Healthy Habits Life Will Change Completely : या धावपळीच्या जगात, आपण अनेकदा अर्थपूर्ण बदल शोधत असतो जे आपल्या जीवनात आनंद आणि स्थिरता आणू शकतात. तेव्हा अशा जीवनाची कल्पना करा जिथे सकारात्मकता, उत्पादकता आणि आनंद केंद्रस्थानी असेल आणि तुम्हाला उत्साही जीनवाकडे घेवून जाईल. अनेकदा उत्साही आणि आनंदी राहण्यासाठी काय करावे हे अनेकांना सुचत नाही. म्हणून आणज आम्ही तुम्हाला सिक्स सवयींबद्दल सागंणार आहोत ज्या पुढील सहा महिन्यांसाठी मनापासून फॉलो केल्यास तुमच्यातील उत्साह पुन्हा जागृत करू शकेल. या सहा सवयींमध्ये तुमच्यातला आनंद अनलॉक करण्याची आणि तुमच्या जीवनाला पुन्हा आकार देण्याची क्षमता आहे.
सकाळी उठा (wake up in morning)
पहाटे 5 वाजता उठण्याचा प्रयत्न करा. तुमचा दिवस सकाळी लवकर सुरू करा आणि उर्वरित दिवस फलदायी बनवा. यामुळे तुम्हाला नियोजन, वर्कआऊट, वाचन इत्यादीसाठी अधिक वेळ मिळतो. तुमचे झोपेचे वेळापत्रक निश्चित करा. तुमचे शरीर आणि मन रिचार्ज करण्यासाठी प्रत्येक रात्री पुरेशी झोप घेण्यास प्राधान्य द्या. सातत्यपूर्ण झोपेचे वेळापत्रक शरीराची कार्ये आणि मूड सुधारू शकते. लवकर उठा आणि तुमच्या उर्वरित दिवसाची प्लॅनिंग करा.
नवीन स्किल्स शिका (Learn new skills)
रोज काहीतरी नवीन शिकण्याची सवय लावा. ऑनलाइन अभ्यासक्रम जॉईन करा आणि तुमचे ज्ञान आणि कौशल्ये वाढवा. ऑनलाइन नवीन कौशल्य शिकण्यासाठी दिवसातून किमान 30 मिनिटांचा वेळ काढा. ही नवीन कौशल्ये तुम्हाला व्यावसायिक मदत करू शकतात आणि तुमची आर्थिक बचत करू शकतात. उदाहरणार्थ, तुम्ही डिजिटल मार्केटिंग किंवा डेटा विश्लेषणसारखे कोर्स घरी बसून शिकू शकता.
निसर्गाच्या सानिध्यात जा (Get close to nature)
निसर्गात बाहेर फेरफटका मारणे ही एक अद्भुत सवय आहे ज्याचे तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी अनेक फायदे होऊ शकतात. निसर्गात राहिल्याने मन आणि मेंदू शांत राहतो, चिंता कमी होऊ शकते आणि तुमचा एकंदर मूड हॅप्पी आणि उत्साही होवू शकतो. हा 30 मिनिटांचा वेळ चाल तुमच्या आयुष्यात खूप मोठा बदल घडवू शकते.
कृतज्ञता जर्नलिंग (Gratitude Journaling)
कृतज्ञता जर्नलिंग ही आणखी एक जीवन बदलणारी सवय आहे जी तुम्ही तुमच्या जीवनात निश्चितपणे समाविष्ट केली पाहिजे. कृतज्ञता जर्नलिंग ठेवल्याने तुमचे लक्ष जीवनातील सकारात्मक पैलूंकडे वळते, ज्यामुळे आनंद वाढतो. झोपण्यापूर्वी काही तरी लिहून आपल्या मनातील भावनांना वाट मोकळी करून द्या. यामुळे तुमच्या झोपेची गुणवत्ता सुधारेल. तुम्ही तुमचे विचार, ज्या गोष्टींसाठी तुम्ही कृतज्ञ आहात, तुमची उद्दिष्टे, आवडी इत्यादींबद्दल तुम्ही झोपण्यापूर्वी लिहून ठेवू शकता. याचा तुमच्या मानसिक आरोग्यावर सकारात्मक प्रभाव पडेल.
मानसिक आणि शारीरिक आरोग्याची काळजी (Mental and physical health care)
तुमच्या मानसिक तसेच शारीरिक आरोग्याची चांगली काळजी घेण्यास प्राधान्य द्या. आपले शारीरिक आरोग्य मजबूत करण्यासाठी व्यायाम करणे महत्वाचे आहे. दिवसातून किमान एक तास व्यायाम करा. यासाठी जीमला जाणे आवश्यक नाही आपण घरी व्यायाम करू शकता. तुम्ही पोहणे, धावणे इत्यादी व्यायाम घरी करू शकता. हे तुम्हाला तंदुरुस्त आणि शारीरिकदृष्ट्या सक्रिय ठेवण्यास मदत करेल. मानसिक आरोग्यासाठी योगा आणि मेडिटेशन करा.
वाचनाची सवय लावा (Habit of reading)
वाचन हा आपल्या मनाचा सर्वोत्तम व्यायाम आहे! वाचनाचे फायदे आपल्या सर्वांना माहीत आहेत. आपल्यापैकी अनेकांना बसणे आणि प्रत्यक्षात वाचणे कठीण जाते. पण दिवसाला 10 पाने तरी वाचून बघा तुमच्या पॉझीटिव्ह एनर्जी जाणवते. शाळा आणि कॉलेजनंतर आणि वाचन करणे सोडून देतो. त्यामुळे आपल्याला वाचणे हा प्रकार बोर वाटू शकतो. अशा वेळी अवांतर वाचन करा. कथा कादंबरी वाचा किंवा संस्पेन्स स्टोरी वाचा. लहान पुस्तकांपासून सुरुवात करा. यामुळे तुमचा आत्मविश्वास, ज्ञान वाढेल आणि तुम्हाला फ्रेश फिल होईल. वाचनाची सवय लावल्याने मन मजबूत होते आणि नवीन गोष्टी शिकायला आणि आत्मसात करायला मिळते.