Shape Back Body Shaming : आपल्या समाजात स्त्रीच्या प्रसूतीनंतरच्या काळात नवीन आईला आवश्यक असलेल्या संवेदनशीलतेने हाताळले जात नाही. आपल्या सभोवतालचे लोक ती कशी आहे यापेक्षा ती कशी दिसते यावर लक्ष केंद्रित करतात. मुलाला जन्म दिल्यानंतर स्त्रीयां मानसिक आणि शारीरिकरित्या पूर्णपणे बदलेली असते. हा बदल लक्षात न घेता आजही काही भागात महिलांच्या प्रसुतीनंतरच्या काळजीपेक्षा तिच चांगलं दिसणं जास्त महत्वाचं वाटते. (Expectations for women to be slim-fit after giving birth are fueling body shaming culture)
मातृत्व स्त्रीच्या जीवनात अनेक बदल घडवून आणते ज्यामुळे ती आतून आणि बाहेरून पूर्णपणे बदलते. मुलासोबत जीवनाशी जुळवून घेत असताना, मन आणि भावना देखील बदलते ज्यामुळे ती स्वतःपेक्षा बाळाची काळजी घेण्यात फार गुंतून जाते. या कालात महिलेला शारीरिक आणि मानसिक बदलांच्या टप्प्यातून जावे लागते. परंतु प्रसूतीनंतर बाळाच्या जन्मापूर्वी जसा शारीरिक आकार दिसत होता, त्याच शारीरिक आकारात परत येण्यावर महिलांचा अधिक भर असतो. शेप बॅक कल्चर किंवा बाउन्स बॅक कल्चरची आजच्या काळात बरीच चर्चा आहे. प्रसूतीनंतरच्या काळात महिलांवर फिट राहण्याचा दबाव आणला जातो. (Why does society pressure new mothers to look slim)
विशेषत: माध्यमांमध्ये अशा प्रकारची चर्चा होते आणि सूचनाही दिल्या जातात. लोकप्रिय अभिनेत्री आणि सेलिब्रिटी लवकर कामावर परतणाऱ्या आणि रॅम्पवर तंदुरुस्त दिसल्या तर त्याची हेडलाइन बनवली जाते. प्रसुतीनंतर मॉडलिंग करणारी अभिनेत्री मासिकाच्या मुखपृष्ठांवर दिसते. ही अभिनेत्री फिट कशी राहते याबाबत सल्ले जिले जातात. इतकंच नाही तर या संस्कृतीमुळे प्रसूतीनंतर गर्भधारणेदरम्यान वजन कमी करण्याच्या सूचना एका सेकंदापेक्षा कमी वेळात इंटरनेटवर दिसतात. या प्रकारामुळे प्रसुतीनंतर स्त्रीला सुंदर, सडपातळ आणि फिट दिसण्यासाठी दबाव नकळत दबाव आणला जातो.
माध्यमे गर्भधारणा आणि नवीन मातांचे ज्या प्रकारे चित्रण करतात ते अवास्तव आहे आणि त्याचा त्यांच्यावर नकारात्मक प्रभाव पडतो. इलिनॉय विद्यापीठाने केलेल्या अभ्यासानुसार, अवास्तव पर्सनॅलिटी आणि संदेशांच्या संपर्कात येण्यामुळे अनेक नकारात्मक भावनांना प्रोत्साहन मिळते. बाळंतपणानंतर वजन कमी होण्याचे कारण म्हणजे सेलिब्रिटींप्रमाणेच स्वत:च्या शरीराचा विचार करणे आणि जेव्हा ते तसे करू शकत नाहीत तेव्हा नैराश्य, निराशा आणि स्ट्रेस हार्मोन्स वाढतात.
प्रसूतीनंतरचा कालावधी सरासरी चार ते आठ महिने किंवा त्याहून अधिक काळ बाळंतपणानंतर असतो. जेव्हा शरीर हळूहळू संतुलनात येत असते. बाळाचा जन्म नॉर्मल डिलिव्हरी किंवा सी-सेक्शनद्वारे झाला असेल तर प्रसूतीनंतर शरीराला किमान दोन आठवडे विश्रांतीची गरज असते. बाळंतपणानंतर शरीराचा आकार बदलणे सामान्य आहे. गर्भधारणा आणि प्रसूतीनंतर शरीरात हार्मोन्स, झोप, भूक यामध्ये अनेक बदल होतात. शरीर आणि मनात अस्वस्थता जाणवणे देखील सामान्य आहे. आपल्या नवजात मुलाची काळजी घेण्याबरोबरच गर्भधारणेनंतर स्वतःची काळजी घेणे हा एक मोठा विशेषाधिकार आहे. अनेक अभ्यासांनुसार वजन कमी करण्याचा दबावामुळे आणि इतर वर्तणुकीमुळे नवीन मातांवर अवास्तव अपेक्षांचा भार पडतो. जसे की प्रसूतीनंतर ते त्यांच्या शरीरावर किती नियंत्रण ठेवतील आणि त्यांनी स्वतःचे वजन नियंत्रीत ठेवण्यासाठी काय केले पाहिजे इत्यादी.
द मिंटमध्ये प्रकाशित झालेल्या अहवालानुसार, अमेरिकन कॉलेज ऑफ ऑब्स्टेट्रिशियन्स अँड गायनॅकॉलॉजिस्टच्या म्हणण्यानुसार, सामान्य प्रसूतीनंतर केवळ चार आठवड्यांनंतर व्यायाम सुरक्षितपणे सुरू केला जाऊ शकतो आणि कोणतीही अडचण नसल्यास सी-सेक्शन नंतर सहा आठवड्यांनी सुरू करता येते. गर्भाशय ओटीपोटात स्थिरावल्यानंतर, रक्तस्त्राव पूर्णपणे थांबल्यानंतर थोडा व्यायाम करणे योग्य आहे. स्त्राव पूर्णपणे थांबला आहे आणि टाके बरे झाले आहेत याची खात्री करणे देखील खूप महत्वाचे आहे. जन्मानंतर पुन्हा व्यायाम करण्यास तयार होण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो. यावेळी विश्रांती घेण्याची आणि बाळासोबत राहण्याची गरज आहे. जर स्त्री गर्भधारणेपूर्वी आणि गर्भधारणेदरम्यान सतत व्यायाम करत असेल तर व्यायामाची दिनचर्या लवकर सुरू केली जाऊ शकते कारण सतत सरावामुळे स्नायू आणि शरीराला व्यायामाची सवय झालेली असते.
स्त्रीच्या प्रसूतीनंतरचा कालावधी कसा आहे? ती काय विचार करते तिला किती त्रास होतो? हा विचार करण्याऐवजी ती कशी दिसते यावर जास्त भर दिलेला दिसून येते. बीबीसीमध्ये प्रकाशित झालेल्या एका अहवालानुसार, प्रसूतीनंतर केवळ पेल्विक ऑर्गन प्रोलॅप्सचा परिणाम 90 टक्के महिलांवर होतो. पेल्विक फ्लोअर घट्टपणा, ऊतकांच्या जखमा किंवा मज्जातंतूंच्या नुकसानीमुळे एक तृतीयांश महिलांना मूत्र गळतीचा त्रास झाल्याचे आढळले आहे. डायस्टॅसिस रेक्टी, ज्यामध्ये पोटाचे स्नायू वाढलेल्या पोटापासून वेगळी जागा तयार करतात, परिणामी पोटात मोठा फुगवटा येतो. त्यामुळे बद्धकोष्ठता, पोटदुखी, लघवी गळती यासारख्या समस्या कायम राहतात. 60 टक्के महिलांना चालण्यात आणि उठण्यात अडचण आल्याचे दिसून येते.
बाळाच्या जन्मानंतर ताबडतोब शरीराचा आकार सामान्य होण्याच्या दबावामुळे महिलांच्या जीवनावर अनेक प्रकारे परिणाम होतो. काही मातांवर वजन कमी करण्यासाठी वैद्यकीय मदत घेण्याचा दबावही आणला जातो जो खूप धोक्याचा असू शकतो. या प्रकारची स्थिती महिलांच्या जखमांसाठी अधिक धोकादायक ठरू शकते. प्रसूतीनंतरच्या काळात झोप न लागणे आणि भावनिक अस्वस्थता यामुळे मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर परिणाम होतो. यामुळे हार्मोनल बदल तर होतातच पण याचा आईच्या आरोग्यासह बाळाच्या आरोग्यावरही परिणाम होतो.
गरोदरपणात होणाऱ्या सर्व बदलांनंतर आणि प्रसुतीनंतर महिलांना पूर्ण रिकव्हर होण्यासाठी शरीराला विश्रांती, योग्य पोषण आणि औषधांची गरज असते. प्रसूतीनंतरचा काळ महिलांसाठी पुनर्जन्मापेक्षा काही कमी नसतो. शेप बॅकवर भर देणारी संस्कृती बॉडी शेमिंग संस्कृतीला प्रोत्साहन देते. गर्भधारणेनंतर स्वतःची काळजी घेणे हा एक विशेषाधिकार आहे पण त्याचा दबाव नसावा. नवीन आई झालेल्या महिलांनी नवीन भूमिकेत प्रवेश करताना कोणत्याही दबावाला बळी न पडता आपली काळजी कशी घ्यावी आणि आपले आरोग्य कसे जपावे यासाठी प्रयत्न कले पाहिजे. शेप बॅकवर भर देणारी संस्कृती मागे टाकून आपल्या मनाचा आणि बाळाचा विचार केला पाहिजे.