Depression is Urban Disease : हल्लीच्या धावत्या लाईफस्टाईलमुळे आणि खाण्यापिण्याच्या सवयींमुळे आपले आरोग्य धोक्यात आले आहे. परंतु यात आणखी एक समस्या भर घालते ती म्हणजे नैराश्य-डिप्रेशन. जे भारतीय समाजातील किशोरवयीन मुलांपासून ते वृद्धांपर्यंत बघायला मिळते. नैराश्यावर लवकर उपचार केल्यास ते दूर होवू शकते. पण भारतातील वाढते नैराश्याचे प्रमाण बघता अनेकांना आपल्या मानसिक आरोग्याची चिंता सतावत आहे. (Environment in rural areas shows way to lead a happy life and give relief from depression)
डिप्रेशन कधी जाणवते
तणाव, अस्वस्थता, मूड ऑफ किंवा दुःख, ही सर्व लक्षणे आयुष्यात एका वेळी येत नाहीत. ते रोज येतात आणि जातात. दिवसातून अनेक वेळा येऊ शकतात. त्यांची येण्याची आणि जाण्याची प्रक्रिया चालू असते. पण या कारणांमुळे आपले काम, आपली दिनचर्या, आपली देहबोली, शरीरातील ऊर्जेची पातळी यावर सहसा फारसा परिणाम होत नाही. पण जेव्हा या सर्व भावना एकत्र येतात आणि एखाद्याच्या मनात घर करू लागतात तेव्हा डिप्रेशन नावाची समस्या डोकं वर काढते. त्यामुळे आपल्या सामान्य कामावरही परिणाम होऊ लागतो किंवा दुःखाची पातळी इतकी वाढू लागते की आपन पूर्ण नकारात्मक होवून जातो आणि कोणाशीही बोलण्याची इच्छा होत नाही.
शेतकरी कधी डिप्रेशनमध्ये जातो का?
पण या मनाला आनंदी ठेवणे आपल्या हातात आहे. तुम्ही कधी विचार केलाय का की, ग्रामीण भागातील माणसं निश्चींत आणि निवांत जीवन कसं जगतात? ग्रामीण भागातला मित्र मी डिप्रेशनमध्ये आहे असं कधी म्हणतो का? कामावर जाणारा शेतकरी कधी डिप्रेशनमध्ये जातो का? ग्रामीण भागातील गृहीणीला मनोरुग्णाकडे जाताना बघितलं का? कदाचित या सर्व प्रश्नांची उत्तर ‘नाही’ अशीच असावी.
आत्महत्येचे प्रमाण वाढले
सध्या भारतीयांमध्ये आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे, देशात मानसिक आरोग्याशी संबंधित समस्या हळूहळू वाढत आहेत. असे असताना काहि दिवसांपूर्वी नवाजुद्दीन सिद्दिकीने (Nawazuddin Siddiqui) एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये ‘डिप्रेशन हा शहरी आजार आहे’ असे म्हटले होते. नवाजुद्दीनने बोललेल्या या वाक्याशी काही लोकं सहमत होते तर काही असहमत. पण अनेकांना नवाजुद्दीनची ही गोष्ट खरी का वाटली याचा शोध आज आपण घेणार आहोत.
25 वयापेक्षा कमी असलेला तरुण जेव्हा सकाळी उठून धावण्यासाठी बाहेर पडतो तेव्हा गावकरी त्याला बघून ‘हा पोलीस भरतीची तयार करत आहे’, असे म्हणतात. थोडं तरुण कपल दिसलं तर ‘याला शुगरची बीमारी आहे’, असे म्हणतात. पण कोणीच तुम्ही डिप्रेशनमध्ये आहात म्हणून फिरायला आलात असे म्हणणार नाही, हा आमचा अनुभव आहे.
जर तुम्ही लहान वयातच खूप पैसे कमवू लागाल तर अर्धे गाव तुम्ही दोन नंबरचे काम करत आहात असे समजेल. तुमचं लग्न लवकर झालं तर, ‘बाहेर काहीतरी आंतरजातीय प्रकरण चालू असेल, म्हणून वडिलांनी घाई केली’, असे समजले जाते. लग्नाला उशीर झाला तर, ‘त्यांच्या स्टेटसपेक्षा तो जास्त मागणी करतो’ म्हणून लग्न जमत नाही असे बोलतात.
एखादा मुलगा गावात शेत बघायला गेला नाही तर ‘तो बापाचा पैसा उडवत आहे’, असे म्हणतात. तोच मुलगा शेतात गेल्यावर ‘नवाबाचा रंग उतरायला लागलाय’, असे म्हणतात. बाहेरून कुणी लठ्ठ होवून आला तर त्याला गावातील काही व्यक्ती ‘बीअर प्यायला शिकला वाटते’, असे टॉंट मारतात. सडपातळ दिसला तर ‘सुट्टा लावत असेल’ असे तर्क गावकरी लावायला लागतात.
ग्राणीण भागातून बाहेर पडलेल्या मुला मुलींची मानसिकता स्ट्रॉंग असते
एकंदरीत गावातल्या वातावरणात करमणुकीचे वातावरण आहे, त्यामुळेच ग्राणीण भागातून बाहेर पडलेल्या मुला मुलींची मानसिकता एवढी स्ट्रॉंग झाली आहे की त्यांना खोलीबाहेर उभे ठेवून रडवले तर तो एकतर इअरफोन लावून झोपी जाईल, उठेल, बाहेर फिरायला जाईल, प्रोब्लेम फेस करेन पण डिप्रेशन मध्ये जाणार नाही. त्या मुलाला प्रत्येक गोष्टीचा अनुभव असतो. जे मुलं वयाच्या 25 व्या वर्षी नकारात्मक प्रसंग फेस करतात तेच प्रसंग ग्रामीण भागातला मुलगा लहानपनापासून फेस करत असतो. त्यामुळे त्याला शहरातल्या अडचणी खूप किरकोळ वाटतात.
ग्रामीण भागातलं वातावरण आजही सुखाने जीवन जगण्याचा मार्ग दाखवते
मी माझ्या अडचणी आता जाऊन माझ्या गावातल्या मित्र मैत्रिणींना सांगितल्या तर माझ्यावर ते हसतील आणि मला म्हणतील हे तर आपण बघितलं आहे, अनुभवलं आहे त्यात काय नाराज व्हायचं. गावातल्या मोठ्या मंडळीला सांगितलं ते मला एक कानाखाली मारतील आणि शेतात जा, जेवण कर, झोपा काढ आणि गावाच्या पोरांना भेट म्हणतील पण कधी मानसोपचार तज्ञाकडे घेवून जाणार नाही कारण ग्रामीण भागातलं वातावरण आजही सुखाने जीवन जगण्याचा मार्ग दाखवते. शहरातील लोक खूप विचार करतात आणि त्यांच्या भावनांना अतिशयोक्तीचं रूप देतात. परिणामी ते डिप्रेशन, नैराश्याचे बळी होतात. म्हणून गावातून शहरात आलेला मुलगा उत्साही दिसतो तर शहरातून गावात आलेला मुलगा विचारांच्या गर्दीत हरवेलला दिसतो. तुम्हाला कुठे जायचं आहे ते तुम्ही ठरवा, कमी विचार करा आणि आनंदी जीवन जगा.