International Self Care Day : दरवर्षी, आंतरराष्ट्रीय सेल्फ केअर डे 24 जुलै रोजी साजरा केला जातो. या तारखेला एक विशिष्ट महिना आणि तारखेचा फॉर्म असतो जो 7/24 सारखा दिसतो. यावरून असे दर्शविले जाते की स्वत: ची काळजी दिवसाचे 24 तास, आठवड्याचे सात दिवस तुम्ही घेतली पाहिजे. हा दिवस स्वतःवर प्रेम करण्यासाठी, आपल्या शरीराची आणि मनाची काळजी घेण्यासाठी साजरा केला जातो. (How to take care of your mind and body)
या वर्षीची थीम “लवचिकता, अनुकूलता आणि प्रतिकूलतेत भरभराट” (Resilience, adaptability and thriving in adversity)ही आहे. लोकांमध्ये आरोग्याविषयी लवचिकता निर्माण करण्यासाठी जनजागृती करणे, यामुळे तणावाचे व्यवस्थापन करण्यास, नकारात्मक भावनांना तोंड देण्यास, शारीरिक आणि मानसिक आरोग्य राखण्यात मदत होवू शकते.
प्रत्येक दिवशी स्वत:ची काळजी घेण्यास प्राधान्य देणे महत्त्वाचे असले तरी, काही स्वयं-काळजीच्या पद्धती तुम्ही तुमचे आरोग्य मेंटेन ठेवू शकता. या वर्षी आंतरराष्ट्रीय सेल्फ केअर डे कसा साजरा करायचा आणि आपली काळजी कशी घ्यायची याबद्दल आज आपण जाणून घेवूया.
सेल्फ केअर कशी घ्यायची? (How to take care of your Self)
स्वतःसाठी वेळ द्या
वेलनेस आणि सौंदर्य कंपन्या जे विकतात तशीत आपली फॅन्सी लाईफ असणे आवश्यक नाही. कारण ते प्रोडक्ट्स तुमच्या व्यस्त जीवनशैलीला अनुसरून तयार केले असते. या फॅन्सी गोष्टीचे आयुष्यही कमी असते म्हणून स्वतःसाठी वेळ काढा. नैसर्गिक सौंदर्य मिळवणे खूप सोपे असू शकते. दिवसातून फक्त एक तास असला तरी पुरेसा आहे. तुम्हाला आनंद देणारी काहीतरी कृती करण्यासाठी तुमच्या कॅलेंडरमध्ये मी-टाइम शेड्यूल करा. याचा अर्थ तुमची आवडती वेब सिरीज पाहणे, एखादे पुस्तक वाचणे, काहीही न करता गाणी ऐकत वॉकिंगला जाणे अशा अनेक कृती असू शकतात. तुम्ही काय करता याने काही फरक पडत नाही, तुमच्यासाठी तुम्ही कीती वेळ देता हे महत्त्वाचे आहे.
पौष्टिक आहार घ्या
स्वत: ची काळजी ही फक्त बबल बाथ आणि फेस मास्कच्या पलीकडे आहे. निरोगी खाण्याइतके सोपे आणि प्रभावी काही नाही. म्हणून स्वत: ची काळजी घेण्यासाठी पौष्टिक आहार सर्वात महत्वाच्या पैलूंपैकी एक आहे. हिरव्या, पालेभाज्या, ताजी फळे आणि संपूर्ण धान्य यांचा समतोल आहार घेतल्याने तुमची उर्जा पातळी वाढतेच पण तुमचे एकूण आरोग्यही सुधारते. त्याच वेळी, तुम्हाला आनंद देणारे पदार्थ जसे की तुमचा आवडता पदार्थ गोड पदार्थ खायला विसरू नका. पण हे पदार्थ खात असताना अतिरेकही करू नका आणि संयम ठेवा.
रोज व्यायाम करा
नियमित व्यायामामुळे केवळ तंदुरुस्तीची पातळी वाढविण्यात मदत होते. यामुळे तणाव पातळी कमी करण्यास आणि डोपामाइन आणि ऑक्सिटोसिन सारख्या ‘फील-गुड’ हार्मोन्सची निर्मिती करून मानसिक आरोग्य सुधारण्यास देखील मदत होते. यासाठी तुमच्या कुटुंबाशी आणि मित्रांसोबत संपर्कात राहण्याचा हा एक चांगला मार्ग आहे. विशेषत: जर तुम्ही जर सामुहीक वर्कआऊट करत असाल तर तुमच्या व्यायामाचा उत्साह अधिक वाढतो. व्यायामासाठी परिपूर्ण फिटनेस दिनचर्या असण्याची किंवा जिममध्ये जाण्याची आवश्यकता नाही. तुम्ही रोज घरी पायऱ्या चढू उतरू शकता किंवा योग, पोहणे किंवा नृत्य यासारख्या शारीरिक क्रिया करू शकता.
भरपूर झोप घ्या
आपल्या सर्वांना माहिती आहे की पुरेशी झोप घेणे हे चांगले आरोग्य राखण्यासाठी महत्त्वाचे आहे, परंतु आपल्यापैकी बहुतेकांना ती पुरेशी मिळण्यासाठी झगडावे लागते. दररोज रात्री किमान 7-8 तास झोपेचे लक्ष्य ठेवले पाहिजे. झोपेच्या निरोगी सवयींमुळे शांत झोप मिळू शकते.
माइंडफुलनेससाठी विपश्यना
जीवन आपल्याला कोणत्या प्रसंगापुढे कसे उभे करेल सांगता येत नाही त्यासाठी आपण आपल्या मनाची तयारी ठेवली पाहिजे. यासाठी रोज विपश्यना करणे महत्वाचे आहे. फोकस आणि एकाग्रता सुधारण्यास, तणाव दूर करण्यात आणि सकारात्मक विचार आणि भावना वाढविण्यात विपश्यना मदत करते. तुम्ही श्वासोच्छवासाचे व्यायाम, ध्यान, योगाद्वारे किंवा दररोज तुमच्या अंतर्मनाशी संपर्क साधून तुमच्या मनाची ताकद वाढवू शकता.