Siddharth Chandekar his mother married again : लग्न झालेले जोडपे जेव्हा पुन्हा लग्न करतात त्याला पुनर्विवाह म्हणतात. पुनर्विवाह सहसा घटस्फोटानंतर होतो, परंतु जोडीदाराचा मृत्यू झाल्यास देखील हे होऊ शकते. जर एखाद्या कपलला त्यांच्या पूर्वीच्या लग्नापासून मुले असतील तर ती मुले सहसा पुनर्विव केल्यानंतर त्यांच्यासोबतच रहायला लागतात. पुनर्विवाह सामान्यतः जोडप्यासाठी एक नवीन सुरुवात मानली जाते. ते नवीन आडनाव लावू शकतात, नवीन घरात राहतात आणि एकत्र नवीन जीवन तयार जगायला लागतात. अनेकदा, पुनर्विवाह केलेल्या जोडप्यांना असे वाटते की त्यांना आनंदी जीवन जगण्याची दुसरी संधी मिळत आहे. (Does Remarriage Affect Children? Siddharth Chandekar his mother married again)
पालकांच्या आनंदासाठी मुलांचा पुढाकार महत्वाचा
मिड-डेला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत, चित्रपट निर्माते झोया अख्तर आणि रीमा कागती यांनी उघड केले की त्यांची बहुचर्चित मालिका, मेड इन हेवन, (Made in Heaven) वास्तविक जीवनातील घटनांपासून प्रेरीत आहे. शोच्या पहिल्या सीझनमधील एका विशिष्ट भागामध्ये एका वृद्ध जोडप्याने मुलांच्या इच्छेविरुद्ध लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. नंतर, कथानकात मुलांनी त्यांच्या आईच्या लग्नात भाग घेतल्याने त्यांचे हृदय परिवर्तन झाल्याचे दिसत आहे. अशीच एक हृदयद्रावक वास्तविक जीवनातील घटना पुण्यात घडली आहे. पण एका वेगळ्याच वळणाने, इथे वृद्ध वधूच्या मुलाने लग्नाला विरोध केला नाही तर त्यांने उत्साहानेआपल्या आईसाठी पुढाकार घेतला.
आपल्या आईच्या आयुष्याची नवी सुरवात
ही प्रेरणादायी कथा आहे मराठी अभिनेता सिद्धार्थ सीमा चांदेकर (Siddharth Chandekar) आणि त्याच्या आईची (Siddharth Seema Chandekar). अभिनेत्याने त्याच्या आईच्या लग्नातील एक फोटो शेअर केला आणि मराठी सिनेसृष्टित एक नवी चर्चा सुरू झाली. आपल्या आईच्या आयुष्याची नवी सुरवात करून देताना सिद्धार्थ खूप आनंदी होता. त्याने मराठीत या फोटोला सुंदर कॅप्शन दिले. “Happy Second Innings आई! तुला पण एक जोडीदार हवा, तुझ्या मुलांव्यतिरिक्त एक आयुष्य हवं, तुझं एक स्वतंत्र सुंदर जग हवं, हे कधी लक्षातच नाही आलं गं माझ्या. किती ते एकटं एकटं रहायचं? तू आत्ता पर्यंत सगळ्यांचा विचार केलास, सगळ्यांसाठी पाय झिजवलेस. आता फक्त तुझा आणि तुझ्या नव्या जोडीदाराचा विचार कर. तुझी पोरं कायम तुझ्या पाठीशी आहेत. तू माझं लग्न थाटात लावलंस, आता मी तुझं लग्न लावतोय. माझ्या आयुष्यातलं अजून एक सुंदर लग्न. माझ्या आईचं! I love you आई!
Happy Married Life”
आजही समाजात या निर्णयावर टिका टिप्पणी केली जाते
आता मराठी अभिनेता असल्याने सिद्धार्थला किंवा त्याच्या आईला कोणी टिका केली किंवा कौतुक केल्याने काही फरक पडत नाही. पण जेव्हा सर्वसामान्य व्यक्ती पुनर्विवाह करण्याचा निर्णय घेतात तेव्हा त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. भारतात पुनर्विवाह कायदा लागू होवून अनेक वर्ष झाली परंतु आजही समाजात या निर्णयावर टिका टिप्पणी केली जाते. एवढेच नाही तर जे लोकं पुनर्विवाह करण्याचा निर्णय घेतात त्यांची मुलंही कधीकधी त्यांना साथ देत नाही. म्हणून आज आपण पुनर्विवाह करताना कोणत्या अडचणींचा सामना करावा लागतो हे जाणून घेणार आहोत त्याचबरोबर लोकं पुनर्विवाह करण्याचा निर्णय का घेतात हेही आज आपण जाणून घेणार आहोत.
लोक पुनर्विवाह का करतात?
काही लोकांना त्यांच्या पहिल्या जोडीदाराचा मृत्यू झाल्यानंतर दु:खातून बाहेर येण्यासाठी नवीन जोडीदार हवा असतो. हे सहसा नवीन कपलमध्ये दिसून येते. अनेकदा तरुण मुलामुलींच्या आयुष्यात काही अपघात घडतात आणि ते आपल्या पार्टनरला गमावतात. अशा वेळी घरचे मुला मुलींचे दुसरे लग्न करून देण्याचा विचार करतात.
घटस्फोट घेतल्यानंतर अनेक मुलं मुली लग्न करतात. घटस्फोटाची कारणे वेगवेगळी असू शकतात.
आधीच्या काळात काही लोकांना एकापेक्षा जास्त बायका असायच्या अशावेळी ते दुसरं लग्न करायचे. आता तो काळ गेला आणि नवीन कायद्यानुसार एका व्यक्तीला पहिली पत्नी असताना लग्न करता येत नाही. भारतातील विविध कायदे पुनर्विवाहांना समर्थन देतात ज्यात हिंदू विधवा पुनर्विवाह आणि मालमत्ता कायदा, 1989, विशेष विवाह कायदा, 1954 आणि हिंदू विवाह कायदा, 1955 यांचा समावेश आहे.
काही लोक पुनर्विवाह करतात कारण ते एकटे असतात आणि त्यांना सहवास हवा असतो. आपल्या जीवनात पूढे जायचं असते आणि आंदी जीवन जगयाचं असते म्हणून अनेक कपल अर्ध्या वयात लग्न करण्याचा निर्णय घेतात.
लोक पुनर्विवाह करतात कारण त्यांना त्यांची लाइफ एका खास, प्रेमळ, त्यांना समजून घेणाऱ्या व्यक्तीसोबत शेअर करायची असते. तसेच पुनर्विवाह करून अनेक कपलला आपले नवे कुटुंब सुरू करायचे असते. मात्र कारण काहीही असो लोक सहसा त्यांना आनंदी राहायचे असते म्हणून पुनर्विवाह करतात.
पुनर्विवाहाचा भारतातील मुलांवर कसा परिणाम होतो?
पुनर्विवाह कधीकधी मुलांसाठी स्वीकारणे कठीण होऊ शकते, विशेषतः जर ते त्यांच्या आई किंवा वडिलांशी संबधीत असेल तर मुलं आपल्या आई किंवा वडिलांएवजी समाजाचा विचार करायला लागतात. काही प्रकरणांमध्ये यामुळे नवीन जोडीदाराबद्दल मत्सर आणि राग येऊ शकतो. पहिल्या जोडीदाराप्रती अपराधीपणाची किंवा अविश्वासाची भावना देखील येवू शकते. पुनर्विवाहाबद्दल आपल्या मुलांशी बोलणे आणि त्यांना समजावून सांगणे गरजेचे आहे की तुम्हालाही एका जोडीदाराची गरज असते.
भारतात, पुनर्विवाहाला एक नवीन सुरुवात म्हणून पाहिले जाते. ज्या मुलांच्या पालकांचा घटस्फोट झाला असेल त्यांच्यासाठी पुनर्विवाह हा एक स्थिर घरगुती जीवन जगण्याचा एक मार्ग असू शकते. पुनर्विवाहामुळे कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासही मदत होऊ शकते. पुनर्विवाहात काही संभाव्य तोटे आहेत ज्यांचा विचार केला पाहिजे. उदा. मुलं दुरावू शकतात.
समाजाला एक चांगला संदेश
भारतात पुनर्विवाहामुळे मुलांवर सकारात्मक आणि नकारात्मक असे दोन्ही परिणाम होतात. एकीकडे पुनर्विवाह त्यांना स्थिर घरगुती जीवन आणि एकमेकांशी वचनबद्ध असलेले दोन पालक देतात तर दुसरीकडे, नवीन नातेसंबंध सुसंवादी नसल्यास ते कुटुंबात तणाव आणि संघर्ष निर्माण करू शकतात. काही प्रकरणांमध्ये, नवऱ्याने आपल्या सावत्र मुलांना आधार न दिल्यास पुनर्विवाहामुळे कुटुंबाला आर्थिक अडचणी येऊ शकतात. पण अनेकदा सिद्धार्थ चांदेकर सारखे भारतातील मुलं पुढाकार घेवून आपल्या पालकांचा पुनर्विवाह लावून देतात आणि यातून समाजाला एक चांगला संदेशही देतात.