Sex Education And OMG 2 : अक्षय कुमारचा ‘OMG 2’ आणि सनी देओल स्टारर ‘गदर 2’ हे या वर्षातील बहुप्रतिक्षित चित्रपट गत आठवड्यात प्रदर्शित झाले. रिलीजच्या पहिल्याच दिवसांपासून ‘गदर 2’ बॉक्स ऑफिसवर नवे विक्रम रचत आहे. परिणामी ‘OMG 2’ सारखा अत्यंत महत्वाच्या विषयावरील चित्रपट मात्र मागे पडल्याचे चित्र आहे. यावरुन प्रेक्षकांना कोणता विषय महत्वाचा वाटतो हे मात्र लक्षात आले. अनेकदा पालक आपल्या मुलांना आणि कुटूंबियाना घेवून अनेक चित्रपट बघायला घेवून जातात. पण मुलांच्या शिक्षणात भर पडेल असे चित्रपट दाखवायला मुलांना थेटरमध्ये घेवून जाणारे पालक किती आहेत? (OMG 2 movie Parents need to understand importance of sex education)
समाजव्यवस्था आणि शिक्षणव्यवस्थेच्या डोळ्यात झणझणीत अंजन
OMG2 या चित्रपटातून अगदी चाकोरीबाहेरचा पण भारतीय समाजव्यवस्था आणि शिक्षणव्यवस्थेच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा आहे, हा विषय म्हणजे लैंगिक शिक्षण. हा सोपा तसेच न टाळता येणारा विषय आहे जो या चित्रपटात साध्या आणि सरळ पद्धतीने सांगण्यात आला आहे. याधीही रकुल प्रीतचा छत्रीवाली हा चित्रपट OTTला आला होता. यामध्ये सुद्धा सेक्स एज्युकेशन बद्दल जनजागृती करण्यात आली होती. मात्र असे चित्रपट पालक आपल्या मुलांसोबत बघत नाही. त्यामुळे मुलांच्या मनात निर्माण होणाऱ्या लैंगिक प्रश्नांचे उत्तरही देवू शकत नाही. तेव्हा आधी पालकांना समजून घेणे गरजेचे आहे की, लैंगिक शिक्षणाचे काय महत्व आहे. जसे OMG2 मध्ये कांती म्हणजे पंकज त्रिपाठीला समजले तसे सर्व भारतीय पालकांना लैंगिक शिक्षण का महत्वाचे आहे हे समजणे गरजेचे आहे.
लैंगिक शिक्षणाचे महत्व आधी पालकांनी समजून घेणे गरजेचे
हस्तमैथुन, लिंगाचा आकार, शरीरात होणारे बदल का आणि कसे होत आहेत या गोष्टी मुलांना समजणे गरजेचे आहे. मुलांना त्यांच्या प्रश्नांची योग्य उत्तर मिळाली नाहीत तर या विषयाशी संबंधित जाणून बुजून पसरवल्या जाणाऱ्या गैरसमजाला मुलं बळी पडतात. याच विषयावर OMG2 मध्ये भाष्य करण्यात आले आहे. बाहेर जाणारी मुलं कोणाला भेटतात, काय करतात याबद्दल पालकांना माहित नसते. मुलं फक्त शाळेतूनच नाहीतर आपल्या समाजातील प्रत्येक घटकांकडून काही ना काही शिकत असते. तेव्हा वाढत्या वयात मुलांशी मैत्री करून त्यांच्यात होणारे बदल, त्यांचा मित्र किंवा मैत्रिण होवून समजावून सांगणे ही पालकांची जबाबदारी आहे. त्यासाठी लैंगिक शिक्षणाचे महत्व आधी पालकांनी समजून घेणे गरजेचे आहे.
शाळेत शिकवला जाणारा रिप्रोडक्शनचा पाठ
शाळेच्या किंवा सार्वजिनक मुताऱ्यांमध्ये अने निम हकीम जाहिरात करतात. “बचपन मे की गई गलती – मर्दाना ताकत वापस पाये, घुंगट उठणे के बाद पछताना ना पडे- लिंगा को बडा करलो, अशा अनेक gas lighting जाहिराती आपल्याल्या बघायला मिळतात. यामुळे नुकतेच वयात आलेले, अज्ञानी आणि लैंगिक शिक्षणाची अपुरी माहिती असलेली मुलं फसतात. त्यांच्या मनात अनेक प्रश्न असतात, पण शाळेत शिकवला जाणारा रिप्रोडक्शनचा पाठ शिक्षक नुसता वाचून दाखवतात यासाठी कोण जबाबदार आहे?
पॉर्नमुळे बिभित्सकारी व्यवसायला उत
अशावेळी मुलांच्या हाती चोवीस तास उपलब्ध असलेले इंटरनेट मुलांच्या प्रश्नांची उत्तरं देतो. यात सर्वात भयानक प्रकार आहे तो म्हणजे पॉर्न. कारण पॉर्न मधील अतिशय अवस्ताव क्रिया, प्रति-क्रिया फक्त अघोरी उत्तेजना देण्यासाठी असतात, ज्याच रियालिटीशी काही संबंध नसतो. पोर्नमध्ये दाखवल्या जाणाऱ्या मोडिफाईड अवयावांनी एक वेगळेच मार्केट जन्माला आणले आहे. ज्यामुळे लिंग आकार, स्टॅमिना तसेच human ट्राफिकींग सारख्या बिभित्सकारी व्यवसायला उत आला आहे.
मुलांचे लैंगिक गैरसमज कोण सोडवणार?
omg 2 या चित्रपटाच्या निमित्ताने का होईना लैंगिक शिक्षण हा किती महत्वाचा विषय आहे आणि मुलांच्या शिक्षणाचा मूलभूत पाया आहे हे समजावून सांगण्यात आले आहे. पालक आणि शिक्षकांनी असे विषय हाताळताना मुलांना कसे फेस करावे यावरही भाष्य करण्यात आले आहे. मुलांना एच. आय. व्ही , एडस शिवाय् अनेक std आहेत, त्याचबरोबर अनेक लैंगिक गैरसमज आहेत ते मुलांना कोण सांगणार? यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. प्रोड्युसर परेश रावळ, डायरेक्टर अमित राय आणि अक्षय कुमार यांनी जो प्रयत्न केलाय ती एक चांगली सुरुवात म्हणायला हवी.
पालकांना समजेल तेव्हाच ते आपल्या मुलांना समजून सांगू शकतील
लिंगाचा आकार , स्टॅमिना या बद्दल अनेक न्यूनगंड, भयगंड मुलं असो वा अनुभवी पुरुषांमध्ये बघायला मिळत आहे. त्यांचे भांडवल मीडिया, नकली डॉक्टर, ड्रग तसेच पॉर्न इंडस्ट्री करून घेत आहे आणि ज्यांना माहित नाही ते अशा जाहिरातींना बळी पडत आहेत. तेव्हा आधी पालकांना लैंगिक शिक्षणाचे महत्व समजून घेतले पाहिजे. आपल्या मुलंच्या ज्ञानात भर घालणाऱ्या अशा चित्रपटांना मुलांना घेवून गेलं पाहिजे. यामुळे प्रोड्युसर परेश रावळ, दिग्दर्शक…. आणि अक्षय कुमार यांनी जो प्रयत्न केलाय तो कौतुकास्पद आहे. मुलांना पडणारे प्रश्न आणि त्याची उत्तर यावर चर्चा होणे गरजेचे आहे. कारण पालकांना समजेल तेव्हाच ते आपल्या मुलांना समजून सांगू शकतील.