Dry Date: तरूणांना पबमधलं कान हलवणारं संगीत, डोळे दिपवणाऱ्या रंगीबेरंगी दिव्यांऐवजी शांत प्रकाश, हातात जॅम नाही तर कॉफीचा कप आवडायला लागला आहे. हा तरूणांमधील प्रेम व्यक्त करण्याचा हा एक नवीन मार्ग आहे. पबऐवजी रेस्टॉरंट किंवा कॅफेमध्ये शांत ठिकाणी एखाद्या व्यक्तीला भेटणे आणि गप्पा मारणे पसंत केले जात आहे. (Why do young couples love to go on dry dates)
काही वर्षांपूर्वी अनेकजण ड्रिंक डेट्सवर अडकले होते, तर नवीन पिढीने ड्राय डेट्सला पसंती दिली आहे. अल्कोहोलशिवाय डेटला जाणारे अनेक तरूण तरूणी आहेत. पुण्यात राहणाऱ्या माझ्या एका मैत्रिणाला मी विचारले असता तिने सांगितले की, ‘काही दिवसांपूर्वी मी माझ्या पहिल्या डेटला गेले होते. ती पूर्णपणे ड्राय डेट होती. आम्ही कॉफी प्यायलो, चित्रपट पाहिला आणि खूप बोललो. खरंतर आपण मद्यपान करून मजा करतो, पण ती डेट सार्थ ठरत नाही. मन मोकळेपणाने बोलता येत नसेल तर असे भेटून काय उपयोग? मला असे वाटते की जेव्हा आपण नशेत असतो तेव्हा आपली अस्वस्थता लपविण्याचा प्रयत्न करत असतो, आपण खरोखर जे आहोत ते आपण नसतो. म्हणून मी ड्राय डेटला जाणे पसंत केले.’
असे तरुण आहेत ज्यांनी प्रथम ड्रिंकता विचार केला, परंतु नंतर त्यांची डेट कशी ड्राय झाली हे त्यांनाच कळाले नाही. अमरावती मध्ये राहणाऱ्या एका 25 वर्षीय भी फार्म करणाऱ्या मुलाला मी भेटले तेव्हा त्याने त्याचे काही अनूभव मला शेअर केले, ‘मी आत्तापर्यंत ग्रुपमध्ये पार्टी करत होतो, पण जेव्हा मी पहिल्यांदा डेटवर गेले तेव्हा मी माझ्या मैत्रिणीचा संकोच दूर करण्यासाठी ड्रिंक ऑफर केली. पण, तिने नकार दिला, म्हणून मीही प्यायलो नाही. आम्ही त्या डार्क पबमधून बाहेर पडलो आणि एका कॅफेमधल्या टेबलावर बसून आम्ही बराच वेळ गप्पा मारल्या. यामुळे आम्हा दोघांना एकमेकांना ओळखता आलं आमच्या मैत्रितील नात्याचे सुर पुढे जायला लागले. तेव्हा मला समजले की आपण एकमेकांच्या भावनांचा पूर्ण आदर केला पाहिजे. जर आपण मद्यपान करण्यात वेळ घालवला असता तर कदाचित ते एक प्रासंगिक नाते राहिले असते आणि मी माझ्या मनातील भावना व्यक्त करू शकलो नसतो.
डेटिंग अॅप बंबलच्या अभ्यासानुसार, 52% अविवाहित तरुण यावर्षी अल्कोहोल-फ्री ड्राय डेटवर जातील असा अंदाज व्यक्त केला आहे. ड्रिंक डेटला गेल्याने ते समोरच्या व्यक्तीला चांगल्या प्रकारे ओळखू शकत नाही पण ड्राय डेटला गेल्यास ते समोरच्या व्यक्तीला समजून घेवून त्यांच्या भावना समजू शकतात, असे तरुणांनी कारण सांगितले.
आता अनेक व्यावसायीक लोकही समजूतदारपणे ड्रिंक करणे किंवा सोबर डेटवर जाणे पसंत करत आहेत. ही कोरोना काळाची देणगी आहे असे म्हणता येईल. कोविडच्या काळात जगातील अनेक देशांमध्ये लॉकडाऊन लागू असताना पार्ट्यांच्या मस्तीत मग्न असलेल्या तरुणांचे जीवन ठप्प झाले होते. त्याचबरोबर आपल्या आरोग्याची काळजी घेणे किती महत्त्वाचे आहे, याचीही जाणीव झाली. जर तुम्हाला पार्टी किंवा डेटवर जायचे असेल तर तुम्ही दारूशिवाय मजा करू शकता हे कोरोनाने आपल्या सगळ्यांना सांगितले आहे.
अनेक वेळा मद्यपान केल्यानंतर लोक खोटे बोलू शकत नाहीत. काही लोक मद्यपान केल्यानंतर त्या सर्व गोष्टी सहज सांगतात, जे त्यांना पिण्याशिवाय सांगणे अशक्य होतो. पण, असे लोकही मोठ्या संख्येने आहेत ज्यांना ते काय म्हणाले ते आठवत नाही त्यांना हँगओव्हर होतो. अशा स्थितीत नवी पिढी ड्रिंक्सशिवाय डेटवर जाणे पसंत करत आहेत. हा आजच्या तरूण पिढीसाठी एक चांगला ट्रेंड म्हणावा लागेल. पण, समोरच्या व्यक्तीचे सत्य कसे ओळखायचे हेही तरुणांनी शिकले पाहिजे. यासाठी दीर्घकाळ एकत्र राहा कॉन्टॅक्टमध्ये रहा, समोरच्याच्या मनात दडलेले भाव समजण्याचा प्रयत्न करा. डेटवर एकत्र दर्जेदार वेळ घालवा. यातून तुम्ही पुढच्या आयुष्यासाठी योग्य निर्णयही घेऊ शकता. यासाठी एकतर एकत्र कॉफी प्या किंवा एखाद्या सुंदर ठिकाणी फिरायला जा.
ड्राय डेट मेमरेबल करण्यासाठी काही टिप्स
लांब फिरायला जा किंवा सोबर क्रियाकलाप करा
कॉफी डेटला जाऊ शकतो. ही डेट लहान किंवा मोठी असू शकते, परंतु तुमच्यासाठी नेहमीच चांगली असेल.
तुम्ही आपापसात काही स्पर्धा करू शकता, ज्यामुळे तुम्हाला जीवनातील विजय-पराजय याचा धडा मिळेल.
बुक फेअर, फूड फेअर किंवा स्ट्रीट फूड ऑफर करा
तुम्ही एखाद्या ऐतिहासिक ठिकाणी जाऊ शकता किंवा म्युझियमला भेट देणे हाही एक उत्तम पर्याय आहे.
शांत नैसर्गिक वातावरणात जा जेथे तुम्ही शांततेत बोलू शकाल.
स्वत:ची किंवा कोणतीही नवीन संस्कृती समजून घेण्यासाठी तुम्ही क्राफ्ट मेळ्यांनाही भेट देऊ शकता.
तुमच्या शहरात एखादा लिट-फेस्ट होत असेल, संगीत मैफील, नाटक किंवा कला प्रदर्शन असेल तर त्या कार्यक्रमाला सोबत जा.