Happy Teacher’s Day : आपल्या संस्कृतीला गुरू परंपेरचा फार मोठा वारसा लाभला आहे. या परंपरेनुसार आपले पहिले गुरू म्हणजे पालक आणि आणि दुसरे म्हणजे आपले शिक्षक असतात. शिक्षक हे देशाचे भवितव्य घडवत असतात. म्हणून देशाचे भविष्य घडविण्याऱ्या शिक्षकाला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्रामगितेतून आवाहन करतात की, गुरुजनीं ऐसे द्यावेत धडे । आपुला आदर्श ठेवोनि पुढे । विद्यार्थी तयार होतां चहूकडे । राष्ट्र होई तेजस्वी ।। (Teachers Day Role of teachers and parents in skill development in children)
शिक्षक दिनाच्या निमित्ताने (Teacher’s Day Special) आज आपण एका वेगळ्या विषयाला हात घालणार आहोत. आपल्या संस्कृतीला गुरू-शिष्याचा वारसा लाभला असला तरी हल्लीच्या विद्यार्थी आणि शिक्षकांच्या नात्याची परिभाषा बदलली आहे. मुलं करिअरच्या पाठीमागे धावत आहेत आणि शिक्षक व्यवसाय करण्यासाठी शिकवताना दिसत आहे. सध्याचे वाढते प्रायव्हेट क्लासेस हे या व्यावसायिक शिक्षणाचे उत्तम उदाहरण आहे.
शाळेत येणाऱ्या मुलाला एक चांगला माणूस, समाजाचे ऋण फेडणारा व्यक्ती आणि देशाचा एक आदर्श नागरिक बनण्यास हल्लीचा शिक्षक विसरत आहे. म्हणून शाळेत बाल लैंगिक शोषण, बलात्कार, आत्महत्या आणि इतर किळसवाण्या घटना घडत आहेत. यात मुलांचा होणारा तोटा ना पालकांना दिसत ना शाळेच्या शिक्षकांना. पण काही जागरूक पालक शिक्षक आहेत जे आपल्या मुलांच्या शालेय शिक्षणाबरोबरच त्यांच्या व्यक्तीमत्व विकासाचा आणि स्किल्स डेव्हलपमेंटचा विचार करतात. “मुलांना शालेय अभ्यासाबरोबर इतर कौशल्ये शिकवणे का महत्वाचे आहे?” हे आपण आज जाणून घेणार आहोत.
Teacher's Day Special : शिक्षकांनो, अभ्यासासोबत मुलांना कला कौशल्येही आवर्जून शिकवा!
पूर्ण लेख वाचण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. pic.twitter.com/KxIrl1Gzaz
— Life Katta (@LifeKatta) September 5, 2023
अलिकडे मुलांच्या वाढत्या आत्महत्या, मानसिक आजार, आरोग्याच्या समस्या, डिप्रेशनच्या बातम्या आपल्याला वाचायला मिळतात. त्याचबरोबर बिझी लाईफस्टाईलमुळे मुलांच्या मानसिक आणि शारिरीक आरोग्यावर परिणाम होत आहेत. शाळा आणि प्रायव्हेट क्लासेसचा ताण मुलांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम करतात हे पालकांना आणि शिक्षकांना दिसत नसावा का? म्हणून मुलांना शालेय अभ्यासाबरोबर कला कौशल्य, स्पोर्ट्स अॅक्टिव्हीटी शिकवणे का महत्वाचे आहे? हे जाणून घेण्यासाठी आम्ही आरती मोहोड (पालक) यांच्यासोबत संपर्क साधला. ज्यांनी आपल्या मुलांच्या संगीत आणि वाद्य शिकण्याच्या आवडीला प्रोत्साहन दिले.
संगीतशास्त्र, स्वयंपाकशास्त्र । गृहस्थापनेचे सुंदर तंत्र ।
अश्वपरीक्षा, रत्नपरीक्षादि समग्र । जीवनविद्या शिक्षणी ।।
या राष्ट्रसंतांच्या विचारांप्रमाणे त्यांनी आपल्या मुलांना संगीत आणि वाद्याचे क्लासेस लावले यामुळे मुलांना ताणतणावाचा सामना करावा लागत नाही. “यामुळे मुलांना फ्रेश वाटते, मुलांना डिप्रेशन येत नाही. मुलांचा व्यक्तीमत्व विकास होतो त्याचबरोबर त्यांच्या कौशल्य विकासात भर पडते. अभ्यासामुळे येणारा ताण कमी होतो, मुलं स्वावलंबी होतात आणि आनंदी राहतात. पालक या नात्याने आम्ही मुलांची काही वैशिष्ट्ये विकसित करू इच्छितो. जेव्हा आपण काही मूलभूत गुणधर्मांचा विचार करतो तेव्हा आपल्याला असे आढळून येते की नेतृत्व हे सर्वात महत्त्वाचे कौशल्य आहे जे कोणत्याही पालकांनी आपल्या मुलामध्ये बिंबविण्याची इच्छा असते. पालक म्हणून, आपण हे ओळखले पाहिजे की मुलांचा आत्मविश्वास वाढवणे हे आपल्या पालकांचे कर्तव्य आहे. मुलांच्या सुप्त गुणांना वाव देणे हे पालक आणि शिक्षकांचे कर्तव्य आहे. म्हणून अभ्यासापलिकडे जावून मूलभूत, नवीन कौशल्ये शिकवण्यावर भर देणे गरजेचे आहे त्यामुळे मुलांचे आत्मविश्वास वाढतो,” असे मत एक पालक म्हणून आरती मोहोड यांनी व्यक्त केले.
दरम्यान आम्ही सार्थक आणि अथर्वचे संगीत शिक्षक स्वप्निल मुकुंद सरदेशमुख यांच्यासोबतही चर्चा केली. या दरम्यान त्यांनी, “मुलं शाळेत जे शिकते त्यापलिकडे गेले पाहिजे, त्यांचा सर्वांगीन विकास व्हावा, त्यांची मनस्थिती स्थिर व्हावी यासाठी संगीत हा महत्वाचा भाग आहे. म्युझिकमुळे मुलांच्या बौद्धिक क्षमतेत सकारात्मक परिणाम बघायला मिळतो. उदा. तबला किंवा हार्मोनियम वाजवताना मुलांच्या बोटावर पडणारा दबाव हा एक्युपेशनचे काम करतो. यामुळे मुलांचा डोक्यावरचा आणि मनावरचा ताण कमी होतो. संगीतामध्ये असे अनेक ‘राग‘ आहेत जे आपल्या मनाला शांत करतात. विचारांचे चक्र थांबवण्याची क्षमता संगीतामध्ये आहे. म्हणून आपल्या मुलांच्या कलागुणांना वाव द्या,’ असे आवाहन तबला विशारद आणि नादब्रम्ह संगीत आणि कला अकादमीचे संचालक स्वप्निल मुकुंद सरदेशमुख यांनी लाईफकट्टा सोबत बोलत असताना पालकांना केले आहे.
मुलांना कोणते कौशल्य शिकवावे? What skills should children be taught?
- सार्वजनिक ठिकाणी बोलणे आणि वादविवाद यासारखे चांगले संवाद कौशल्य.
- सर्जनशील कौशल्ये ज्यात नृत्य, गायन आणि रेखाचित्र कौशल्ये समाविष्ट आहेत.
- गणित, भाषा आणि संगणक कौशल्ये यासारखी कौशल्ये मुलाला उच्च शिक्षणापर्यंत पोहोचवतात.
- विश्लेषणात्मक कौशल्ये ज्यामध्ये मोजणी कौशल्ये, वर्गीकरणातील कौशल्ये आणि समस्या सोडवण्याची कौशल्ये समाविष्ट आहेत.
- नेतृत्व कौशल्ये जी त्यांना अनेक प्रसंग किंवा कार्ये प्रभावीपणे व्यवस्थापित करण्यात मदत करतात.
- अध्यात्मिक कौशल्ये जी मुलाला जीवनाचा सखोल अर्थ शोधण्यात मदत करतात.
मुलांमध्ये कौशल्य विकसित करताना पालकांची भूमिका Role of parents in skill development in children
पालक त्यांच्या मुलाला विविध खेळ खेळण्यासाठी आणि विविध शारीरिक क्रियाकलापांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करून त्यांच्या कौशल्य विकासास मदत करू शकतात.
त्यांनी मुलांमधील सामाजिक कौशल्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे कारण ही कौशल्ये मुलाच्या आयुष्यभर कामी पडतात.
जर तुमच्या मुलांना संगीताची आवड असेल तर त्यांना संगीत शिकण्यासाठी केवळ छंद म्हणून प्रोत्साहित करा. यामुळे त्यांचा कौशल्य विकास होणार आणि त्यांनी आत्मसात केलेल्या या नवीन उपक्रमाची आवड निर्माण होईल.
जर तुमच्या मुलाला चित्र काढण्याची आवड असेल, तर विविध प्रकारच्या कला शिकून त्यांना त्यांची सर्जनशीलता विकसित करण्यास आणि त्यांची क्षमता ओळखण्यास मदत करा.
तुम्ही तुमच्या मुलाला हे समजण्यात मदत केली पाहिजे की कौशल्ये त्यांच्या आवडींवर आधारित असायला हवीत, तुमची मूलं कुठल्याही क्षेत्रात असली तरी त्यांच्याकडे असलेली कला त्यांना आनंदी जीवन जगण्याचा मार्ग दाखवू शकते. लहानपणी मुलांच्या कौशल्य विकासावर भर दिला तर त्यांना भविष्यात या कौशल्यांची नक्कीच मदत होईल.
शिक्षण, नोकरी आणि आयुष्याचे संकल्प हे काही प्रमुख निर्णय आहेत जे आपण आपल्या जीवनात कसे घ्यावे हे मुलांना शिकवणे महत्वाचे आहे. आपल्या मुलांना जीवन कौशल्ये शिकवणे अत्यावश्यक आहे जेणेकरुन त्यांना जीवनात काय साध्य करायचे आहे याची कल्पना येऊ शकेल. मुलांना मजेशीर आणि आकर्षक पद्धतीने शिक्षण देण्यावर भर द्या यामुळे मुलांना आपल्या कलागुणांबद्दल आत्मविश्वास वाटेल.
(Special Story By Lifekatta)