Body Odour In Summer : उन्हाळ्यात जास्त घाम येतो आणि त्यामुळे लोकांना खूप चिडचिड आणि चिकटपणा जाणवतो. घाम येणे ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे जी शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यास मदत करते. पण, काही लोकांना उन्हाळ्यात जास्त घाम येतो. त्याच वेळी शरीराच्या काही भागांमध्ये देखील जास्त घाम येतो. उदाहरणार्थ, अंडरआर्म्समध्ये घाम येण्याची समस्या उन्हाळ्यात सर्वात त्रासदायक असते कारण जास्त घाम आल्याने कपडे खराब होऊ शकते आणि तुम्हाला ऑकवर्डही वाटू शकते. त्याचबरोबर काही लोकांच्या घामाला दुर्गंधीही येते त्यामुळे अनेकदा लोक कामानंतर कुणाला भेटणे टाळतात. (Home remedies to get rid of body odor in summer in marathi)
घामाच्या दुर्गंधीमुळे अनेकवेळा लोकांना इतरांसमोर लाजीरवाणे वाटू शकते. त्याच वेळी घामाच्या दुर्गंधीमुळे तुम्हाला अस्वस्थ वाटू शकते. जर तुम्हाला उन्हाळ्यात खूप घाम येत असेल आणि घामाच्या दुर्गंधीपासून सुटका हवी असेल तर तुम्ही यासाठी काही नैसर्गिक उपायांची मदत घेऊ शकता.हे उपाय कोणते ते आपण आज जाणून घेणार आहोत.
उन्हाळ्यात शरीराची दुर्गंधी दूर करण्यासाठी घरगुती उपाय (Home remedies to get rid of body odor in summer)
स्वच्छतेची काळजी घ्या
घामाचा वास येऊ नये म्हणून शरीराच्या स्वच्छतेची काळजी घ्या. त्वचेमध्ये लपलेल्या बॅक्टेरियामुळे घामाचा वास वाढतो. उन्हाळ्यात आंघोळीसाठी तुम्ही अँटीबॅक्टेरियल साबण वापरू शकता. तसेच आंघोळीच्या पाण्यात कडुलिंबाची पाने मिसळून त्या पाण्याने आंघोळ करावी. हे सर्व बॅक्टेरिया साफ करण्यास मदत करेल.
कपड्यांची काळजी घ्या
उन्हाळ्यात सैल आणि सुती कपडे घाला. सुती कपडे त्वचेला निरोगी ठेवण्यास आणि संसर्गापासून संरक्षण करण्यास मदत करतात. सुती आणि सैल कपडे श्वास घेण्यायोग्य असतात आणि घाम सुकण्यास मदत करतात.
भरपूर पाणी प्या
शरीराचे तापमान नियंत्रणात ठेवण्यासाठी स्वतःला हायड्रेटेड ठेवा. दिवसातून 8-10 ग्लास पाणी प्या आणि फळांचा रस, नारळाचे पाणी आणि इतर निरोगी द्रव देखील घेऊ शकता. उन्हाळ्यात आपल्या शरीराचे तापमान जास्त असते त्यामुळे शरीराला आतून थंड ठेवणे गरजेचे आहे. उन्हाळ्यात डिहायड्रेशन होऊ शकते म्हणून सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत भरपूर पाणी पिण्यावर भर द्या. तुम्ही हंगामी फळे जसे की टरबूज, काकडी, खरबूज आणि ऊसाच्या रसासारख्या रसदार फळांचे आणि ज्युसचे सेवन करू शकता. त्यामुळे शरीरातील पाण्याची पातळी मेंटेन ठेवता येते.
टोमॅटोचा रस
टोमॅटोचा रस प्यायल्याने आणि टोमॅटोचा रस लावल्याने शरीरातील दुर्गंधी कमी होऊ शकते. टोमॅटोमध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-सेप्टिक गुणधर्म असतात ज्यामुळे शरीराला दुर्गंधी निर्माण करणारे जिवाणू तयार होण्याचे प्रमाण मर्यादित होते. तसेच टोमॅटोचा रस प्यायल्याने शरीराचे तापमान कमी होते, त्यामुळे घाम येणे कमी होते.
ही माहिती सामान्य ज्ञानावर आधारीत असून तुम्हाला कोणताही त्रास असल्यास आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.