रीने जबरदस्त डिझायनर फुल स्लीव्हज ब्लाउज घातला होता हा बोल्ड लूक पूर्ण करण्यासाठी काजोलने सटल मेकअपसह बोल्ड आयलाइनर लावून मेकअप पूर्ण केला होता. आणि या साडीवर तिने केसांचा बन टाकून क्लासी हेअरस्टाईल केली होती. जर तुम्हाला काजोलचा हा लूक रिक्रियेट करायचा असेल तर तुम्ही 1000 रुपयांमध्ये अशा जॉर्जेट साड्या ऑनलाइन मिळवू शकता. मात्र, तुमच्या बजेटनुसार चांगले फॅब्रिकही खरेदी करू शकता.