Marriage Truth : प्रत्येकजण तुम्हाला लग्न करण्यास सांगतो, मित्रांपासून ते नातेवाईकांपर्यंत सगळे तुमच्या लग्नाच्या मागे लागले असते. एक विशिष्ट वय झालं की तुमच्यावर लग्नाचा सामाजिक दबाव यायला लागतो. लग्न किती चांगल असतं हे सांगत असताना या सर्व प्रकारात कोणीही तुम्हाला त्यासोबत येणार कठोर वास्तव सांगणार नाही. (Seven truths about marriage to know before marriage)
विवाहित जोडप्यांचे आनंदी फोटो पाहून, प्रत्येकाची मॅरेज लाईफ अशीच असावी असा माझा विश्वास आहे. परंतु कोणतही नात तयार करताना एकमाकांना फसवू नका, लक्षात ठेवा की लग्नाची संकल्पना जितकी सुंदर आहे तितकेच तिचे स्वतःचे काही सत्य देखील आहे जे सहसा कधीच समोर येत नसते. वैवाहिक प्रवासात पाऊल ठेवण्यापूर्वी प्रत्येकाने ही सत्ये जाणून घेतली पाहिजेत. आज लग्नाविषयी काही कठोर सत्य जाणून घेण्याचीही गरज आहे.
हनिमूनचा टप्पा अद्भुत असला तरी तो दीर्घकाळ टिकणारा नाही
खर प्रेम हे शेअरिंग, अनुभव, विश्वास आणि भावनिक जोडणीवर बांधले जाते आणि हे सर्व एका रात्रीत किंवा एका भेटीत होणे शक्य नाही. आता तो काळ गेला जेव्हा आईवडील ठरवायचे आणि मुलं-मुली बोहल्यावर चढायचे आणि त्यानंतर आयुष्यभर अॅडजस्टमेंटमध्ये संसार चालायचा. विवाहामध्ये अनेक गोष्टी महत्वाच्या असतात, जिथे मुलींना लग्नाआधी एखाद्या मुलासबोत बोलणे देखील चूकीचे समजले जायचे तिथे एका दिवसात भेटलेल्या मुलीसोबत लग्नानंतर प्रणय करावा लागत असेल तर ही गोष्ट समजून घेणे गरजेचे आहे. लग्न करण्याआधी मुला मुलींनी भेटणे समजून घेणे गरजेचे आहे हे लक्षात ठेवा. नात्याला वेळ दिल्याने प्रेम वाढू शकते. पण त्याचप्रमाणे ते कमीही होऊ शकते. नात्यात सुरुवातीच्या तीव्र रोमँटिक भावना प्रयत्नांनी सखोलता, अधिक परिपक्व प्रेमात विकसित होऊ शकतात. पण हे देखील लक्षात ठेवा की लग्नानंतरचा हनिमूनचा टप्पा अद्भुत असला तरी तो दीर्घकाळ टिकणारा नाही.
लग्नाची गॅरंटी किंवा वॉरंटी नसते
“तुम्ही भेटता, प्रेमात पडता आणि आनंदाने जगता.” हे खरोखर साध्य करण्यायोग्य आहे किंवा ते परीकथांपुरते मर्यादित आहे? बरं तुमच्या मते असं असूही शकतं. तुमचे प्रेम मजबूत आणि खरे असेल तर तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत कायम सोबत असू शकता. पण लग्नाची हमी कायमची असते का? असे विचाराल तर तुम्हाला उत्तर ‘नाही’ असेच मिळेल. गाठी बांधल्याचा अर्थ असा नाही की तुम्ही कायमचे बंधनात बांधलेले आहात. जर तुमच्या जोडीदारासोबत तुमचे पटत नसेल आणि तुम्ही एका टॉक्सिक रिलेशनमध्ये असाल तर लग्न संपवणे हा नेहमीच एक पर्याय असतो. लक्षात ठेवा तुम्ही तुमच्या वैवाहिक जीवनात आनंदी नसल्यास, घटस्फोट घेणे किंवा तुमच्या जोडीदाराला सोडणे ही वाईट गोष्ट नाही हा तुमचा स्वतंत्र निर्णय असू शकतो.
एकमेकांचे बदल स्वीकारणे आवश्यक
वैवाहिक जीवनात भरपूर रोमँटिक क्षण असले तरी ते नेहमीच परीकथेसारखे नसते. वास्तविक जीवनात आव्हाने, संघर्ष आणि सांसारिक कार्ये यांचा समावेश होतो ज्यांना एकत्रीतपणे सांभाळणे आवश्यक आहे. तुम्हाला थोड्या वेळाने एकाद्या गोष्टीचा कंटाळा येऊ शकतो आणि तुम्ही बोरही होवू शकता. कारण लग्न झाल्यानंतर दोन्ही पार्टनर काळानुसार बदलतात. अशावेळी एकमेकांचा बदल स्वीकारणे आणि पाठिंबा देणे हे ध्येय असले पाहिजे.
लग्नामुळे तुमच्या सर्व समस्या सुटणार नाहीत
नातेवाईक आणि एखादी आंटी तुम्हाला सांगतील की लग्न ही जादूची कांडी आहे जी तुमच्या सर्व समस्या दूर करेल. पण हे तसे होत नाही. लग्नगाठ बांधल्याने तुमच्या सर्व समस्या किंवा अडचणी जादुसारख्या सुटणार नाहीत. होय, तुमचा जोडीदार तुम्हाला त्यांचे निराकरण करण्यात मदत करू शकतो परंतु विवाह तुमच्या समस्या दूर करतील याची हमी देत नाही. यासाठी आपल्या समस्यांचे निराकरण करणे आणि त्यावर कार्य करणे आवश्यक आहे. लग्न केल्याने आपल्याला प्रत्येक प्रॉब्लेम्सचे सोल्युशन मिळेलच असे नाही.
विवाहासाठी प्रयत्न आणि वेळेची गुंतवणूक आवश्यक
विवाहासाठी दोन्ही पार्टनरकडून सतत प्रयत्न आणि वेळेच्या गुंतवणूकीची आवश्यक असते. विवाह हे एक गतिमान नाते आहे ज्याचे पालनपोषण आणि वाढ होण्यासाठी लक्ष देणे आवश्यक आहे. नात जिवंत ठेवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न आणि प्रणयवेळ आवश्यक आहे. आश्चर्यचकित करणारे जेश्चर, डेट नाईट आणि छोटे प्रयत्न नात्यात स्पार्कसारखे काम करू शकतात. कोणतही नात यशस्वी करण्यासाठी प्रयत्न आणि संयम लागतो. यामध्ये तुम्हाला एकमेकांबद्दल जाणून घ्यावे लागेल, आवडीनिवडी, नापसंती, ट्रिगर सर्वकाही समजून घेण्याची ही एक प्रक्रिया आहे.
नेहमी एकमत होणार नाही
तुम्ही कितीही मोकळे असलात तरी मतभेद आणि संघर्ष अपरिहार्य आहेत. सुदृढ वैवाहिक जीवनासाठी विधायकरित्या संघर्ष कसा करावा आणि त्याचे निराकरण कसे करावे हे खूप शिकणे आवश्यक आहे. लग्नाचा अर्थ असा नाही की तुम्ही दोघे एकाच साच्यात रुपांतरित व्हाल आणि प्रत्येक गोष्टीवर नेहमी सहमत- एकमत असाल. प्रत्येकाची वेगवेगळी मते असतात आणि बर्याच वेळा तुमची आणि तुमच्या जोडीदाराची मत वेगळी असू शकतात. लक्षात ठेवा नेहमीच चांगले दिवस नसतात कधीकधी नात्यात संघर्षही असतो.
लग्न तुम्हाला पूर्ण करत नाही
जेव्हा लग्नाचा विषय येतो तेव्हा आपण “लाईफ पार्टनर” हा शब्द नेहमी ऐकतो. पण असे आहे का? दोन व्यक्ती एका लग्नानंतर कसे पूर्ण होतात? वैवाहिक जीवनात दोन स्वतंत्र व्यक्ती जोडीदार म्हणून एकत्र येतात हे लक्षात ठेवा. प्रत्येक व्यक्ती त्यांच्या स्वतःच्या कल्याणासाठी आणि पूर्णतेसाठी जबाबदार असतो. लग्न किंवा तुमचा जोडीदार तुम्हाला पूर्ण करत नाही आणि तुम्ही लग्न न करण्याचा निर्णय घेतल्यास तुम्ही अपूर्णही राहत नाही.