International Women’s Day 2024 : लग्न हे दोन व्यक्तींमधील परस्पर समंजसपणावर चालणारे नाते आहे. पण कधी कधी अशी परिस्थिती उद्भवते की नाते टिकवणे कठीण होऊन घटस्फोटापर्यंत पोहोचते. अशा परिस्थितीत, जेव्हा एखादी स्त्री तिच्या सासरच्यांकडून तिचे दागिने, साडी आणि लग्नादरम्यान किंवा नंतर मिळालेल्या सर्व भेटवस्तूंची मागणी करते, तेव्हा अनेक वेळा सासरचे लोक त्या वस्तू देण्यास नकार देतात कारण त्यांना वाटते की यावर तिचा कोणताही अधिकार नाही. लग्नात नातेवाईकांनी दिलेल्या भेटवस्तू, दागिने आणि इतर वस्तू तुमच्या आहेत का? तुम्हालाही असाच प्रश्न पडला असेल तर आपण आज स्त्रीधन आणि तिचे अधिकार याबाबत काही गोष्टी जाणून घेणार आहोत. (International Womens Day 2024 : What is stridhan know about womens property rights)
कायद्यानुसार या सर्व गोष्टी महिलांची संपत्ती मानल्या जातात. लग्नापूर्वी स्त्रीला मिळालेल्या भेटवस्तू, लग्नाच्या वेळी मिळालेल्या भेटवस्तू, दागिने, साड्या आणि इतर भेटवस्तू आणि लग्नानंतरही भेटवस्तू म्हणून मिळालेल्या दागिने किंवा इतर मौल्यवान वस्तू, मग ते सासरच्या किंवा माहेरच्या घरातून, त्यावर प्रत्येक महिलेता हक्का असतो. 8 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातो. या निमित्ताने जाणून घ्या तुमच्या हक्कांबद्दल कारण हे अधिकार माहित असणे गरजेचे आहे.
स्त्रीधन संदर्भात महिलांचे हक्क (know about womens property rights)
हिंदू उत्तराधिकार कायदा, 1956 च्या कलम 14 आणि हिंदू विवाह कायदा, 1955 च्या कलम 27 अंतर्गत, कोणत्याही महिलेला तिची मालमत्ता ठेवण्याचा पूर्ण अधिकार आहे. जर एखाद्या स्त्रीला हवे असेल तर ती आपली संपत्ती तिच्या इच्छेनुसार कोणालाही देऊ किंवा विकू शकते. त्यावर फक्त त्याचाच अधिकार आहे.
स्त्रीधन सासरच्या कोणाकडे ठेवले असेल तर ती ठेवणारी व्यक्ती फक्त ट्रस्टी मानली जाते. जेव्हा एखादी महिला तिच्या मौल्यवान वस्तू मागते तेव्हा ते नाकारता येत नाही.
जर कोणी जबरदस्तीने महिलेचे स्त्रीधन ठेवत असेल तर त्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करण्याचा महिलांना पूर्ण अधिकार आहे.
जर काही कारणास्तव एखाद्या महिलेचे वैवाहिक जीवन पूढे जात नसेल आणि तिला सासर सोडून दुसरीकडे राहावे लागले तर तिला तिचे स्त्रीधन सोबत नेण्याचा पूर्ण अधिकार आहे. या स्थितीत तिला कोणी अडवल्यास महिला याप्रकरणी कायद्याची मदत घेऊ शकते.
स्त्रीधन हा हुंड्याचा भाग नाही (What is stridhan )
स्त्रीधन हा हुंडा मानला जाऊ शकत नाही. हे हुंड्यापेक्षा वेगळे आहे कारण भेटवस्तू म्हणून मिळालेल्या वस्तू कोणाकडून मागितल्या जात नाहीत. हे प्रेमाने दिले जातात आणि हुंडा तोंडाने मागितला जातो. जर महिलेची संपत्ती तिच्या सासरच्या लोकांनी किंवा तिच्या पतीने जबरदस्तीने ताब्यात घेतली असेल तर ती महिला त्यावर दावा करू शकते. जर पतीविरुद्ध हुंड्यासाठी छळाचा गुन्हा दाखल झाला असेल, तर त्यासोबतच महिलेच्या संपत्तीबाबत वेगळा गुन्हा दाखल करता येऊ शकतो.